मुद्दा – बलात्कार एक अभिशाप!

1995
प्रातिनिथिक फोटो

>> गुरुनाथ भाग्यवंत

अनेक युगांपासून स्त्री बलात्काराचा अभिशाप भोगत आली आहे. बलात्काराची शिकार झालेली स्त्री असह्य जीवन जगते. बलात्कार हे महापाप आहे. कायद्याच्या भाषेत भयानक अपराध आहे, परंतु दिवसेंदिवस हे कुकर्म अधिक वेगाने सुरूच आहे.

बलात्काराचा अर्थ असा होतो की, एखाद्याच्या मनाविरुद्ध, इच्छेविरुद्ध बळाने केलेला अतिप्रसंग. स्त्रिच्या सर्वोच्च सन्मानास नष्ट करण्यास बलात्कार असे म्हटले जाते. याला विनयभंग, शीलहरण अशीही संज्ञा आहे. हा एक महाअपराध आहे. प्रत्येक युगात या निंदनीय-नीच कर्माची निंदा केली आहे. मात्र याचा परिणाम पुरुषांवर न झाल्यामुळेच स्त्रियांचा वारंवार अपमान होत आहे.

स्त्राrला अपमान किंवा उपेक्षा आपल्या अस्तित्वासाठी सहन करावी लागत आहे, त्यासाठी समाज काहीही करायला तयार नाही. उलट त्या स्त्री कडे समाज तिरस्काराच्या भावनेने पाहतो. एकप्रकारे स्त्रिला समाजातून वाळीत टाकण्यासारखे आहे. कायद्याने बलात्काऱयांना भयंकर अपराध म्हणून मृत्युदंड देऊनसुद्धा बलात्काराचे प्रमाण कमी झालेले नाही.

बलात्काराची शिकार झालेली स्त्री निर्दोष असते, परंतु समाज तिला क्षमा करीत नाही. आमची नैतिक मूल्ये तिचा अंगीकार करीत नाहीत. तिची थट्टा उडवली जाते, निर्भर्त्सना केली जाते. तिच्याशी संभाषण केले जात नाही. संभाषण केले तरी टोचून बोलणे, तिचा उपहास करणे हे नित्याचेच होते.
बलात्कार म्हणजे समाजातील बीभत्स रूप आहे, जे आमच्या समाजातील स्त्राr वर्गाला सहन करावे लागते. बलात्कार म्हणजे समाज व समाज व्यवस्थेची नपुंसकता आहे. संस्कृती व सभ्यतेचा अपमान आहे. आम्ही कितीही विकास केला तरी अशा घटनांनी माणूसच बदनाम होत आहे.

बलात्कारास अमानवीय दुष्कर्म म्हटले जाते, परंतु तरीही बलात्कारात वाढ होत आहे. हा एखाद्याच्या हत्येपेक्षाही भयंकर अपराध आहे. मात्र याची सजा (शिक्षा) त्या स्त्रिला भोगावी लागते. ती स्त्राr जिवंत असूनसुद्धा मृतावस्थेत जीवन जगते.

वाढत्या स्त्री अत्याचारांमुळे मानवधर्म संकटात आहे. आज जागोजागी धर्माची पायमल्ली वेगाने सुरू आहे. काही ठिकाणी भगवंताचे कार्य जरूर सुरू आहे, पण त्यामुळे माणसातील विकृती कमी झालेली नाही. स्त्रिला दिवसेंदिवस अपमानित केलेच जात आहे. मग धर्म आहे की नाही? धर्मविचार आहे की नाही? कायदा माणसांसाठी असतो, हैवानांसाठी नसतो. कायद्याची पर्वा हैवानांना नसते. जेव्हा माणुसकी समाजात राहत नाही त्या वेळी कायदासुद्धा परिमाणहीन सिद्ध होतो. आपल्याला वाटते न्याय कोर्टात होतोय, परंतु खरा न्याय नेहमी मनाशी व्हायला हवा. कायदा मानवापेक्षा वरचढ नाही. मानवाच्या व्यवस्थेसाठी त्याची निर्मिती केली आहे. अविवाहित स्त्रिया, ज्या बलात्काराच्या शिकार झाल्या आहेत त्यांना अत्यंत कष्टप्रद जीवन जगावे लागते. वास्तविक स्त्री ही समाजाचे ‘मांगल्य’ आहे, संस्कृतीचा आधार आहे हे जेव्हा समाज खऱ्या अर्थाने समजून घेईल तेव्हा बलात्काराचे प्रमाण कमी होऊ शकेल.

आपली प्रतिक्रिया द्या