
>> मलिका अमरशेख
इतिहासापासून आपण बोध घ्यायला हवा असं नेहमी म्हटलं जातं. पण इतिहास म्हणजे नेमपं काय? इतिहासातल्या सोनेरी आणि तितक्याच काळ्यापुट्ट जगात वावरताना भविष्याच्या अनिश्चित जगात डोकावण्याची ऊर्मी आपल्याला गप्प बसू देत नाही. हे अनिश्चिततेतंचं जग इतिहास बनून आपली सोबत करणार असतं पण म्हणून इतिहास उणा ठरत नाही. ओहोटी होताना भरतीच्या या पाऊलखुणा शेवटापर्यंत आपली सोबत करतात. इतिहासाचा हा लपंडाव युगानुयुगे असाच सुरू राहील.
इतिहास महान नसतो, महान माणसं इतिहासात असतात, ती इतिहास घडवतात. बहुशः इतिहासात काळेपुट्ट भागच जास्त असतात. 1 लं, 2 रं महायुद्ध… हिटलरची छळछावणी… सॉक्रेटिस-गॅलिलिओ ते थेट आपल्या ज्ञानेश्वरांचा झालेला छळ न् त्यांच्या झालेल्या हालअपेष्टा ते अगदी आताचा कोरोना काळ! त्यातही माणूस धडपडत जगण्याचा प्रयत्न करतो. ही त्याची चिवट, विजिगिषु वृत्तीच त्याला जिवंत ठेवते.
तो सतत उत्सुक, जिज्ञासू आहे. आदिमानवाच्या गुहेत राहण्याचा कालखंड पाहिला तर अगदी लहानसहान घटना पण त्याला कित्येक वर्षांनी कळल्यात… दगडाचे हत्यार बनवणे, शिकार शिजवून खाणं, अग्नीचा शोध, चाकाचा शोध…या सगळय़ाला कित्येक वर्षं, शतकं लागली असतील, त्या उत्क्रांतीमागे काय काय दडलं असेल?
…लहान मूल पहा, ते चालताना धडपडतं…रांगताना प्रत्येक गोष्ट हातात धरतं…त्याला काहीच कळत नसतं, पण ते अगदी छोटा धागा असो वा वस्तू वा दगड ते हातात घेतं…निरखून बघतं… तोंडात घालून त्याची चव चाखण्याचा प्रयत्न करतं… आजूबाजूला असलेली प्रत्येक वस्तू, माणसे ते निरखून पाहतं, ते काय असेल बरं? असं पाहत ते ओळखण्याचा पिंवा माहीत करून घेण्याचा प्रयत्न करतं…अगदी तसंच थेट आदिमानवाबाबत म्हणता येईल.
– पशूंच्या बरोबर त्याचं वागणं हे त्या काळात फक्त एक भक्ष्य असंच असावं. कदाचित दोन्ही बाजूंनी! प्रगत झाल्यावर आता आता तो वाघसिंहाला जपू पाहतोय, पण याआधी वाघ-सिंहाला मारणं हे त्याला त्याच्या सुरक्षेसाठी आवश्यक होतं न् नंतर तर ते त्याला स्टेटस सिंबॉल, प्रतिष्ठत साहसी खेळ, नाव वाटू लागलेलं…
विजा चमकणं, ढगांचा गडगडाट याचाही अर्थ न कळून आदिमानव थरथरत गुहेत बसला असताना काही शतकानं त्याला निसर्ग, मोसम, काळ कळू लागला तर आताही त्याचं निसर्गाबद्दलचं कुतूहल व शोध संपला नाहीय…
बिग बँग थिअरी कशी घडली असेल? मंगळावर हवा आहे का? स्वतः, स्वतःचं शरीर, मनाचे व्यापार हेही अजून पुरते त्याला कळलेलं नाही. तरीही तो अवकाश, समुद्र यांना आलटून पालटून परखत, शोधत, धुंडाळत कोडं उलगडतोय.
त्यानंतरच्या लोकांनी एका कालखंडात जगात ठिकठिकाणी अद्भुत स्थापत्य शिल्पं निर्माण केलीत. ‘रेनेसान्स’मध्ये तर कला, साहित्य, संस्कृती यात कित्येक अष्टपैलू लोकांनी भर घालून मानवी संस्पृतीला सुवर्णमुकुटच घातला!
पण तसा कालखंड नंतर आला नाही. माणसाला कला, साहित्य याबद्दल तितकंसं वाटलं नाही किंवा नंतर पिरॅमिड, ताजमहाल, अजिंठा, वेरूळ मंदिरातली अद्भुत शिल्पे उभारण्यात स्वारस्य वाटलं नाही.
– जगभराच्या साहित्यातही त्या काळी ग्रीक नाटककार प्लॉटस्नं तर तीनशे नाटके लिहिल्याची नोंद आहे. त्यातलेच एक ‘टू मेनेकमसेस’ यावरून शेक्सपियरनं लिहिलेलं… ‘ट्वेल्थ नाईट’ व त्यावरून आपल्याकडे प्रसिद्ध कवी फिल्मकार गुलजार यांनी ‘अंगूर’ हा चित्रपट हे सर्व गाजलं! पण आताच्या कालखंडातही पहा इतक्या संख्येनं व विविध विषयांवर लिखाण फारसं कुणी केलं नाही. ‘महाभारत’ न् ‘रामायण’ हे दोनच अक्षरवाङ्मय ठरावीत अजून हे तसं वाईटच. कारण त्यानंतर तेवढय़ा उंचीचं लिहिणारं पुणी आपल्याकडे झाले नाही की काय? असा संशय यावा.
– तर एक असेही म्हणतात, इतिहास स्वतःची पुनरावृत्ती करतो. मला व्यक्तिशः तसं वाटत नाही. अशासाठी की, दिवसानंतर रात्र न् ग्रीष्मानंतर वर्षा ऋतू जसा येतो तसंच इतिहासातही काही सोनेरी पानं काही काळीपुट्ट पानं असं घडत राहतं… न् त्याला आपण मानवच जबाबदार नाही का?
इतिहासापासून आपण बोध घ्यायला हवा असं नेहमी म्हटलं जातं. पण इतिहास म्हणजे नेमपं काय? आपल्या अनेक अनुभवांचा संमिश्र परिणाम खरंच इतिहास बदलण्यासाठी भाग पाडतो का आपल्याला? की अजूनही इतिहासाचे हे दोरखंड आपण घट्ट मुठीत पकडून जगत आहोत? इतिहासातल्या सोनेरी आणि तितक्याच काळ्यापुट्ट जगात वावरताना भविष्याच्या अनिश्चित जगात डोकावण्याची ऊर्मी आपल्याला गप्प बसू देत नाही. हे अनिश्चिततेतंचं जग इतिहास बनून आपली सोबत करणार असतं पण म्हणून इतिहास उणा ठरत नाही. इतिहास घडवणाऱया असंख्य माणसांची, तत्वज्ञानाची सोबत पुढे आयुष्यभर पुरणारी असते. ओहोटी होताना भरतीच्या या पाऊलखुणा शेवटापर्यंत आपली सोबत करतात. इतिहासाचा हा लपंडाव युगेनयुगे असाच सुरू राहील.



























































