जागर आदिशक्तीचा – मोहटा देवी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवसाला पावणाऱया मोहटा देवीचे मंदिर पाथर्डी शहरापासून अवघ्या 12 किमी अंतरावर आहे. मोहटा देवीचे मंदिर मोहटे गावालगत असून या मंदिराला मोठा इतिहास आहे. देवीच्या मंदिराचे बांधकाम 85 हजार चौरस फूट जागेत करण्यात आले आहे. त्यामध्ये दोन मजली भक्ती निवास, भोजनगृह, प्रथमोपचार केंद्र, ध्यानधारणा केंद्र, दर्शनबारी रांगेमध्ये चौसष्ट योगिनींची मंदिरे, दशविद्या व गणेश मंदिर उभारण्यात आले आहे.

मंदिराची रचना श्री यंत्रावर आधारित आहे. दर महिन्याच्या पौर्णिमेला महाअभिषेक केला जातो. याशिवाय श्रीराम आणि कृष्ण जन्मोत्सव, प्रकट दिन आनंदोत्सव, शाकंभरी नवरात्र व शारदीय नवरात्रोत्सव साजरे केले जातात. शारदीय नवरात्रोत्सव काळात भाविकांची मोठी गर्दी होते. या काळात देवीची सुवर्णालंकारासह सवाद्य मिरवणूक काढली जाते. या काळात घटस्थापना, सप्तशती पाठ वाचन, भजन, कीर्तन, जागरण, गोंधळ, जलाभिषेक आदी कार्यक्रम राबवले जातात.