भक्तीसाठी नियमात व भावनेत बदल करू नका! श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी

>> निळकंठ कुलकर्णी

श्री स्वामी महाराजांनी अधिकात अधिक उपदेश केला असेल तर तो भक्तिमार्गाचा त्यातही विशेषत श्री दत्तप्रभूंच्या भक्तीचा श्री दत्तसंप्रदाय हा श्रीभगवतसंप्रदयातंर्गत आहे अशी महाराजांची भूमिका होती त्यांची भूमिका तर यापेक्षाही अधिक उदार व समन्वयाची होती हिंदू ( वैदिक ) धर्मांतील संप्रदायांची तर सोडाच पण जैनादीक भारतीय व पारसिक , मुसलमान वैगरे भारताबाहेरच्या संप्रदायांचीही त्यांनी उपेक्षा केली नाही त्या त्या धर्मांतील भक्तांना त्यांच्या धर्मग्रंथातीलच उपासना ते देत असत तसे अनुभवही साधकांना येत व त्या उपासना वंशपरंपरेने करणारी परधर्मीय कुटूंबेही पाहण्यात येतात .

भक्तीमार्गात भावला महत्व आहे भाव म्हणजे परमेश्वराविषयी एक विशिष्ट प्रेमसबंध . स्वामी , पूज्य , सखा, बंधू , पती , त्राता , कैवारी , प्रियकर असा कुठलाही एक भाव ईश्वराविषयी धारण करून तो वाढवणे याचे नाव भक्तिमार्ग ह्या भावात महत्व आहे जे अनन्यतेला , सातत्याला आणि तीव्रतेला भावाच्या बळानेच ईश्वर आकळतो असे सर्व वेद – शास्त्र – संतांचे सांगणे आहे या मार्गात आचारसंबंधी फार कडक नियम नाहीत भक्ताच्या भावाच्या निश्वयाचेंच प्राधान्य आहे ‘ भावांत फरक करू नये ‘ असे श्री स्वामीमहाराज सांगत . याची एक हकीकत पाहण्यासारखी आहे . नरसी ( शके १८२८) चा चातुर्मास झाल्यावर वाशीमवरून महाराज कारंजा येथे आले व तेथे काळ्या मारुतीच्या मंदिरात मुक्काम केला. तेथील पुजाऱ्यांचा असा नियम होता मी मारुतीला नैवद्य दाखवला की लगेच तो खाऊन टाकायचा व मग पूजा समाप्त करायची त्या दिवशी श्री महाराजांच्या उपस्थितीमुळे त्यांना संकोच वाटून त्यांनी नैवेद्य भक्षण केला नाही . इकडे श्री महाराज ध्यान करीत असता श्रीमारुतीरायच ध्यानांत आले व आपल्याला खायला पाहिजे अशा अभिप्रायाने मुख पसरून उभे राहिले . ही गोष्ट महाराजांनी पुजाऱ्याला सांगतच त्यांनी लगेच तो नैवेद्य खाऊन टाकला . मग मात्र श्रीमारुतीराय श्रीमहाराजांच्या ध्यानांतच आले नाहीत यावर महाराजांनी त्या पुजाऱ्याला सांगितले की ‘ देवाला भक्ती फार प्रिय आहे . तरी तुम्ही कोणाचीही भीड न धरता आपल्या नियमात व भावनेत बदल करू नका .’

भक्तीमार्गात सर्व वर्णांच्या सर्व आश्रमांच्या एवढेच नव्हे जातिधर्माच्या साधकांना प्रवेश आहे .’ अपि चेत्सुदुराचारो भजेत मामनन्यभाक् । साधुरेव स मन्तव्य: सम्यव्यसितो हि स: ।।

( श्रीमदभगवदगीता ९:३० ) या भगवदुक्तीला अनुसरून मनापासून संसाराला विटलेल्या कोणत्याही जीवाची श्री स्वामी महाराजांनी उपेक्षा करीत नसत . सरस्वतीबाई नावाच्या एका वेश्येला उपरीती होऊन ती वाडीला येऊन देवाची सेवा करीत होती . ती चांगली गायिका असल्याने श्रीदीक्षितस्वामींनी तिला नित्य देवापुढे करुणात्रिपदी म्हणायला सांगितले होते .एकदा श्रीस्वामीमहाराजांच्या मुक्कामात त्या बाईंनी त्यांच्यापुढे करुणात्रिपदीचे उत्तम तालासुरासहित गायन केले त्यांचा भाव पाहून श्रीमहाराजांनी त्यांना ” भावे नमूं श्रीगुरूच्या पदासी ” हे श्रीगुरुस्तोत्र लिहून दिले व काही ध्यानाभ्यासही सांगितला. पुढे सरस्वती बाईंनी आमरण श्रीमहाराजांच्या आज्ञेप्रमाणे साधन करून मानवजन्माचे सार्थक करून घेतले .

असेच एक उदाहरण श्रीस्वामीमहाराजांच्या शिनोर येथील मुक्कामात घडले जगाला नावाचा एक कोळी जातीतला तरुण , घरच्या लोकांनी त्याचे लग्न ठरवताच पळून निघाला तो शिनोला येऊन जवळजवळ विदेही अवस्थेत येऊन राहिला शीतोष्ण।दि द्वन्दे सहन करीत तो जडभरताप्रमाणेच तिथे दोन वर्षे राहिला होता एकदा श्रीमहाराज घाटावरून स्नान करून येत असता जगलाने दोन्ही हात पसरून त्यांच्या मार्गांत उभे राहून त्यांना अडविले श्रीमहाराजांनी त्याच्याकडे एक वेळ पाहून त्याला बोलले , ‘ तू इथे राहतोस काय? रात्री मार्कंडेयाच्या मंदिरात ये ‘ असे त्याला बोलून महाराज मुक्कामी आले. संध्याकाळी त्यांनी सर्वांनी सांगितले की आज रात्रीपासून गीता सांगावयाची आहे .रात्री प्रवचनाला सुरुवात होण्यापूर्वीच वेळेवर येऊन जगला एका कोपऱ्यात बसला असा क्रम रोज सुरू झाला पुढे गीतेत १७ अध्याय सांगून झाल्यावर ‘ यापुढे आपल्याला काही एकावयाचे नाही ‘ असे सांगून तो निघून गेला यापुढे एकदोन महिन्यातच त्याने आपली देहयात्रा संपवली . हे ‘तत्र तं बुद्धीसंयोगं लभते पौर्वदेहिकम् । यतते च ततो भूय: संसिद्वै। कुरुनन्दन ‘ ( भ. गी . ६: ४३ ) ह्या योगभ्रष्टाचा गतीविषयक भगवंताच्या आश्वासनाचे प्रत्यक्ष उदाहरण आहे प्रारब्धकर्मानुसार हीन यातींत जन्म झालेल्या जगलाला पौर्वदेहिक संस्कारांमुळे लहान वयातच विरक्तीत होऊन तो मोक्षप्राप्तीसाठी प्रयत्न करू लागला . श्रीमहाराजांसारख्या दत्तावतारी पुरुषांची गांठ पडून त्यांचा अनुग्रह झाला आणि त्याच्या आयुष्याचे सार्थक झाले .

।। श्री गुरुदेव दत्त ।।

कृपा असू दे या दासावर
सद्गुरू वासुदेवानंद तव
नामाच्या जय घोषाने लाभे
आत्मानंद सद्गुरू वासुदेवानंद,

धन्य झाले श्री टेंबेकुल माणगांव
हे अति पुण्यस्थळ तिथे जन्मूनी
पसरविलास तू आपुला किर्ती
सुगंध सद्गुरू वासुदेवानंद ,

मानवदेही जणु परमेश्वर
अवतरलासी या भूमीवर
भक्तांच्या हृदयात रुजविला
आत्मोन्नतीचा कंद सद्गुरु
वासुदेवानंद ,

तुझे आचरण दिव्या तपोबल
त्यागी जीवन चरित्र उज्वल
स्मरणी पडता जग मायेचे
तुटोनी जाती बंध सद्गुरु
वासुदेवानंद ,

साहित्याची करुनी सेवा
उद्धरण्यास्तव मानवजीवा
प्रदान केला नीज ग्रंथातुनी
आध्यात्मिक मकरंद सद्गुरु
वासुदेवानंद,

सुबोध त्यातील अमृत्त्वचने
जागृत करीती अत्मलोचने
पदता पदता ज्ञानी बनले
कितीक तरी मतीमंद
सद्गुरू वासुदेवानंद,

।। श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज ।।

। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।

आपली प्रतिक्रिया द्या