लेख – वन्य पशू मानवी वस्त्यांजवळ का येतात?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> पंढरीनाथ सावंत

बिबट्या किंवा जंगलात राहणारे कोणतेच प्राणी नाईलाज झाल्याशिवाय मानवी वस्तीच्या आसपास फिरकत नाहीत. त्यामुळे त्यांच्यात ‘संघर्ष’ होण्यासारखे काही कारण दिसत नाही. सध्या बिबटय़ाच काय, इतर वन्य प्राणीसुद्धा रानातून बाहेर पडून मानवी वस्त्यांच्या आसपास येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यांच्या जगण्याला आवश्यक अशा घटकांचा जंगलात तुटवडा निर्माण झाल्याशिवाय किंवा त्यांच्या जिवालाच धोका निर्माण झाल्याशिवाय वन्य प्राणी आपला नैसर्गिक अधिवास सोडून बाहेर पडत नाहीत. ते मानवी वस्तीच्या जवळ किंवा वस्तीत आल्याची काही उदाहरणे गेल्या महिनाभरात घडली आहेत. वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीत होणारा शिरकाव रोखण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे.

राज्यात माणसे आणि बिबटे यांच्या संघर्षात मोठी वाढ झाल्याने तांत्रिक अभ्यास समिती नेमावी अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य वन्य जीव मंडळाच्या बैठकीत केली होती. त्यानुसार या सर्वांचा अभ्यास करण्यासाठी अकरा जणांची समिती नेमण्यात आल्याची माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली. अपर मुख्य वन संरक्षण सुमित लिमये यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेली ही समिती मानव व बिबटय़ा यामधील संघर्ष कमी करण्याबरोबरच बिबटय़ांच्या मृत्यूची कारणे व इतर उपाययोजना यांचा अभ्यास करून त्याचा अहवाल पुढील तीन महिन्यांत सादर करणार आहे.

माणूस हा बिबटय़ासारख्या ताकदवान प्राण्याला भिऊन वागणारा प्राणी आहे. तसेच बिबटय़ा किंवा जंगलात राहणारे कोणतेच प्राणी नाईलाज झाल्याशिवाय मानवी वस्तीच्या आसपास फिरकत नाहीत. त्यामुळे त्यांच्यात ‘संघर्ष’ होण्यासारखे काही कारण दिसत नाही. सध्या बिबटय़ाच काय, इतर वन्य प्राणीसुद्धा रानातून बाहेर पडून मानवी वस्त्यांच्या आसपास येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यांच्या जगण्याला आवश्यक अशा घटकांचा जंगलात तुटवडा निर्माण झाल्याशिवाय किंवा त्यांच्या जिवालाच धोका निर्माण झाल्याशिवाय वन्य प्राणी आपला नैसर्गिक अधिवास सोडून बाहेर पडत नाहीत. ते मानवी वस्तीच्या जवळ किंवा वस्तीत आल्याची काही उदाहरणे गेल्या महिनाभरात घडली आहेत. त्यांचा उल्लेख करणे हा विषय समजण्याच्या दृष्टीने आवश्यक आहे.

पुणे ः केंद्र सरकारच्या हाय एनर्जी मटेरियल रिसर्च लॅबच्या विस्तीर्ण जंगलातून एक गवा पुणे-बंगळुरू महामार्गालगतच्या सुतारवाडी परिसरात सकाळी 9 वाजता दिसला. वन विभागाच्या व पोलिसांच्या मोठय़ा फौजफाटय़ादेखत तो संध्याकाळपर्यंत चरत होता. त्याला जंगलात परत पाठवण्यात यश आले.

त्याआधी 9 तारखेला कोथरूड भागात आलेला गवा पकडण्याच्या वनखाते वगैरेच्या प्रयत्नात तो उडय़ा टाकीत पळत होता. त्याला जखमा झाल्या आणि तो मरण पावला. पाषाण-बावधन भागात दाट जंगल असून तिकडे आणखी गवे असण्याची शक्यता वन अधिकाऱयाने बोलून दाखवली.

– नुकताच ठाण्यातील एका औषधाच्या दुकानात एक कोल्हा भटक्या कुत्र्यांपासून जीव वाचवण्यासाठी शिरला. तिथे तो तीन दिवस होता. वन्य जीव संस्थेने त्याला तिथून बाहेर काढले. संजय गांधी उद्यानाचे डॉ. पेठे यांनी त्याच्यावर उपचार केले. नंतर त्याला खारफुटीत सोडण्यात आले.

– लहान-मोठे अजगर मुंबई-ठाणे परिसरात मानवी वस्त्यांमध्ये आल्याच्या व त्यांना पकडून जंगलात सोडल्याच्या चार-पाच बातम्या गेल्या महिनाभर छापून आल्या. ठाण्याच्या पवार नगरात हिरव्या रंगाचा हरणटोळ नावाचा साप सापडला.

– सिंधुदुर्ग जिह्यामध्ये दक्षिण हिंदुस्थानातून आलेल्या हत्तींच्या कळपांचा संचार वाढल्याने लोक भयभीत झाले आहेत.

या बातम्या काय सुचवत आहेत?

हे प्राणी आपला जंगलामधला नैसर्गिक अधिवास सोडून मुळात बाहेर का पडतात आणि मानवी वस्त्यांच्या जवळ का येतात? या प्रश्नाचे उत्तर तिथे राहणे अशक्य झाल्यामुळे असे आहे. यातून पुढचा प्रश्न निर्माण होतो, अशक्य का होते?

कारणे उघड आहेत. वन्य पशूंची मुख्य गरज खायला मिळणे ही आहे. खाद्य मिळेनासे झाले की ते शोधत, भटकत भटकत मानवी वस्तीच्या जवळसुद्धा येतात. बिबटय़ाला तिथे उनाड पुत्री सहज मिळतात. कोह्यांना कोंबडय़ा मिळतात. शाकाहारी प्राण्यांना शेतात पिंवा मळय़ात खाद्य मिळते.

– याच्या खेरीज एक महत्त्वाचे कारण आहे शिकार. राज्यात शिकारबंदी आहे, पण जगातल्या धनाढय़ लोकांना घरात वन्य पशूंची कातडी ठेवायची हौस असते. असे लोक जगभर आहेत. त्यामुळे या प्राण्यांची चोरून शिकार केली जाते. त्यांच्या कातडय़ांचे मोठय़ा प्रमाणावर स्मगलिंग होते.

– भोंदू साधू, भगत वगैरे त्यांच्या गिऱहाईकांना वाघाचे दात वगैरे भाग विकतात. या धंद्यासाठी नाना प्रकारचे पक्षी, घुबडे, जनावरे यांची चोरटी शिकार होते. हस्तिदंताचे स्मगलिंग प्रचंड आहे. वीरप्पनसारखा डापू त्यासाठी हत्तींची शिकार करून गब्बर झाला होता. गेंडय़ाच्या शिंगाला मागणी आहे. त्यासाठी चोरून मारून शिकार केली जाते.

वन्य पशूंनी त्यांचा अधिवास सोडून केवळ मनुष्य वस्तीतच नाही तर पुठेही भरकटण्याची मुख्य कारणे वरीलप्रमाणे आहेत. वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीत होणारा शिरकाव रोखण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. वनखात्याची ती नक्कीच आहे, पण त्यांच्याही काही अडचणी आहेत.

त्यांच्याकडे भरपूर मनुष्यबळ नाही. वाहने बहुतेक फक्त अधिकाऱयांकडे असतात. वनरक्षक नावाचा माणूस हातात नुसती काठी घेऊन मैलच्या मैल जंगल ‘राखीत’ असतो. त्यामुळे वनरक्षण आणि वन्य जीव रक्षण ही दोन कामे करण्यासाठी मनुष्यबळ वाढवले पाहिजे. त्याला आवश्यक ती साधनसामुग्री दिली पाहिजे आणि मुख्य म्हणजे प्रशिक्षण दिले पाहिजे.

तरच माणूस आणि वन्यपशू यांच्यामधला तथाकथित ‘संघर्ष’ नाहीसा होऊ शकेल.