
>> प्रतीक राजूरकर
सूर्याचे उत्तरायण म्हणजेच आजच्या मकर संक्रांतीपासून सूर्य उत्तर गोलार्धाकडे अग्रेसर होतो. त्यामुळे रात्र लहान आणि दिवस मोठा होतो. थोडक्यात अंधाराकडून प्रकाशाच्या दिशेने सूर्याची वाटचाल सुरू झाल्याने हिंदू धर्मात धनु राशीतून मकर राशीत होणारे सूर्याचे संक्रमण हे पवित्र मानले गेले आहे. सामान्यतः हिंदू पंचांगानुसार सर्व तिथी अथवा सण हे चंद्राच्या वेगावर अवलंबून आहेत, परंतु मकर संक्रांत ही सूर्याच्या वेगावर आधारलेली आहे. म्हणूनच संक्रांत ही प्रतिवर्षी 14 अथवा 15 जानेवारीस येते. सूर्य संक्रमणात अध्यात्म तर आहेच, शिवाय गणितसुद्धा सूर्याभोवती फिरते.
यजुर्वेदात ‘चक्षो सूर्यो जायत’ म्हणजेच सूर्याला भगवंताच्या नेत्राची दृष्टी म्हणून वर्णन आहे. सूर्योपनिषदात जगताच्या उत्पत्तीचा एकमात्र जनक आणि सृष्टीचा आत्मा म्हणून उल्लेख आढळतो. निसर्गाला प्रकाशाची गरज नाही, तर अनैसर्गिक आचरण करणाऱयांसाठी अंतरात्म्यातील ज्ञानाचा दीपक प्रज्वलित व्हायला हवा. थोडक्यात, वैदिक काळात अथवा पुराणकाळात आजच्या इतकी शिक्षण पद्धती प्रगत नसल्याने कथा, पुराणकथा या माध्यमातूनच सर्वसामान्यांना समजेल अशा सोप्या कथांच्या माध्यमातून त्याची मांडणी केली गेली आहे.
1900 ते 1965 दरम्यान 25 वेळा मकर संक्रांत ही 13 जानेवारीला साजरी करण्यात आली होती. त्याअगोदर संक्रांत ही कधी 12 तर कधी 13 जानेवारीस साजरी केली जात असे. अभ्यासकांनी त्यासाठी स्वामी विवेकानंदांच्या जन्मकुंडलीचे उदाहरण दिले आहे. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजीचा असून त्यांच्या कुंडलीत सूर्य मकर राशीत स्थित असल्याकडे लक्ष वेधले आहे. 20 व्या शतकात मकर संक्रांत ही बहुतांशी 13-14 जानेवारीला तर वर्तमानकाळात 14-15 जानेवारीला येईल. 21 वे शतक संपता संपता सूर्याचे मकर राशीतील संक्रमण हे 15-16 जानेवारीकडे होईल असा अभ्यासकांचा दावा आहे. सूर्य प्रत्येक महिन्यात एका राशीतून पुढल्या राशीत प्रवेश करतो. एकूण वास्तव्य हे 30 अंशावर संपून पुन्हा पुढल्या राशीत 1-30 अंश आहे. एक अंश पुढे जाण्यास सूर्याला 24 तासांचा अवधी लागतो. सूर्य गतीला अनुसरून 71-72 वर्षांत एक अंशाचे अंतर पडते. इंग्रजी दिनदर्शिकेप्रमाणे एक वर्ष हे 365 दिवस आणि सहा तासांचे आहे व प्रत्येक चौथ्या वर्षी एक दिवस कमी, चौथ्या वर्षात उर्वरित सहा तास जोडल्यास 24 तास पूर्ण होतात. म्हणून इंग्रजी दिनदर्शिकेप्रमाणे प्रत्येक चौथ्या वर्षी सूर्याचा मकर राशीतील प्रवेश हा एक दिवस उशिरा होतो.
सूर्याचे उत्तरायण म्हणजेच आजच्या मकर संक्रांतीपासून सूर्य उत्तर गोलार्धाकडे अग्रेसर होतो. त्यामुळे रात्र लहान आणि दिवस मोठा होतो. थोडक्यात अंधाराकडून प्रकाशाच्या दिशेने सूर्याची वाटचाल सुरू झाल्याने हिंदू धर्मात धनु राशीतून मकर राशीत होणारे सूर्याचे संक्रमण हे पवित्र मानले गेले आहे. सामान्यतः हिंदू पंचांगानुसार सर्व तिथी अथवा सण हे चंद्राच्या वेगावर अवलंबून आहेत, परंतु मकर संक्रांत ही सूर्याच्या वेगावर आधारलेली आहे. म्हणूनच संक्रांत ही प्रतिवर्षी 14 अथवा 15 जानेवारीस येते. सूर्य संक्रमणात अध्यात्म तर आहेच, शिवाय गणितसुद्धा सूर्याभोवती फिरते.
आरोग्यासाठी पहाटेचा सूर्यप्रकाश, सूर्यनमस्कार, सौर ऊर्जा, यासारखे वैज्ञानिक महत्त्व असो अथवा हिंदूंचे दैवत प्रभू श्रीरामांचा सूर्यवंश, हनुमंताचे गुरू, आर्य संस्कृतीतील आराध्य दैवत, अथर्वशीर्षातील सूर्यस्तवं म्हणून श्रीगणरायाचे वर्णन असो, कालानुरूप सूर्य संक्रमणाचे गणित, चंद्र-पृथ्वीची सूर्यभोवतालची प्रदक्षिणा याचे जरी आज शास्त्राsक्त प्रमाण सिद्ध झाले असले तरी प्राचीन काळात सूर्याचे महत्त्व कथा, श्लोकातून वैदिक काळापासून मानले गेले आहे. त्या काळी सूर्याचे महत्त्व हे केवळ आकाशात दिसतो म्हणून देण्यात आले नसून त्यामागे हीच शास्त्राrय कारणे होती. निसर्ग, भूगोल, इतिहास, वर्तमान, भविष्य, ग्रह, विज्ञान, गणित हे सर्व सृष्टीच्या सुरुवातीपासून सूर्याभोवती फिरत आहेत. म्हणूनच सूर्य हा हिंदू धर्मात पुजनीय आहे. वैदिक काळात सूर्याने या सर्व विषयातील अंधकारावर प्रकाश टाकला म्हणून आधुनिक काळात सूर्याचे महत्त्व उजेडात आले. ‘सूर्य उपनिषद’ हे अथर्ववेद शाखेतील एक वैदिक काळातील उपनिषद आहे. त्यातील ‘सूर्य अथर्वशीर्षा’त सूर्याचे वरील महत्त्व अधोरेखित होते.
आनन्दमयो ज्ञानमयो विज्ञानमय आदित्यः
आदित्याय विद्मम्हे सहस्त्रकिरणायधीमहि
तानः सूर्य प्रचोदयात्
सूर्यावर आधारलेल्या भविष्यपुराणात सूर्याच्या रथाला सात अश्व असल्याचे वर्णन आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात अविश्वसनीय वाटावे असेच आहे, परंतु हेच वर्णन वैज्ञानिक स्वरूपात “There are Seven Spectrums of Light” या संज्ञेत मानवाच्या प्रगत बुद्धीला विश्वासपात्र ठरते. कारण त्याचे प्रमाण विज्ञानाने सिद्ध केले आहे. म्हणून आजच्या युगात ते पटण्यासारखे आहे. या दोन्हीचा अर्थ एकच असू शकतो असा तर्क मांडल्यास पुराणातील वर्णनावर प्रकाश पडतो. पुराण अथवा वेदातील सर्वच उल्लेख हे विज्ञानाशी सांगड घालता येण्यासारखे नाहीत. जे कालबाह्य झाले ते हिंदू धर्माने कधीच बहिष्कृत केले. सती प्रथा, जाती व्यवस्था, विधवा विवाह अशी अनेक उदाहरणे त्यासाठी देता येऊ शकतील. वेदपुराणात उल्लेख केलेल्या अनेक वर्णनांना (सगळ्यांना नाही) वैज्ञानिक आधार आहेत. फक्त त्याचे प्रमाण आजच्या ज्ञानातून दिले गेले तर ते अधिक योग्य ठरेल. म्हणून हनुमंताची जात शोधण्यापेक्षा जर वैदिक अथवा पुराणातील उल्लेखित वर्णनांचे संशोधन करून विज्ञानासोबत सांगड घातली गेली तर हिंदू धर्म ही निसर्गानुरूप जगण्याची पद्धती आहे याचा अधिकाधिक उलगडा होऊ शकेल.



























































