
>> प्रवीण धोपट
नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमध्ये लिस्टेड असलेल्या कंपन्या त्यांच्या प्रायमरी बिझनेस ऑक्टिव्हिटीनुसार वेगवगळय़ा सेक्टरमध्ये विभागल्या गेल्या आहेत. सेक्टोरिअल विभागणीमुळे गुंतवणूकदारांना कोणत्या कंनीत कधी इन्व्हेस्ट करावी याचा निर्णय घेणे सोपे जाते. एनएससीमध्ये काही महत्त्वाचे सेक्टर आहेत. उदाहरणादाखल काही सेक्टर आणि त्यांचे महत्त्व काय याची माहिती खाली देत आहे.
आयटी सेक्टर * इन्फरर्मेशन आणि टेक्नॉलॉजी सेक्टर हा या काळाचा मंत्र समजला जातो. अलीकडच्या काळात या कंपन्यांनी खूप कमी काळात हिंदुस्थानी अर्थव्यवस्थेत आपला ठसा उमटवलेला दिसतो. ज्या गुंतवणूकदारांना याचे महत्त्व कळले आणि त्यांनी अशा कंपनीचे शेअर्स विकत घेतले. त्यांचा नफा काही पटींनी वाढलेला दिसतो. आयटी क्षेत्रात अशा कंपन्या येतात ज्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, आयटी सर्व्हिस आणि टेक्नॉलॉजी सोल्युशन पुरवतात.
उदा. इन्फोसिस, टीसीएस.
फार्मास्युटिकल्स सेक्टर * काळ बदलला, पैसा वाढला, लाइफस्टाइल बदलली, आजार वाढले. त्यामुळे अलीकडच्या काळात औषधांचा वापर वाढलेला दिसतो. त्यामुळे औषध निर्मिती करणाऱया पंपन्यांच्या शेअर्समध्ये आणि नफ्यामध्ये आपोआपच वाढ व्हायला लागली. काही वेळा अचानक उद्भवलेल्या रोगराईमुळे अमुक एखाद्या कंपनीच्या औषधांची विक्रमी विक्री होताना दिसते. अर्थात अशा वेळी कंपनीच्या शेअर्समध्येही वाढ झालेली दिसते. ज्या पंपन्या फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरिंग आणि संशोधनात असतात अशा पंपन्यांचा समावेश या सेक्टरमध्ये होतो.
उदा. सिपला, डॉ. रेड्डी
बँकिंग सेक्टर * प्रत्येक व्यक्तीचे कोणत्या ना कोणत्या बँक अकाऊंटमध्ये खाते असतेच. बँकिंग हे प्रत्येक माणसाच्या ओळखीचे सेक्टर आहे, परंतु काही बँकांचे आपले कार्यक्षेत्र आणि सेवा यामुळे त्यांचे प्रभावक्षेत्र अधिक आहे. देशाच्या अर्थकारणातही त्यांचे महत्त्व खूप आहे. या सेक्टरमध्ये बँका आणि काही फायनान्शिअल इन्स्टिटय़ुशन येतात, ज्या बँकिंग सर्व्हिसेस पुरवतात.
उदा. एसबीआय, आयसीआयसीआय बँक.
ऑटोमोबाइल सेक्टर * काही वर्षांपूर्वी कार असणे हे मध्यमवर्गीयांचे स्वप्न असायचे. आज ती प्राथमिक गरज बनली आहे. काही घरांत एकापेक्षा अधिक कार दिसायला लागल्या आहेत. याचा परिणाम त्या कारची निर्मिती करणाऱया कंपन्यांच्या शेअर्सवर होत असतोच. कारची निर्मिती करणाऱया कंपन्या, कारचे स्पेअर पार्टस्, पंपोनंट्स बनवणाऱया कंपन्या, कारच्या अॅक्सेसरीज बनवणाऱया कंपन्यांचा समावेश ऑटोमोबाइल सेक्टरमध्ये येतो.
उदा. मारुती सुझुकी, टाटा मोटर्स.
कन्झ्युमर गुडस् सेक्टर * सकाळी उठगल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक माणसाला कुङ्गल्या ना कुङ्गल्या वस्तूंची आणि सेवांची गरज असते. ज्यात पर्सनल केअर किंवा घरात दररोजच्या गरजेच्या वस्तूंचा समावेश होता. तेल, साबण, चहा, टुथ पावडर अशा वस्तूंचा समावेश यात होतो. या वस्तूंची निर्मिती करणाऱया काही कंपन्या असतात, ज्यांच्या वस्तूंना वर्षानुवर्षे मागणी असते. अशा कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणे काही लोक पसंत करतात.
उदा. हिंदुस्थान युनिलिव्हर, आयटीसी.
याव्यतिरिक्तही एनर्जी, मेटल, सिमेंट, टेलिकॉम, रिटेल, रिअल इस्टेट, मीडिया यांसारखे काही सेक्टर आहेत, ज्यांचे अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे योगदान आहे. एखाद्या सेक्टरवर होणाऱया सकारात्मक किंवा नकारात्मक परिणामाचा कंपनीच्या शेअर्सवर पण परिणाम होत असतो. त्यानुसार इन्व्हेस्टर आपल्या गुंतवणुकीचे निर्णय घेत असतो.
(लेखक दीपंकर फिनकॅप इन्व्हेस्टमेंट प्रा. लि. येथे गुंतवणूक सल्लागार आहेत)





























































