साहित्यजगत – असावे सादर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>रविप्रकाश कुलकर्णी

नित्य दिवस हा नवानवा हे कविवचन वा सुभाषित नसून ती वस्तुस्थिती आहे, पण आजूबाजूच्या वातावरणाने आपलं मन खिन्न होत असतं आणि त्यावर मात करण्यासाठी आपण नवे नवे मार्ग काढत असतो. सण-उत्सव साजरे करत असतो. काहीतरी निमित्त करून वा काढून मनाला उभारी देण्याचाच हा प्रयत्न असतो.

नववर्षाचं स्वागत होतं, करायचं ते त्यासाठीच. तर असं 2023 हे वर्ष आजपासून सुरू झालं आहे. त्यासाठी तुम्हा रसिक वाचकांना मनःपूर्वक शुभेच्छा! आरंभ ही गोष्टच मुळी सुखावणारी आहे. त्यामुळे नववर्षदेखील नवनव्या गोष्टी घेऊन येत असतं. त्यापैकी पहिली गोष्ट कॅलेंडर!

खरं तर तारीख, वार आणि महिना हे सगळीकडे सारखं असलं तरी त्यामध्ये किती विविधता असावी!

स्टेशनरीच्या दुकानाबाहेर ही रंगीबेरंगी कॅलेंडरं जणू पताकासारखी डोलत असतात. त्यामध्येदेखील नेमपं सांगायचं तर निर्णय सागरपासून कालनिर्णपर्यंत हा पसारा पसरलेला दिसतो. त्यात पुन्हा दाते, रुईकर वगैरे मंडळींच्या नावानं असलेली कॅलेंडरं असतात. महालक्ष्मी, अक्कलकोट स्वामी, साईबाबा आदी देवादिक, संत महात्म्यांची म्हणजे त्यांची चित्रं, नावं असलेली कॅलेंडरं पण असतात. शिवाय महाराष्ट्र दर्शन, वास्तू आदींबाबत माहिती देणारी कॅलेंडरं असतातच.
यामध्ये आणखी एक गोष्ट असते, आज पंचांग नावाची गोष्ट फारच कमी जण वापरतात. कारण हे पंचाग त्या पॅलेंडरमध्ये समाविष्ट केलेले दिसते.

उपासतापास, संकष्टी, चंद्रोदय, मुहूर्त हे तुम्ही आम्ही कॅलेंडरवरूनच करतो वा ठरवतो ना?
आणखी एक गोष्ट, गावोगावच्या जत्रा कॅलेंडरवर असायलाच म्हणजे त्याची नोंद हवीच. एखाद्या जयंतीची नोंद चुकून राहिलीच तर त्या कॅलेंडरकडे ग्राहकांची पाठ फिरवल्याची उदाहरणं मला माहीत आहेत.

ही झाली कॅलेंडरची पुढची बाजू.

कॅलेंडरच्या मागच्या पानावरच्या माहितीकडे, लेखाकडे सर्वप्रथम लक्ष वेधलं ते कालनिर्णयने. जयंत साळगावकरांनी कॅलेंडरवर सर्वप्रथम पु. ल. देशपांडे यांना लिहायला लावलं, म्हणजे आधी सुनिता देशपांडेंना राजी केलं आणि एक मोठा वाचकवर्ग यंदा पु. लं पॅलेंडर लेखात काय म्हणतात याची उत्सुकता कायम वाढती ठेवली. तेव्हापासून ललित लेखकांना पण कॅलेंडरमागे जागा मिळायला लागली ती आज पण आहे.

एक काळ होता दीनानाथ दलाल, रघुवीर मूळगावकर यांच्यासारख्या चित्रकारांच्या नयनरम्य चित्रांनी पॅलेंडरची शोभा वाढलेली असे. पोरवाल, बिटको यांची कॅलेंडरं त्यासाठीच प्रसिद्ध होती. नव्हे, आजदेखील अशी कॅलेंडरं जपून ठेवणारे रसिक सापडतात. मात्र हा प्रकार आता कमी झालेला दिसतो, मात्र गमभन प्रकाशनने साहित्य वैभव म्हणून साहित्यिकांचे फोटो आणि त्यांची माहिती देणारं कॅलेंडर सुरू केलं आणि आजतागायत त्यांनी त्यांचे रसिक ग्राहक टिकवून ठेवले आहेत. यंदाचं त्याचं विसावं वर्ष आहे. मेधा सिथटो संपादित या कॅलेंडरवर साहित्यिकाचा पह्टो आणि त्याबाबत माहिती आहे. हे फोटो,

द. मा. मिरासदार (मंगल गोडबोले), पुष्पा भावे (गीताली वि. मं.), रत्नाकर मतकरी (वंदना कोकीळ- कुलकर्णी), अनिल अवचट ( सुरेखा सबनीस), जयंत पवार (प्रणव सरवदेव), सतीश काळसेकर (सुहासिनी कीर्तिकर)

वरील यादी पाहता लक्षात येईल की, ही सगळी कलावंत मंडळी हे जग सोडून गेलेली आहेत.
मग यात साहित्यिकांचे फोटो कॅलेंडरवर केव्हा येणार? ही उणीव जाणवून असेल. नाशिकच्या शब्दमतदार प्रकाशनातर्फे वागविलासिनी 2023 कॅलेंडर काढले असून त्यात 12 नव्या-जुन्या कवयित्रींची रेखाचित्रं आणि त्यांच्या विशेष कविता दिलेल्या आहेत. या कवयित्री आहेत – सावित्रीबाई फुले, लक्ष्मीबाई टिळक, बहिणाबाई, इंदिरा संत, शांता शेळके, प्रभा गणोरकर, अरुण ढेरे, प्रभा दया पवार, निरजा, अनुराधा पाटील, अनुजा पाटील.

विशेष म्हणजे हे मोठय़ा आकाराबरोबरच टेबल कॅलेंडर पण उपलब्ध आहे.फोटो कॅलेंडरमध्ये सतीश पाकणीकर हे मोठं नाव. खुद्द पु. ल. देशपांडे यांनी ‘गाणारं कॅलेंडर’ अशी त्यांना प्रशस्ती दिली आहे म्हणजे पाहा.
यंदाचं त्यांचं दृष्य विशेष आहे – भीमसेन जोशी!

कॅलेंडरला दिनदर्शिका असा शब्द सरसकट वापरलेला दिसतो. विवेकानंद पेंद्राच्या मराठी प्रकाशन विभागाचादेखील उपक्रम आहे कॅलेंडरचा, मात्र त्यांनी म्हटलंय विवेक रत्नाकर अर्थात कार्यदर्शिका. याचा वेगळा विशेष म्हणजे स्वामी विवेकानंदांनी दीर्घकाळ ज्या शहरात वास्तव्य केलं, त्यासंबंधात तेथील वास्तूंविषयी फोटोसकट माहिती दिलेली आहे. जेणेकरून त्या स्थळाविषयी उत्सुकता वाढावी. या कार्यदर्शिकेतील माहिती आणि फोटो दिलीप महाजन यांनी दिलेले आहे.

प्रकाशक म्हणून ओळख असलेले महाजन आता ‘लेखक’ही झाले आहेत. त्याची चुणूक इथेही दिसते.

असा हा सगळा पसारा पाहून माझा एक मित्र म्हणाला, हा महिना सगळी कॅलेंडरं पाहण्याचा, वाचण्याचा! मग मनात आलं आणखीही कुणाला काय काय वाटत असेल ना?

तर सांगायचा मुद्दा आता या रविवारपासून साहित्य कला जगतातील घडणाऱ्या आणि मोडणाऱ्या गोष्टीचा वेध या सदरातून सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे.