नाणकशास्त्रातील महामेरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> ऋषिकेश शिर्के

दैनंदिन व्यवहारात आपल्या सगळय़ांचाच चलनी नोटा व नाण्यांशी संबंध येत असतो. अर्थात व्यावहारिकदृष्टय़ा हा संबंध असतो तो काही काळापुरताच. किंबहुना काही सेकंदांपुरता, मात्र डॉ. परमेश्वरीलाल गुप्ता हे एक असे असामान्य व्यक्तिमत्त्व होऊन गेले ज्यांचे संपूर्ण जीवनच नाण्यांच्या अलौकिकतेने सजले आहे. डॉ. गुप्तांच्या जीवनाचा वेध आपल्याला थक्क करून सोडतो. केवळ एक संशोधक म्हणूनच नव्हे, तर एक स्वातंत्र्यसेनानी आणि समाजसुधारक म्हणून डॉ. गुप्ता परिचित आहेत. नाणकशास्त्र हा विषय अनेक स्तरांवरील संस्थांनी एकत्रितपणे येऊन हाताळण्याचा आहे आणि डॉ. परमेश्वरीलाल गुप्तांचे याबाबतचे संशोधन कार्य याचीच साक्ष देते. आपल्या कारकिर्दीत डॉ. गुप्तांनी 32 पुस्तकं, अनेक प्रबंध आणि 250 हुन अधिक संशोधनपत्रिका प्रकाशित केल्या आहेत. त्यातील ‘पेपर मनी ऑफ इंडिया’ हे याप्रकारचे एकमेव पुस्तक नाणकशास्त्रातील महामेरूच. 24 डिसेंबर 1914 रोजी उत्तर प्रदेशातील आझमगड येथे डॉ. परमेश्वरीलाल गुप्ता यांचा जन्म झाला. स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मलेल्या तरुणांसारखेच डॉ. गुप्तादेखील स्वातंत्र्यसंग्रामात सहभागी झाले आणि पुढे पुढे ‘आझमगडचे नेहरू’ अशीच त्यांची ओळख बनली. वयाच्या सोळाव्या वर्षी ब्रिटिश सरकारविरुद्ध रणशिंग फुंकलेल्या डॉ. गुप्तांना आठवीत असतानाच शाळेतून शाळा सोडल्याचा दाखला देण्यात आला आणि पुढे पूर्णवेळ त्यांनी स्वातंत्र्य हे एकच उद्दिष्ट ठेवले. अर्थात ते तेवढय़ावरच थांबले नाहीत, त्यांनी राष्ट्राच्या शत्रूंसोबत समाजाच्या शत्रूंशी देखील लढा कायम ठेवला. गावातील लोकांच्या शिक्षणासोबत त्यांनी स्त्र्ााr शिक्षणावरदेखील भर दिला. डॉ. गुप्ता यांची सामाजिक कळकळ इथेच थांबत नाही. हिंदी वर्तमानपत्रांतून त्यांनी सामाजिक वैगुण्यावर कठोर प्रहार केले. याच काळात त्यांची ओळख नाणकशास्त्र्ााशी झाली. या शास्त्राकडे ते अक्षरशः ओढले गेले आणि देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर म्हणजे वयाच्या 30 व्या वर्षी, तब्बल 17 वर्षांच्या गॅपनंतर पुन्हा त्यांनी शालेय शिक्षणास सुरुवात केली. मॅट्रिक पूर्ण झाल्यानंतर नाणकशास्त्रातील कुतूहलापायी डॉ. गुप्तांनी पत्रकारिता सोडली आणि बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये प्राचीन भारतीय इतिहास आणि संस्कृती याविषयातील अध्ययनास सुरुवात केली. डॉ. गुप्तांच्या अलौकिक प्रतिभेचे आणि बुद्धिमत्तेचे उदाहरण म्हणजे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होण्याआधीच भारतीय नाणकशास्त्रातील एक सन्मानीय अभ्यासक म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची ओळख बनली होती. वयाच्या 45 व्या वर्षी डॉ. परमेश्वरीलाल गुप्ता यांनी ’झ्ल्हम्प् mark coins of ancient India’ या विषयावरील आपला प्रबंध पूर्ण करून पीएच.डी. मिळवली.

हिंदुस्थानी नाण्यांच्या जवळजवळ साऱयाच मालिकांवरील डॉ. गुप्तांचा अभ्यास अनन्यसाधारण आहे. प्राचीन काळापासून अर्वाचिन काळापर्यत हिंदुस्थानी नाणकशास्त्र्ााच्या बहुतेक सर्व शाखांमधली त्यांचे कार्य पर्वतासमान आहे. हिंदुस्थानातल्या विविध मालिकांतील दोन लाखापेक्षा अधिक प्रचंड मार्क कॉइन्स आणि संबंधित विषयाच्या डॉ. गुप्तांच्या प्रत्यक्ष अभ्यासाने हिंदुस्थानीं नाणकशास्त्राच्या अभ्यासाला एक निश्चित आकार प्राप्त करून दिला. निःसंशयपणे डॉ. गुप्तांचे जीवन मल्टीडायमेन्शनल आहे. संशोधक म्हणून, अभ्यासक म्हणून, स्वातंत्र्यसेनानी म्हणून, सामाजिक कार्यकर्ता म्हणून विभागले गेलेले हे व्यक्तिमत्त्व नाणकशास्त्र्ााच्या अभ्यासकांसाठी कायम आदर्श राहील.

– [email protected]