
>> सागर कदम
सह्याद्रीच्या कुशीत वसलेले शांत, सुशेगाद बदलापूर. चारही दिशांना धरणे, नदी आणि पर्वतरांगा, पण मुंबईतल्या जागा महागल्या आणि तिथल्या सर्वसामान्य माणसाने आपला मुक्काम कल्याण-डोंबिवलीपल्याड अंबरनाथ, बदलापूरकडे हलवला. येथील गर्दी वाढली आणि हिरव्या जंगलावर कुऱहाड पडून सिमेंट काँक्रीटची जंगले वाढली. 26 जुलै 2005 रोजी बदलापूरकरांनी प्रथम महाप्रलय अनुभवला. आता 27 जुलैच्या दुसऱया महापुरानेही ‘26 जुलै’च्या भयंकर स्मृती जागवल्या. हे का घडले? बदलापूरचे ‘बुडला’पूर होण्यासाठी जबाबदार कोण? काढती लोकसंख्या की ढासळलेले प्रशासन? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कमी किमतीत मिळणारी सुसज्ज आणि प्रशस्त घरे यामुळे मुंबई, ठाण्यातील सर्वसामान्य नागरिकांनी बदलापूरला घरे घेण्याचा सपाटा लावला. घरांची मागणी वाढली. भूमाफियांसाठी जणू तिजोरीच उघडली. प्रशासकीय बाबूंना हाताशी धरून दिसली जमीन, बांधा इमारती. दिसली जमीन, ठोका चाळी, असा कारनामा सुरू झाला. एकराने जागा किकणारे काराने पैसे मागू लागले. कारण मुंबई आणि ठाण्यातील एक घर किकून बदलापुरात एक प्रशस्त घर आणि दुकान, रिक्षा अथका गाडी घेऊन उरलेल्या पैशांच्या व्याजावर आरामात जगायचे अशा ‘सुखी’ मानसिकतेतून इथली लोकवस्ती वाढली आणि बघता बघता निसर्गाची कत्तल झाली, भातशेती ओसाड पडल्या आणि इथे उभी राहिली सिमेंट काँक्रीटची जंगले… 2005 आणि 2019च्या महापुराचे खरे कारण यातच दडले आहे.
विकास आराखडय़ातून ओढे, नाले गायब
– जे नाले, ओढे पुढे उल्हास नदीला जाऊन मिळतात त्यांचा तांत्रिक उल्लेखच विकास आराखडय़ात आढळत नाही. त्यामुळे तिथे बिल्डर मंडळी 9 मीटरचं अंतर राखून बांधकाम करतात. पण या नादात अनेक बिल्डरांनी बदलापूर शहरातील नाल्यांचे काही प्रवाह परस्पर वळवले तरी आहेत किंवा ते नालेच बुजवून टाकले आहेत. बिल्डरांनी केलेल्या लाखो, करोडोंच्या जाहिरातींना भुलून घर घेणाऱयांना त्यांची इमारत नाला अडवून बांधली आहे की नाला बुजवून बांधली आहे हे महसुली कागदावर दिसतच नाही.
उल्हास नदीची पूररेषा आखलीच नाही
– कर्जतपासून पुढे आणि वांगणी, बदलापूरकडे येणारी उल्हास नदी पुढे कल्याणच्या खाडीला जाऊन मिळते. या नदीचं मूळ पात्र आणि सध्या या उपनगरांजवळ असलेलं पात्र यात मोठा फरक झाला आहे. 2005 साली आलेल्या पुरावेळी या नदीने आपलं मूळ पात्र दाखवून दिलं होतं. शासकीय नियमांप्रमाणे प्रत्येक नदीची एक पूररेषा असते. या पूररेषेची तीन भागांत विभागणी केलेली असते. पहिली असते लाल रेषा (1 लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग या रेषेच्या आत होतो), दुसरी निळी रेषा (60 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग या रेषेच्या आत होतो), तिसरी असते पांढरी रेषा (30 हजार पाण्याचा विसर्ग या रेषेच्या आत होतो) पण दुर्दैवाने बदलापुरात अजूनही या रेषा आखल्याच गेल्या नसल्याने बांधकामं उभी राहताना या रेषांचा विचार होत नाही. पूररेषेची आखणी न केल्याने बांधकाम व्यावसायिक मिळेल ती जागा विकत घेऊन तिथे बांधकामं उभी करतात. दिवाळी ते होळीपर्यंतच्या काळात ही घरं विकली जातात. पाकसाळ्यात जरा मोठा पाऊस झाला की, इथं पुराचं पाणी शिरतं. चार दिवसांपूर्वी याच भागात मोठा पूर आला होता. अनेक जण अडकून पडले होते. काहींची एअर बोटीने तर काहींची हेलिकॉप्टरने सुटका करावी लागली. या परिसरात पूररेषा आखणीचं काम पालिकेचं नसून राज्य शासनाच्या पाटबंधारे विभागाचे असल्याचे सांगण्यात येते. मग सरकारने येथे अजून पूररेषा का आखली नाही हा खरा प्रश्न आहे.
नदींजकळ चाळी आणि इमारती
z उल्हासनगरपासून जकळ असलेल्या करप, कांबा, रायते या गावांमध्ये सध्या मोठे इमारत प्रकल्प आणि चाळी उभ्या राहिल्या आहेत. पण यंदा पाऊस मोठा झाला आणि याच भागात पाणी शिरलं. तसंच उल्हासनगर महापालिकेच्या हद्दीतही अनेक घरांमध्ये पाणी शिरलं होतं. त्याआधी 1989 साली उल्हास नदीला महापूर आला होता आणि कर्जतमध्येही मोठं नुकसान झालं होतं. पण नदीकाठी संरक्षक भिंत उभारण्यात आली. तसंच नदीपात्रातला गाळ काढण्याचं काम झालं असून घरं उंचावर बांधण्यात आल्यानं तिथे मोठं नुकसान होत नाही.
भूमिगत गटारांचे अर्धवट काम
– बदलापुरातील भुयारी गटार योजनेचे काम फक्त 60 टक्के पूर्ण झाले आहे. भुयारी गटार योजनेचा पूर्व-पश्चिम भाग अद्यापी पूर्णपणे जोडला गेलेला नाही. भुयारी गटारातील पाणी हे अप्रत्यक्षरीत्या शहरातील मुख्य नाले यामधूनच वाहते. 27 जुलैच्या महापुराच्या वेळी नाल्यातील घाणीच्या साम्राज्यामुळे पाण्याचा प्रवाहांना मोठय़ा प्रमाणात अडथळा येऊन अनेक नाल्यातील चेंबरमधून पाणी बाहेर आले. त्यातच उल्हास नदी पात्रातील पाणी शहरात शिरले. त्यामुळे शहरातील नाल्याच्या प्रवाहच बंद होऊन ते लोकांच्या घरात शिरले. 45 हजार बदलापूरकरांना या महापुराचा फटका बसला. कोटय़वधीचे नुकसान झाले. घरात आठ फुटांपर्यंत पाणी शिरल्याने संसाराचा चिखल झाला. अनेकांचे जीव सुदैवाने बचावले. त्यामुळे साडेतीनशे कोटींचा प्रकल्प नियोजनाअभाकी नापास झाला असेच दुर्दैवाने म्हणावे लागेल.
नाल्यांची झाली गटारे
– सध्या कल्याण ते बदलापूर, अंबरनाथ भागात 10 ते 15 हजार नक्या घरांचं बांधकाम सुरू आहे. हे मोठमोठे प्रकल्प सहन करण्याची तिथल्या छोटय़ा उपनगरांची स्थिती नसतानाही त्यांना मंजुरी मिळाली आहे. या सगळय़ाचा ताण शहरातल्या ड्रेनेज सिस्टम, नाले, ओढे यांच्यावर होत आहे. नाल्यांचा आकार कमी होऊ लागला आहे आणि मोठय़ा पावसात नाले तुंबून पूरस्थिती निर्माण होत आहे. बदलापूर आणि अंबरनाथ नगरपालिकेकडून घेतलेल्या माहितीनुसार, अंबरनाथमध्ये दर दिवशी 120 टन आणि बदलापुरात 70 टन घन कचरा निर्माण होतो. बदलापूर ते कल्याण या भागात अधिकृत आणि अनधिकृत अशा दोन्ही स्वरूपाच्या बांधकामांमागची नियोजनशून्यता यामागे आहे. बदलापुरात विकास आराखडय़ात मुख्यत्वे सहा नाले आहेत. त्यांना अनेक भागातून पाणी येऊन मिळते. परंतु डोंगर उतारावरून येणाऱया मुख्य नाल्यांची रुंदी गटारांएवढी करून प्रवाह अडविण्याचा प्रयत्नदेखील बदलापुरात झाला आहे.




























































