डिजिटल झेप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> संजय मिस्त्री

गावाकडील जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल करायच्याच हा ध्यास उरी बाळगून धुळय़ाच्या हर्षल विभांडिकने अमेरिकेतील नोकरी, सुबत्ता सोडून थेट महाराष्ट्राच्या दिशेने ‘डिजिटल झेप’ घेतली. त्यामुळेच आज राज्यातील सुमारे 61 हजारांवर शाळांचे डिजिटलायझेशन पूर्ण झाले आहे. काही ठिकाणी तर कॉन्व्हेंटमधील मुलांनीही जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतला आहे. हा ‘चमत्कार’ हर्षलच्या ‘डिजिटल शाळा’ ध्येयामुळेच साध्य होऊ शकला आहे!

धुळय़ासारख्या शहरात आर्थिक स्थितीवर मात करून स्वतःच्या गुणवत्तेच्या जोरावर एक मुलगा शिकतो. नातलगांच्या प्रेरणेने केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये बी.टेक करतो. पुढे अहमदाबादमध्ये चार वर्षे नोकरी केल्यावर ती सोडून थेट न्यूयॉर्कच्या पेस विद्यापीठात फायनान्स मॅनेजमेंटमध्ये एमबीए करतो. अमेरिकेतच एका बहुराष्ट्रीय कंपनीत भरघोस पगाराची उच्च पदावरील नोकरी त्याला मिळते. काही काळानंतर हिंदुस्थाननेदेखील अमेरिकेसारखे डिजिटल का होऊ नये, असा विचार त्याच्या मनात चमकतो. कुणीतरी त्याला सुचवते की, गावापेक्षा शाळा डिजिटल कर! त्याला जीवनाचे ध्येय सापडते आणि तेथून पुढे त्याचा ‘डिजिटल शाळां’चा प्रवास सुरू होतो. आजही तो सुरू आहे. धुळय़ातील हर्षल सुभाष विभांडिक या एका सर्वसामान्य कुटुंबातील तरुणाने ही ‘डिजिटल झेप’ यशस्वी करून दाखवली आहे.

हर्षल विभांडिक. धुळ्यातील सुभाष विभांडिक यांचा हा मुलगा. घरची परिस्थिती जेमतेमच. त्यामुळे हर्षलचे पहिली ते दहाकीचे शिक्षण धुळ्यातील मराठी शाळेतच झाले. नववीत असताना शाळेत पहिल्यांदा संगणक आला. संगणक वर्गाची फी वर्षाला साडेसातशे रुपये होती. ती भरणे अशक्यप्रायच. शाळेत आलेला संगणक पाहायला मिळावा म्हणून तो व त्याचे मित्र शाळेच्या मागच्या बाजूने चढून खिडकीतून संगणक, डेस्कटॉप, माऊस पाहत असत. संगणकाचे हे दर्शन म्हणजेच हर्षलच्या मनोविश्वातील पहिली डिजिटल क्रांती होती. दहावीत त्याला उत्तम गुण मिळाले, पण कडिलांची आर्थिक परिस्थिती बेताचीच. तेव्हा हर्षलने धुळ्याच्या ज्युनिअर कॉलेजमध्ये बाराकी केले. साऱयांचा आग्रह शिक्षक होण्याचा असताना काकांच्या प्रेरणेने त्याने बाराकीनंतर केमिकल टेक्नॉलॉजीत बी.टेक. केले. चार वर्षे अहमदाबादेत नोकरी केली. मात्र 2006 मध्ये न्यूयॉर्कमधील पेस युनिव्हर्सिटीत फायनान्स मॅनेजमेंटमध्ये एमबीए केले. 2008 मध्ये लगेच एका बहुराष्ट्रीय कंपनीत बँकर म्हणून नोकरी लागली. पण त्यांचे मन मातृभूमीकडे ओढ घेऊ लागले. गाकातील मुलांसाठी काहीतरी कराके, असे सतत मनात येऊ लागले. अमेरिकेसारखे डिजिटल असावे असे त्याला वाटे. त्याचवेळी हिंदुस्थानातही सत्तांतर होऊन डिजिटल क्रांतीचे वारे वाहू लागले होते. तेव्हा एखादे गावच डिजिटल करायला हवे असे त्याच्या मनात येई. मात्र हिंदुस्थानातील परिस्थिती अतिशय भीषण होती. गावाकडे आल्यानंतर ही भीषणता त्याला अधिकच जाणवे. गाव डिजिटल करण्यासाठी सर्वांकडेच संगणक, कायमस्वरूपी वीजपुरवठा हवा. नेमका त्याचाच इथे अभाव होता. यामुळे नेमके काय करावे ते सुचेना! अशा वेळी एका सुचवले की, गावापेक्षा शाळा डिजिटल करायला घे. या शब्दांनी हर्षल यांना मार्ग सापडला! आपण जिथे शिकलो तेथील शैक्षणिक दर्जा उंचावयाचा असेल तर त्या शाळा डिजिटल केल्या पाहिजेत असे त्याला वाटले. मात्र त्यासाठी त्याने वेगळाच पर्याय निवडला. हिंदुस्थानात राहून काम करण्याची परवानगी मिळावी या अटीवर ‘इंटरनॅशनल कॅपिटल पार्टनर’ या कंपनीत नोकरी त्याने स्वीकारली आणि आज त्याच माध्यमातून त्याचा डिजिटल शाळांचा प्रयोग सुरू आहे. धुळे जिह्यातील काही शाळा डिजिटल झाल्या तेव्हा कर्गात फळय़ाच्या जागी पडदा आला. इतिहासातील धडय़ाचे रूपांतर ऍनिमेशन फिल्ममध्ये होऊन मुलांना जिवंत शिक्षण अनुभवायला मिळू लागले. गणितातील पाढे गाण्याच्या स्वरात ऐकायला मिळू लागले. भूगोलात प्रत्यक्ष नकाशे, ग्राफिक्स आणि निकेदने यामुळे मुलांना खऱया अर्थाने जगाची ओळख होऊ लागली. परिणामी किद्यार्थ्यांचे शाळेत येण्याचे प्रमाण काढत जाऊ लागले. शिक्षक आणि किद्यार्थ्यांमधील संकादही काढू लागला. पुढे तर कॉन्व्हेन्टमधील विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळेत येऊ लागले.

ग्रामीण भागातील प्रत्येक शाळा डिजिटल व्हायची असेल तर गावकऱयांनीही पुढे आले पाहिजे हे हर्षलचे म्हणणे गावकऱयांनाही पटू लागले. गावातील लोकांचा जिल्हा परिषदेच्या शाळांविषयी दृष्टिकोन बदलू लागला होता. शाळा आपलीच आहे असा fिजव्हाळा त्यांच्यात निर्माण झाला. हर्षद विभांडिक यांच्या प्रेरणा सभा वाढू लागल्या. दीड वर्षात नऊशे खेडय़ांत अडीचशे प्रेरणा सभा झाल्या. शाळेचे शिक्षक आपला पगार, गावातील सरपंच मंडळी हजार दोन हजार रुपये देऊ लागली. एवढेच काय आदिवासी पाडय़ांवरील अशिक्षित महिलासुद्धा आपल्या कनवटीतून पाच रुपयांची चुरगाळलेली नोट काढून शाळेच्या डिजिटलायझेशनसाठी देऊ लागली. 70 टक्के गावकऱयांचा निधी आणि 30 टक्के निधी विभांडिक स्वतःचा पैसा टाकून शाळा डिजिटल करू लागले. हर्षल यांना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचेही सहकार्य मिळू लागले. प्रत्येक जिह्यातील उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत क गटकिकास अधिकारी डिजिटल शाळेसाठी निधी उभारण्यासाठी हवी ती मदत करू लागले. आतापर्यंत त्याने धुळे जिह्यातील सर्व म्हणजे 1103 जिल्हा परिषद शाळा, तर राज्यभरातील 67 हजार शाळांपैकी 61 हजार जिल्हा परिषद शाळा ‘डिजिटल’ केल्या आहेत.

हर्षल, तसेच अधिकारी, कर्मचारी आणि जिल्हा परिषद शिक्षकांच्या एकत्रित प्रयत्नातून आतापर्यंत धुळे, गोंदिया, हिंगोली, ठाणे या चार जिह्यातील 100 टक्के, तर चंद्रपूर, गडचिरोली, नंदुरबार, बीड, बुलढाणा आदी जिह्यांत शाळांच्या डिजिटलायझेशनने वेग घेतला आहे. आता आव्हान आहे ते या डिजिटल शाळांना अखंड वीजपुरवठा आणि वाढत्या वीज बिलाचे! हर्षल विभांडिक यांनी धुळे जिह्यात त्यावरही मात करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांनी धुळे जिह्यातील 180 शाळांना 500 व्हॅट क्षमतेचे सौर संच दिले आहेत. अर्थात संपूर्ण महाराष्ट्रात सौर शाळा प्रकल्प राबवायचा असल्यास सरकारनेच पुढाकार घ्यायला हवा. सरकार तो घेतो का हाच प्रश्न आहे.