शिरीषायन – असतो तर म अमुक – भाग-2

>> शिरीष कणेकर

मी सुनील गावसकर असतो तर सरळ बॅट उचलून सलामला गेलो असतो, पण माझ्याबरोबर कोण येणार? हा प्रश्न अनुत्तरितच राहिला असता.

मी सानिया मिर्झा असतो तर स्वतःला पाकिस्तानच म्हणवायचं की हिंदुस्थानच, हे ठरविता न आल्यानं मी भूतान किंवा नेपाळचं नागरिकत्व स्वकारलं असतं व म भूतान किंवा नेपाळ असतो तर सानियाचा अर्ज केराच्या टोपलीत टाकली असता.

मी अजित भुरे असतो तर मी काय आहे, ते सांगण्यापेक्षा मी काय नाही ते सांगणं मला जड गेलं असतं.

मी यशवंत दत्त असतो, तर आईवडिलांन माझं नाव संजय ठेवलं नाही यासाठी मी त्यांचा आजन्म ऋण राहिलो असतो.

मी विनोदी कवी अशोक नायगावकर असतो तर माझ्या झुपकेदार मिशांनाही विनोदी म्हणावं असा फतवा काढला असता.

मी रामदास फुटाणे असतो तर मुलाचं नाव चणे ठेवले असते. मग आम्ही चणे-फुटाणे झालो असतो.

मी मधुमेहतज्ञ डॉ. अनिल भोरास्कर असतो तर पेशंटश बोलताना जिभेवर कणभर साखर येणार नाही याकडे डोळय़ात तेल घालून लक्ष दिलं असतं. त्यासाठी नेत्रतज्ञाला गाठून म्हणालो असतो, ‘अरे, कुत्र्या! माझे डोळे नट तपास, नाहीतर गळय़ात डालडय़ाचा डबा अडकवून पार्श्वभागावर लाथा मारीत रस्त्यावरून तुझ धिंड काढीन.’ नेत्रतज्ञाच शुगर आपसूक आटोक्यात राहील.

मी नाना पाटेकर असतो तर भारत भूषणचा आदर्श डोळय़ांपुढे ठेवला असता व करण दिवाणसारखे – फार तर प्रदीपकुमारसारखे काम केले असते.

मी विजय केंकरे असतो तर दाढी न वाढवतादेखल म उत्कृष्ट दिग्दर्शक आहे हे मी प्रेक्षकांच्या गळी सहज उतरवलं असतं.

मी श्रेयस अय्यर असतो तर क्रिकेट सोडून उडिपी हॉटेल काढलं असतं व रन्सऐवजी मेदुवडे काढले असते.

मी शश थरूर असतो तर त्याला भेटणाऱया महिलांच नावं एका दोनशे पान वहीत सुवाच्च्य अक्षरात लिहून ठेवण्याच्या कामावर माझीच नेमणूक केल असत. शेवटचा श्वास घेताना मला ती वही दाखवाव एवढीच माझी अंतिम इच्छा असेल.

म भगवान श्रकृष्ण असतो तर बासरी न वाजवता स्वतःच टिमकी वाजवल असत व आजच्या राजकारणात माझ चलत असत.

मी माज पाक पंतप्रधान इमरान खान असतो तर आधचे पंतप्रधान पाकिस्तानबाहेर अन्य देशांत निवर्तले यापासून म उचित धडा घेतला असता व क्रिकेट खेळायला जातोय असं सांगून निसटलो असतो.

मी शब्बरकुमार असतो तर माझ्याहून बेसूर गाणाऱयांच म एक यादी केल असत व त संडासाच्या दारावर चिकटवल असत.

मी विकी कौशल असतो तर पत्न कतरीना कैफच्या लग्नापूर्वीच्या प्रियकरांचे फोटो गळय़ात घालून फिरलो असतो. काही करण्यापूर्वी त्यातला सलमान खानचा फोटो मी शिरी धारण केला असता. क्वचित मी तो अभिषेक बच्चनलाही उधार दिला असता.

मी गायिका शारदा असतो तर माझं गाणं ऐकून ऐकून लता मंगेशकर गायिका झाल असं मी सांगत फिरलो असतो व काही लोकांचा त्यावर विश्वासही बसला असता.

मी कपिल शर्मा असतो तर जराही वेळ न दवडता म नवनवन माणसं भांडायला व तोडायला गाठल असत.

मी उषा xxxx असतो तर ज्या दिवश तोंडातून अपशब्द बाहेर पडणार नाही त्या दिवश मी स्वतःला गरम इस्त्रचे चटके देईन, पण त वेळ माझ्यावर येणारच नाही याच मला व मला ओळखणाऱयांना खात्र आहे.

मी नाटय़ व्यवस्थापक अशोक मुळय़े असतो तर एक दिवसाचं मौन पाळून दाखवलं असतं. त्यानंतर तो दिवस अख्ख्या नाटय़विश्वानं ‘मूक दिन’ म्हणून पाळला असता. त्यानंतर मुळय़ांच्या आवळलेल्या मुसक्या सोडायला हरकत नसाव.

मी डॉ. रव बापट असतो तर के.ई.एम.चं नाव बदलून रव बापट इस्पितळ असे नाव ठेवावे यासाठी प्रयत्नशल असतो.

मी शिरीष कणेकर असतो तर स्वतःला एवढा शहाणा समजत असूनही मला काळं कुत्रंही का विचारत नाही, हा प्रश्न मला पडला असता.

[email protected]