
>> शिवानी गोंडाळ, (मेकअप आर्टिस्ट)
केरळच्या सांस्कृतिक व कला जीवनात ‘कथकली’ या नृत्य शैलीला विशेष स्थान आहे. कथकली नृत्य हे संगीत आणि अभिनय यांचं मिश्रण आहे. यामध्ये हिंदुस्थानी महाकाव्यांच्या कथांवर आधारित नाटय़कला नृत्यातून सादर केली जाते.
कथकलीची रंगभूषा ही आगळीवेगळी आणि खूप काही शिकण्यासारखी अशी असते. कथकलीच्या रंगभूषाकाराला चुट्टीक्वारन म्हणतात. या रंगभूषेमध्ये सफेद रंग तयार करण्यासाठी चार ते सहा तास पाण्यात भिजवलेले तांदूळ गंधाप्रमाणे बारीक वाटतात व सायंकाळी रंगभूषेच्या वेळी त्यात ठरावीक प्रमाणात खाण्याचा चुना पाण्यात मिसळून एकजीव करतात. इतर रंग खोबरेल तेलात तयार करतात. याशिवाय कोरडे कुंकू व चमक आणण्यासाठी अभ्रकाची पूड वापरतात. दोन्ही कानशिलांपासून हनुवटीपर्यंत तोंडाच्या खालच्या जबडय़ात तांदूळ व चुण्याच्या मिश्रणाने केलेल्या गोलाकार विशिष्ट रंगभूषेला चुट्टी अशी संज्ञा आहे. पुरुष पात्रांच्या रंगभूषेचे हे आगळे रूप आहे. चुट्टी लावण्यास वेळ लागतो. म्हणून पात्राला झोपवूनच चुट्टी लावण्याचा प्रघात आहे.
दुःशासनाला ‘कटेश’ नावाची कागदाची गोलाकार चुट्टी नाकपुडय़ांपासून वर कपाळापर्यंत लावतात. समुद्रफेनापासून लिंबाएवढे दोन गोळे करून एक नाकाच्या शेंडय़ावर व दुसरा कपाळावर चिकटवतात. हे दिसण्यास पांढरे असतात. तसेच एक प्रकारच्या भाजीचे फूल घेऊन त्याच्या पाकळय़ा काढून टाकून, त्यातील फक्त अपक्व फळ हातावर घेऊन अंगठय़ाने ते घोळले जाते व चार-पाच मिनिटांनी ते लालसर झाले की कपडय़ात बांधून ठेवतात व प्रयोगापूर्वी त्यातील बी पाण्याने ओली करून तिचे दोन-दोन तुकडे दोन्ही पापण्यांच्या पोकळीत एक एक ठेवतात. त्यामुळे चार-पाच मिनिटांत डोळे आरक्त वर्ण होतात. अशाप्रकारे ही रंगभूषा केली जाते, मात्र अलीकडे यामध्ये बराच फरक होत गेला आणि वेगवेगळय़ा रंगांचा वापर होऊ लागला. मात्र पिढी दर पिढीत जे कथकली करतात ते मात्र आजही अशाच प्रकारचे रंग वापरतात.
कथकली मेकअपमध्ये भुवया, डोळय़ांची रंगभूषा, गंध याला खूप महत्त्व असतं. तसेच भुवयांच्या वेगवेगळय़ा आकारावरून त्यांचे शांत, क्रौद्र असे रूप दाखविले जातात. शृंगार, हास्य, रौद्र ,कारुण्य, बीभत्स, भयानक वीर, अद्भुत या सर्व रसांना सामावून घेऊन शांत रसाचाही अनुभव देणारी कथकली ही हिंदुस्थानातील एकमेव नाटय़शैली आहे. ही रंगभूषा करताना जेवढी मेहनत लागते, ती जेवढी कठीण आहे, तेवढीच ती आनंदाची अनुभूती देणारीही आहे.
महिलांचा सहभाग
कथकलीमध्ये मुख्यत्वे पुरुषच महिला आणि पुरुष अशा दोन्ही व्यक्तिरेखा रंगविताना दिसतात, मात्र अलीकडे काही महिलाही यात सहभागी होऊ लागल्या आहेत. स्त्राr पात्रांच्या चेहऱयावर चकाकणाऱया शंखजिऱयाचे चूर्ण लावले जाते. त्यामुळे त्यांच्या चेहऱयाची किंवा चेहऱयाच्या स्नायूंची हालचाल ही प्रकाशात चकाकून सहज जाणवते. तसेच पूर्वी मुखवटे वापरण्यात येत. त्याऐवजी आता रंगभूषेचा वापर होऊ लागला.
प्रत्येक रंगाला अर्थ
कथकलीच्या रंगभूषेमध्ये सफेद, पिवळा, हिरवा, निळा, काळा, लाल हे सहा रंग मुख्यत्वे वापरतात. प्रत्येक रंग लावण्याला अर्थ आहे. जसं की जर हिरव्या रंगाचा वापर करायचा असेल तर तो महान पुरुषांसाठी किंवा शालीन नायक दाखविण्यासाठी केला जातो. रावण किंवा दानव यांचा राजा दाखविण्यासाठी मानेवर लाल रंगाचा वापर करतात. या मेकअपमध्ये पाच मुख्य प्रकार असतात. ज्याला पच्चा, कत्ती, ताडी, करी आणि मिनुक. पच्चावेशम म्हणजे हिरवा मेकअप जो शालीन नायक दाखविण्यासाठी असतो. कत्तीवेशम म्हणजे खलनायकाचे चरित्र दाखविण्यासाठी याचा वापर करतात, तर ताडीवेशममध्ये तीन प्रकारच्या दाढय़ा असतात ज्या हनुमान किंवा अति मानवीय वानरांसाठी वापरल्या जातात. करीवेशन हे खास राक्षसी वेशांसाठी असते. मिनूकवेशम स्त्राr पात्र व संत ज्ञानींसाठी वापरतात. यामध्ये डोक्यांवरील भव्य वेशभूषा फार महत्त्वपूर्ण असते. या डोक्यावरच्या वेशभूषेला किरीटम असे म्हणतात. पंचुकम हे अंग वस्त्र किंवा जॅकेट आणि एक लांब लेहंगा. या लेहंग्याला कुशनच्या गादीवर घातला जातो. त्यामुळे तो फुललेला दिसतो. त्यामुळे एपंदरीतच त्याच्या वेशभूषेला भव्यत्व प्राप्त होते.
























































