
>>शुभांगी बागडे
एकात्मिक बालविकास योजनेद्वारे वेगवेगळे उपक्रम आणि योजना राबवल्या जातात. या उद्दिष्टांना अनुसरून मुलांना पूरक पोषण आहार दिला जातो. यात 3 ते 6 वर्षे वयोगटातील मुलांना अंगणवाडीमधून शिजवलेला आहार दिला जातो तर 6 महिने ते तीन वर्षे या वयाच्या मुलांसाठी मातांना टीएचआरची पाकिटे दिली जातात. तीन वर्षांखालील मुले अंगणवाडीत जाऊ शकत नसल्याने त्यांच्यासाठी पोषक आहाराची पाकिटे देणे ही या योजनेमागची संकल्पना चांगली असली तरी पोषण हक्काबाबत काम करणाऱया संस्था व संघटनांच्या निरीक्षणांनुसार टीएचआरच्या वापराबाबत प्रत्यक्ष परिस्थिती फारशी समाधानकारक नाही.
राज्य शासनाच्या एकात्मिक बालविकास योजनेचा भाग असलेली टीएचआर ही योजना. या योजनेच्या माध्यमातून 6 महिने ते तीन वर्षे वयोगटातील बालकांना पोषण आहार दिला जातो. त्यात शिरा, सातूचे पीठ व उपम्याची पाकिटे यांचा समावेश आहे. अंगणवाडीच्या माध्यमातून हा आहार देण्यात येतो. कुपोषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनातर्फे ‘टेक होम रेशन’ (टीएचआर) ही योजना राबविली जाते. मात्र ग्रामीण भाग तसेच शहरातही काही ठिकाणी ‘टीएचआर’ च्या वापराबाबत संभ्रम दिसून येतो. टीएचआर पाकिटातील अन्न मुलांच्या पसंतीस उरत नसल्याचे तसेच त्याचा योग्य लाभ होत नसल्याचेच एपूण चित्र आहे. या पार्श्वभूमीवर ‘टीएचआर’ऐवजी शिजविलेला आहार देण्याची मागणी सर्वत्र जोर पकडत आहे.
नवजात बालक ते सहा वर्षे वयोगटातील मुलांचे पोषण योग्य होणे व आरोग्यविषयक स्थिती सुधारणे ही उद्दिष्टे गाठता यावीत याकरिता एकात्मिक बालविकास योजनेद्वारे वेगवेगळे उपक्रम आणि योजना राबविल्या जातात. या उद्दिष्टांना अनुसरून मुलांना पूरक पोषण आहार दिला जातो. यात 3 ते 6 वर्षे वयोगटातील मुलांना अंगणवाडीमधून शिजवलेला आहार दिला जातो तर 6 महिने ते तीन वर्षे या वयाच्या मुलांसाठी वर्षातील 300 दिवस टीएचआरची पाकिटे दिली जातात. तीन वर्षांखालील मुले अंगणवाडीत जाऊ शकत नसल्याने त्यांच्यासाठी पोषक आहाराची पाकिटे देणे ही या योजनेमागची संकल्पना चांगली आहे, मात्र पोषण हक्काबाबत काम करणाऱया संस्था व संघटनांच्या निरीक्षणांनुसार टीएचआरच्या वापराबाबत प्रत्यक्ष परिस्थिती फारशी समाधानकारक नाही.
तीन वर्षांपेक्षा लहान मुलांना टीएचआर म्हणजेच टेक होम रेशन (गहू, सोयाबीन आणि चणा) यांच्या मिश्रणापासून उपमा पिंवा गोड शिरा तयार केला जातो. हाच पूरक पोषक आहार दिला जातो. पण टीएचआर आहार खाण्याचे प्रमाण हे केवळ 5 टक्के असून 95 टक्के टीएचआर आहार हा एकतर फेकून दिला जातो पिंवा जनावरांना दिला जात असल्याचे चित्र बव्हंशी दिसून येते. राज्यातील काही भागांत पाकिटातील आहार चांगला नसल्याने टाकून द्यावा लागण्याची वेळ येऊन ठेपली होती तर काही ठिकाणी हा आहार कोबंड्यांचे खाद्य, त्यांचा भरड़ा म्हणून वापरला गेल्याचे चित्र होते. शून्य ते तीन वर्षांचा काळ हा मुलांच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असतो. याकरिता मुलांना पोषक आहार मिळणेही आवश्यक असते. त्यामुळे सरकारच्या वतीने तीन वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी टीएचआर (टेक होम रेशन) ही योजना सुरू करण्यात आली आहे. पोषक आहाराअभावी मुलांचे कुपोषण होऊ नये हा यामागील मुख्य उद्देश आहे. मात्र टीएचआर मिळणाऱ्या मुलांपैकी केवळ 11 टक्के मुले टीएचआर नियमितपणे खात असल्याचे दिसून आले. बहुतांश पुटुंबांमध्ये टीएचआरच्या तीन प्रकारच्या पाकिटांपैकी केवळ शिऱ्यांचीच पाकिटे खाण्यासाठी वापरली जात असल्याचे आढळले.
टीएचआर न खाण्यामध्ये एक महत्त्वाचे कारण म्हणजे पाकिटातील खाद्य हे त्या त्या भागाच्या खाद्यसंस्पृतीला अनुसरून नसणे. महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धतीने पदार्थ तयार केले जातात. या प्रत्येक भागातील पिकांच्या उत्पादनात फरक असल्याने त्याच पद्धतीची खाद्यसंस्पृती अवलंबिली जाते. मात्र ‘टीएचआर’अंतर्गत दिलेल्या पाकिटातील खाद्यपदार्थ सगळीकडे एकाच चवीचे असतात. यामुळे याची चव प्रत्येक मुलाला आवडेलच असे नाही. शिवाय प्रत्येक मुलाची अन्नघटक पचवण्याची क्षमताही वेगळी असते. यामुळेच काही मुलांना सत्तू पचत नसल्याच्या तक्रारीही आल्या. यात केवळ शिऱ्याच्या पाकिटालाच मुलांची जास्त पसंती दिसून येत असल्याचेही लक्षात आले. इतकी की शिरा वगळता टीएचआरची इतर पाकिटे नकोच अशा सूचनाही आल्या. एकूणच टीएचआरमधून शासनाला अपेक्षित पोषण घटकांपेक्षा, प्रत्यक्षात मात्र मुलाला खूपच कमी पोषण घटक मिळत असल्याचेच दिसून येतेय. या पदार्थांमधून मुलांची उष्मांक, प्रथिने यांची पूर्ण गरज भागवली जात नाही हेही लक्षात येते.
यातील दुसरी त्रुटी म्हणजे ही पाकिटे मुलांना घरी देण्यात येतात. घरी गेल्यानंतर या पाकिटातील पदार्थ मुलेच खात असतील का, मुलांना प्रत्यक्ष याचा लाभ मिळतोय का? या प्रश्नांची उत्तरे मिळणे सहज शक्य नाही. पाकिटातील खाऊ असो वा शिजवलेला आहार, पूरक आहार वेळेवर मिळतो का, त्याची गुणवत्ता कशी आहे, हा आहार मुलांना आवडतो का याबद्दल लोकांची मते, अनुभव तसेच सूचना समजून घेण्यासाठी शासनाने लोकाधारित देखरेख प्रक्रियेच्या धर्तीवर गावपातळीवरील माता गट, गाव आरोग्य व स्वच्छता समिती यांच्याकडून वेळोवेळी माहिती घेऊन त्यानुसार योजनांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.
काही भागांत घरापासून अंगणवाडीपर्यंतचे अंतर जास्त असल्यामुळे अंगणवाडीतून दिला जाणारा शिजवलेला आहार घेण्यासाठी रोज जाणे शक्य होत नाही. अशा वेळी पाकिटातील खाऊ ही संकल्पना योग्य ठरते. मात्र मुलांच्या पोषणासाठी शिजवलेला आहार हाच योग्य पर्याय आहे. वयाची पहिली दोन वर्षं लहान मुलांच्या शारीरिक आणि बौद्धिक वाढीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची समजली जातात. याच काळात मुले पुपोषित होण्याची शक्यतादेखील जास्त असते. म्हणूनच या वयात मुलांना सकस, पोषक आहार मिळणे गरजेचे आहे. यासंदर्भात तीन वर्षांखालील मुलांचे पोषण सुधारण्यासाठी टीएचआर ही शासनाची खरेतर एकमेव योजना आहे, परंतु या योजनेच्या अभ्यासातून टीएचआरबाबत जे काही चित्र पुढे आले त्यातून या योजनेच्या उपयुक्ततेवरच प्रश्नचिन्ह उभे राहते. शासनाकडून लहान मुलांचे पोषण सुधारण्यासाठी पूरक आहार मिळणे गरजेचे आहे, पण तो आहार योग्य प्रकारचा व योग्य पद्धतीने देणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
ताजा सकस आहार ही पुपोषणमुक्तीची प्रभावी मात्रा आहे. केवळ या उपायाने 30 ते 40 टक्के पुपोषण कमी करता येणे शक्य आहे. त्यामुळे या मुद्द्यावरही सरकारने विचार करायला हवा.
: मुलांची पसंती ही शिजवलेल्या आहारालाच असते आणि तोच देण्यात यावा. पाकीट बंद आहार देण्यापेक्षा स्थानिक पातळीवर बचत गट, महिला मंडळामार्फत मुलांना ताजा गरम आहार देता येऊ शकतो. राज्यात अमरावतीसारख्या काही भागात टीएचआरऐवजी शिजवलेला आहाराचा प्रयोग करण्यात आला आहे आणि तेथील अनुभवही चांगला आहे. ताज्या आहारासेबतच लाडू, लाह्या, चिक्की असे कोरडे, टिकाऊ पौष्टिक पदार्थ तसेच स्थानिक उपलब्धतेनुसार असणारी फळं हे पदार्थ मुलांना देता येऊ शकतात. आदिवासी भागात अमृत आहार योजना राबवली जाते. जी परिपूर्ण आहे. याच संकल्पनेवर आधारित योजना राज्यात राबवली गेली तर याचा नक्कीच फायदा होऊ शकतो.
– अभिजित मोरे, जन आरोग्य अभियान
[email protected]





























































