
>> डॉ. सुधा कांकरिया
श्रावण महिन्यातील पौर्णिमेला येणारा रक्षाबंधन हा सण संपूर्ण देशभरात आनंदाने, उत्साहाने साजरा होत असतो. आपल्याकडे रक्षाबंधनाच्या परंपरेला आध्यात्मिक पार्श्वभूमी आहे. हिंदुस्थानी संस्कृतीच्या परंपरेनुसार आपली एक पत्नी सोडून इतर सर्व स्त्र्ाया आपल्या भगिनीसमान आहेत, अशी शिकवण आहे. त्यामुळेच अगदी मुलगीदेखील वडिलांना राखी बांधू शकते. ही शिकवण म्हणजे हिंदुस्थानी संस्कृतीचा पाया आहे. मनाची शुद्धता किंवा व्यक्तीमधील पवित्रता टिकवण्यासाठी राखीपौर्णिमेचा सण साजरा केला जातो. राखीपौर्णिमेला बहीण भावाला ओवाळते आणि भाऊ आपल्या बहिणीला भेटवस्तू देतो, त्याचबरोबर तिच्या रक्षणाची जबाबदारी घेतो. आपल्या संस्कृतीत मुलगा आणि मुलगी या दोन्हींमध्ये समानता ठेवली आहे. पण अलीकडील काळात त्याचा विसर पडत चालला आहे. त्यामुळेच रक्षाबंधनासारख्या सणांमागचा मूळ हेतूच आज हरवत चाललेला दिसतो. मनाची शुद्धता आणि सामाजिक पवित्रता जपणे हा या सणाचा गर्भितार्थ आहे.
गेल्या काही वर्षांत समाजाचा महिलांकडे पाहाण्याचा दृष्टिकोन बदलला. लहान-मोठी, गरीब-श्रीमंत अशा कोणत्याही प्रकारच्या स्त्रीकडे मादी म्हणून पाहणाऱयांची संख्या मोठी आहे. या दूषित दृष्टिकोनामध्ये बदल होण्यासाठी शुद्धीकरणाची आवश्यकता आहे. त्यासाठी आत्मपरीक्षण, आत्मचिंतन होणे गरजेचे आहे. राखीपौर्णिमेच्या निमित्ताने सर्वांनीच ते करणे आवश्यक आहे. सर्व महिलांकडे बहीण म्हणून पाहणे, त्यांच्याविषयी स्नेहपूर्ण आदर बाळगणे आणि प्रत्येकीला आदरसन्मान देणे ही आजच्या काळाची गरज आहे. अलीकडील काळात समाजात महिलांच्या बाबतीत गैरवर्तनाच्या घटनांत वाढ झाली आहे. एक पाऊल मागे फिरून आत्मपरीक्षण केले पाहिजे. त्यासाठी राखीपौर्णिमेचा सण ही एक पर्वणी किंवा सुसंधी आहे असे मानायला हवे.
राखीपौर्णिमा सण साजरा करताना बहिणींनी भाऊरायाकडे वेगळ्या स्वरूपाची मागणी केली पाहिजे. त्याबाबत मी म्हणेन –
यंदाच्या राखीला, एवढेच मागणे भावाला,
वाचव रे चिमुकलीला, जगव रे मुलीला,
सन्मान दे रे बहिणीला, सन्मान दे रे प्रत्येक स्त्रीला.
अशी मागणी सर्वच बहिणींनी आपल्या भावाकडे केली पाहिजे. याचे कारण समाजात स्त्र्ायांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी केवळ मुलींना सक्षम करण्याची आवश्यकता नसून मुलांमध्येही वैचारिक परिवर्तन घडवून आणले पाहिजे. त्यांच्या भावना बदलण्यासाठी संस्कारक्षम वयातील मुलांमध्ये, महाविद्यालयातील मुलांमध्ये, इंटरनेटच्या अधीन जाणाऱयांमध्ये मोठय़ा प्रमाणावर प्रबोधन होणे गरजेचे आहे. मुलांमध्ये, पालकांमध्ये स्त्र्ायांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाबाबतची जाणीवजागृती निर्माण होणे आवश्यक आहे. त्यासाठी तसे संस्कार करावे लागतील. संस्कारांचीही एक शक्ती असते. ती शक्ती कुटुंबाबरोबरच शाळा आणि समाज यांच्यापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. गेल्या काही वर्षांत यासाठी आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यशाळा सुरू केल्या आहेत. घरातील मोठय़ांचे अनुकरण मुलं करत असतात. त्यामुळे आईवडिलांनी एकमेकांशी जबाबदारीने वागले पाहिजे. महिलांचा, मुलींचा आदर केला पाहिजे याचे संस्कार घरातून होणे आवश्यक आहे. कुटुंबामध्ये मुलगा-मुलगी असा भेदभाव दिसता कामा नये. वडील आईशी योग्य वागत नाहीत असे मुलांच्या नजरेस पडले तर त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात. त्यामुळे आम्ही काwटुंबिक स्तरावर काम करण्यास आरंभ केला. कारण स्त्र्ायांचा आदर करतो हे केवळ सांगून उपयोगाचे नाही, तर आचरणातून मुलांच्या मनावर कसे बिंबवता येईल याचा विचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी मुले आणि पालक यांच्यासाठी चार प्रकारे आम्ही काम करतो. मनाची शक्ती वाढवण्यासाठी माइंड पॉवर ही कार्यशाळा घेतो. त्याचप्रमाणे संस्कारांची शक्ती वाढवण्यासाठी ‘संस्कार पॉवर’ ही कार्यशाळा घेतो. स्वसंरक्षणाच्या कार्यशाळेमध्ये ज्युडो, कराटे आणि शारीरिक तंदुरुस्ती यासाठीचे प्रशिक्षण दिले जाते. तसेच स्थानिक पातळीवर आपण काय सुरक्षा देऊ शकतो याचा विचार करून त्यानुसार कृतीकार्यक्रम राबवला जातो. यामध्ये शाळेत तक्रार पेटी ठेवणे, स्थानिक पातळीवर हेल्पलाइन उपलब्ध करून देणे, गावांमध्ये सरपंच, शाळेचे मुख्याध्यापक, पोलीसपाटील, गावातले पत्रकार यांचा समावेश असणारी सुरक्षा समिती स्थापन करणे यांचा समावेश असतो. या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
या कार्यशाळांमधून एक गोष्ट लक्षात आली की, वाकडा किंवा वाईट विचार करणाऱया मुलांचे प्रमाण खूप कमी आहे. पण या थोडक्या मुलांच्या अग्रेसिव्ह वागण्यामुळे सर्व वातावरण कलुषित होते. या नकारात्मक मुलांना आपल्यामध्ये सामील करून घेतल्यास त्यांच्यावरही दबाव येणार आहे. त्या मुलांना त्यांचेच मित्र ठणकावून सांगू शकतील, अडवू शकतील अशा पद्धतीने आम्ही हा प्रकल्प राबवत आहोत. त्याचे चांगले परिणाम येत्या काळात दिसून येतील. त्याचप्रमाणे सामूहिक रक्षाबंधनाचे कार्यक्रम महाविद्यालये, बिगरशासकीय संस्था, अधिकारी यांबरोबरच शाळेला पेंद्रस्थानी ठेवून केले जाणे गरजेचे आहे. शाळेतूनच समानतेचा, स्त्र्ायांविषयीच्या स्नेहपूर्ण आदरभावाचा संस्कार केला गेल्यास त्याचा भविष्यात चांगला उपयोग होईल. मुलींच्या जन्माचा आनंद आणि तिला सन्मानाने जगण्यासाठी मोकळे वातावरण मिळवून देण्याच्या उद्देशाने आम्ही हे करतो. गेल्या 30 वर्षांपासून हे काम सुरू आहे. संपूर्ण महाराष्ट्रात सामूहिक रक्षाबंधनाचा कार्यक्रम दहा वर्षांपूर्वी सुरू करण्यात आला. या सर्वांमधून रक्षाबंधनाच्या ‘बंधना’ला खरा अर्थ प्राप्त व्हावा हीच सदिच्छा आहे. समाजामध्ये सर्वत्र जर हे स्त्र्ााr-पुरुष समानतेचे संस्कार रुजले आणि त्यानुसार वर्तणुकीत परिवर्तन घडून आले तर स्त्राrसंरक्षणाच्या कायद्यांची गरजच उरणार नाही. रक्षाबंधनाच्या निमित्ताने या संस्कारबीजांची पेरणी करण्याचा संकल्प सर्वांनी मिळून करूया.
आपली एक पत्नी सोडून इतर सर्व स्त्र्ाया आपल्या भगिनीसमान आहेत, अशी हिंदुस्थानी संस्कृतीची शिकवण आहे. परंपरेने मुलगा आणि मुलगी या दोन्हींमध्ये समानता ठेवली आहे. रक्षाबंधनासारखा सणही तीच शिकवण देतो. पण आधुनिकीकरणाच्या युगात आपल्याला त्याचा विसर पडला आहे. आज बदलत्या काळात आणि बदलत्या परिस्थितीत सर्व महिलांकडे बहीण म्हणून पाहणे, त्यांच्याविषयी स्नेहपूर्ण आदर बाळगणे आणि प्रत्येकीला आदरसन्मान देणे ही मूल्ये रुजवणे काळाची गरज बनली आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने या सणांचे प्रयोजन आपल्या संस्कृतीमध्ये कोणत्या अंगाने केले गेले आहे, त्यामागचा सामाजिक आणि परंपरागत आशय काय आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. तरच या सण-उत्सवांची कालातीतता आणि महत्त्व लक्षात येईल.
(लेखिका सामाजिक कार्यकर्त्या आहेत)



























































