सौदीची कॅनडाशी कुस्ती!

364

>> डॉ. विजय ढवळे, ओटावा-कॅनडा

सौदी अरेबिया तेलाने न्हाऊन निघालेला देश. जगात असलेल्या उपलब्ध तेलाच्या साठय़ापैकी 25 टक्के तेल या एकाच देशात आहे. अर्थात ते शोधून काढण्यात ब्रिटिश, अमेरिकन येथील तंत्रज्ञानच वापरले गेले आहे. जसजशी औद्योगिक क्रांती जगातल्या अनेक देशांत पसरू लागली तसतशी तेलाची मागणी वाढू लागली. सौदीला आपल्याकडे निसर्गाने दिलेल्या या अनमोल ‘काळय़ा सोन्या’ची प्रथम जाणीव झाली ती 1973 मध्ये. इजिप्तच्या अन्वर सदाने अकस्मात इस्रायलवर त्याच्या धार्मिक सणाच्या सुट्टीच्या दिवशी हल्ला चढवला. सुरुवातीला जरी इस्रायलला त्याचा अंदाज आला नव्हता तरी नेहमी लष्कर सज्ज असलेल्या इस्रायलने सदातला पिटाळून लावले. अमेरिकेचा अध्यक्ष निक्सनने इस्रायलला पाठिंबा दिला. त्यामुळे सौदीचा तिळपापड झाला आणि त्यांनी तेलाचे भाव एका रात्रीत चौपटीने वाढवले! तेव्हा अमेरिका त्यांना लागणाऱया तेलापैकी 46टक्के सौदीकडून घेत होती. त्यामुळे फटका जबरदस्त बसला आणि अमेरिकेत पेट्रोल पंपांसमोर लांबलचक रांगा दिसू लागल्या. त्यावरून धडा घेऊन अमेरिकेने आपले देशांतर्गत तेल उत्पादन झपाटय़ाने वाढवले.

कॅनडाची 80 टक्के निर्यात दरवर्षी अमेरिकेबरोबर होत असते. रोजचा 2 देशांमधील व्यापार हा 10 हजार कोटी रुपयांचा आहे. त्यामुळे कॅनडा मानवी हक्कांची पायमल्ली करणाऱया देशांवर अधूनमधून टीकास्त्र्ा सोडत असते. कॅनडा जरी तेलसमृद्ध देश असला तरी इतका अजस्र आहे की, देशाच्या पूर्वेस असलेल्या 5 राज्यांना पश्चिम कॅनडातून तेलपुरवठा करण्यापेक्षा सौदीतून तेल आयात करणे जास्त परवडते! सौदीत व्यक्तिस्वातंत्र्य नाही. स्त्रियांच्या हक्कांची तर मूलभूत पायमल्ली होत असते. त्याचे मूळ आहे मुस्लीम धर्माच्या स्त्र्ायांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात. त्यांच्यावर पुरुषांचेच स्वामित्व असले पाहिजे ही विचारसरणी 56 मुस्लीम देशांमध्ये आहे. अपवाद इंडोनेशिया.

रैफ बदानी हा मुस्लीम धर्मीय. त्याने पत्नीसह व 3 मुलांसमवेत कॅनडात प्रवेश केला. नागरिकत्वही मिळवले. त्याने मुस्लीम धर्मातील मागासलेपणा हुकूमशाही तसेच स्त्र्ायांना जखडून ठेवणे अशा गोष्टींवर लेख लिहिले. सडकून टीका केली. हे सर्व सौदी सरकार नोंद करत होते. जून 2018 मध्ये नागरिकत्वाचे चिलखत आपणांस तारून नेईल अशा भ्रमात त्याने सौदीत प्रवेश केला. त्याला त्वरित अटक झाली. इस्लामचा अपमान करण्याचा अक्षम्य गुन्हा त्याने केला होता. त्यामुळे त्याला तुरुंगात पाठवले गेले. अर्थात, खटल्याचा फार्स झालाच. न्यायाधीशाने बदानीला 14 वर्षे सक्त कैद आणि 100 चाबकाचे फटके अशी शिक्षा फर्मावली!

आपल्या नागरिकांना तुरुंगवास भोगायला लागतो हे कॅनेडियन सरकारच्या पचनी पडणे शक्यच नव्हते. पराराष्ट्रमंत्री ख्रिस्तिया फ्रीलंड हिने ट्विटरवर सौदीचा निषेध केला आणि स्त्र्ााrहक्क पायदळी तुडवणाऱया नागरिकांना कैदेत डांबून त्यांना 1 हजार चाबकाचे फटके देणाऱया शिक्षेचा कडाडून विरोध केला. त्यामुळे सौदी सरकार खवळले. वास्तविक अशा प्रकारची टीका यापूर्वीही अमेरिका, ब्रिटन अशा राष्ट्रांनी केली आहे, पण तेव्हा सौदीने काणाडोळा केला होता. कारण अमेरिकेकडून तेल खरेदीसाठी भरपूर डॉलर्स मिळतात आणि बरेच अतिश्रीमंत सौदी नागरिक ब्रिटनमध्ये कायमचे वास्तव्य करत आहेत व सौदीची त्या देशात प्रचंड गुंतवणूक आहे. पण कॅनडा त्यामानाने Soft Target होते. कारण व्यापार तसा नगण्यच.

सौदीत राजेशाही आहे. राजाचा जनानखाना मोठा असतो. त्याला अनेक औरस व अनौरस मुले असतात. त्यापैकी एकाची- अर्थात मुलगा याची तो निवड त्याच्या हयातीतच करतो की माझ्यानंतर हा मुलगा तख्तावर येईल. सध्याचा सौदी राजा हादेखील वृद्धावस्थेत आहे. अगदी शेवटच्या घटकेला आपला वारस जाहीर करण्यापेक्षा त्याने आपला 30 वर्षीय मुलगा महंमद बिन सलमान (जो MBS या त्याच्या आद्याक्षरांनी ओळखला जातो) याला युवराज म्हणून जाहीर केले.

हा महंमद कित्येक वर्षे अमेरिकन युनिव्हर्सिटीत शिकायला होता. फर्डे इंग्रजी बोलतो. तो उदारमतवादी असल्याची जनतेची धारणा होती. त्याने आपल्या कारकीर्दीची सुरुवात आता स्त्र्ायांना मोटार ड्रायव्हिंगचा हक्क देण्यात येईल असे जाहीर करून केल्याने स्त्र्ााrमुक्ती कार्यकर्ते खूष झाले. त्याप्रमाणे जून 2018 पासून स्त्र्ायांना ड्रायव्हिंगचा परवाना मिळू लागला पण बंधने आहेतच. तिच्या शेजारी पुरुषाची उपस्थिती हवी. बरं, हा परवाना असला तरी तिचं बुरखाधारी रूप कायम ठेवलं. तरीही सुरुवात आहे असे मानून लोकांनी त्याची तारीफ करण्यास सुरुवात केली. महंमद हा बाहेरच्या जगाला कितीही उदार मनाचा वाटत असला तरी तो ज्या मुशीत जन्मला, वाढला त्याचा तर जबरदस्त परिणाम आहेच. एका बाजूला स्त्र्ायांना गाडी परवाना देण्याची ‘क्रांतिकारक’ घोषणा तर दुसरीकडे स्त्र्ााr हक्कांसाठी लढणाऱया सुमारे 200 व्यक्तींना तुरुंगात डांबणे हे त्याने केलेच. त्याला स्त्र्ााr मुक्ती ही कल्पनाच पाश्चिमात्य आणि अनैसर्गिक वाटते!

कॅनडाच्या बाबतीत खार खाण्याचे महंमदला तसे सबळ कारण नव्हते. तरीही तो काही गोष्टींच्या विरोधात होता. समान हक्काच्या पुरस्कर्त्या पंतप्रधान ट्रुडोने त्यांच्या मंत्रिमंडळात 32 पैकी 16 स्त्र्ायांना स्थान दिले हे त्याला आवडले नव्हते. त्यातही कॅनडाची परराष्ट्रमंत्री स्त्र्ााr? अगदीच अब्रह्मण्यम्! म्हणून तो अशी संधी शोधत होता की तुमच्या सुधारणा, स्त्र्ााrस्वातंत्र्य तुमच्या देशात काय ते राबवा. आम्हाला तसे करायला सांगू नका आणि भरीस पाडू नका. सौदीत स्त्र्ायांना कसे वागवायचे ते आम्ही बघू. त्या सर्व गोष्टी आपल्या कृतीद्वारे जगासमोर आणण्याची संधी त्याला फ्रीलंड या कॅनडाच्या परराष्ट्रमंत्रीच्या ट्रिपने दिली. आम्ही कसे वागावे हे तुम्ही कोण सांगणार, अशा गुर्मीत त्याने कॅनडावर पहिला प्रहार ऑगस्ट 2018च्या पहिल्या आठवडय़ात केला. आपला कॅनडातला राजदूत माघारी बोलावला आणि रियाधमधील कॅनेडियन राजदूताला 24 तासांत देश सोडून सांगण्यास फर्मावले. कॅनडाने 3 वर्षांपूर्वी सौदीबरोबर 900 चिलखती मोटारी पुरवण्याच्या करारावर सही केली होती. तो 15 अब्ज डॉलर्सचा व्यवहार होता. महंमदने त्या करारावर आपली कात्री चालवली व तो रद्द केला. ‘सौदिया’ विमानाच्या आठवडय़ातून 2 फ्लाईटस् टोरांटोला यायच्या. त्या तडकाफडकी रद्द केल्या.

परंतु सर्वात मोठा हातोडा पडला तो कॅनडात शिकणाऱया सौदी विद्यार्थ्यांवर. त्यांना कॅनडासारख्या प्रतिष्ठत देशाच्या युनिव्हर्सिटीत वा कॉलेजात प्रवेश मिळाला की, त्यांचा सर्व खर्च सौदी सरकार करायचे. तोच वर्षाला 30 ते 80 हजार डॉलर्स यायचा. असे 156 हजार सौदी विद्यार्थी सध्या कॅनडात शिकतात. त्यांच्याबरोबर राहणारे कुटुंबीय धरले तर ही संख्या 20 हजारांच्या घरात जाते. म्हणजे कॅनडाला यामधून दरवर्षी अब्जावधी डॉलर्सची कमाई होते. महंमदने यापुढे आमचे सरकार सौदी विद्यार्थ्यांकरिता एकही डॉलर देणे नाही, असे जाहीर केले. त्यामुळे पुढील महिन्यात, सप्टेंबर 2018 मध्ये ऍकॅडमिक वर्ष चालू करणाऱया सौदी विद्यार्थ्यांना तर येता येणार नाहीच, पण जे सध्या कॅनडात शिकत आहेत, त्यांचा 100 टक्के खर्च उचलणाऱया शिष्यवृत्त्याही सौदीने एका फटक्यात बंद केल्या आहेत.

सौदीने आपला तिसरा डोळा उघडला आणि त्या संतापाच्या लाटेत कॅनडाबरोबर होणारा 15 अब्ज डॉलर्सचा व्यापार भस्मसात झालाच, पण सुमारे 20 हजार विद्यार्थी व त्यांच्या पालकांना त्यांच्या शिष्यवृत्त्या बंद करून अमेरिका-ब्रिटन या देशांतल्या युनिव्हर्सिटीत स्थलांतरित करण्यात येणार आहे. फ्रीलंडने ट्विट करून सौदीचा अपमान केला असे सौदीचे म्हणणे आहे. त्यात तथ्य नाही. परंतु राजकारण्यांनी किती जपून वागावे, बोलावे, ट्विटवर लिहावे हेच त्यामुळे स्पष्ट झाले. देशाचे नुकसान तर झालेच, पण तुमच्या आगपाखडीचा सौदीवर तिळमात्रही परिणाम झाला नाही.

मग फ्रिलंडने साधले काय, असा सवाल विरोधक विचारत आहेत. ते काही असले तरी सौदीने कॅनडाशी जी कुस्ती आरंभली आणि धोबीपछाड दिली त्यामध्ये हिंदुस्थानी विद्यार्थ्यांचा जबरदस्त फायदा होऊ शकतो. कारण 20 हजार विद्यार्थी एका रात्रीत गमावणे हा कॅनेडियन युनिव्हर्सिटीज्ना फार मोठा धक्का बसला आहे. त्यावर उतारा म्हणून हिंदुस्थानी शिक्षण संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे. असे म्हणतात की, संधी दाराशी येते आणि घरात किती शहाणपण आहे याची प्रथम चौकशी करते. हिंदुस्थानी शिक्षण संस्था असा शहाणपणा दाखवतील काय?

(लेखक कॅनडास्थित उद्योजक आहेत)

आपली प्रतिक्रिया द्या