
>>विवेक दिगंबर वैद्य
त्र्यंबकेश्वर परिसराचे महत्त्वाचे आकर्षण आहे ते श्रीत्र्यंबकेश्वराचे मंदिर. जागृत आणि स्वयंभू शिवलिंगाचे हे क्षेत्र पुरातन ज्योतीर्लिंगापैकी महत्त्वाचे ज्योतीर्लिंग क्षेत्र आहे. त्र्यंबक या शब्दाची फो़ड ऋिअंबर अशी केली जाते. त्रि म्हणजे तीन आणि अंबक म्हणजे डोळे. जो तीन डोळ्यांचा अर्थात त्रिनेत्रधारी अशा श्रीशंभुमहादेवाचे हे स्थान आहे. गायत्री-सावित्री आणि सरस्वती या तिन्ही देवतांचे एकत्रित वास्तव्य येथे असल्यामुळे या क्षेत्राला ‘त्रिसंध्या क्षेत्र’ असेही म्हणतात. महाभारत ग्रंथात श्रीत्र्यंबकेश्वराचा उल्लेख आढळतो. त्र्यंबकगडाची पार्श्वभूमी लाभलेले हे क्षेत्र भक्तांच्या गर्दीने अव्याहत गजबजलेले असते.
नाशिक तीर्थक्षेत्र परिसरात ‘शक्ती’चे प्राबल्य दिसते तसेच ‘शिवा’चा प्रभावही आढळून येतो. श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वराच्या निमित्ताने येथे श्रीशंभुमहादेव जागृत स्वरूपात विलसत आहे. हिंदुस्थानातील श्रीशिवशंकराच्या बारा ज्योतार्ंलगांपैकी महत्त्वाचे असे ‘श्रीक्षेत्र श्रीत्र्यंबकेश्वर’ नाशिक परिसराचे पावित्र्य दृढ व चिरंतन राखणारे क्षेत्र आहे. दर बारा वर्षांनी भरणाऱया कुंभमेळ्यामुळेदेखील हे क्षेत्र जगप्रसिद्ध झाले आहे. या दिवसात देशाच्या कानाकोपऱयातून हजारो साधू, संत-महंत यांच्या उपस्थितीने श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर ओसंडून वाहात असते. पुंभमेळ्याचा कालावधी वगळता अन्य काळात वर्षाकाठी हजारो शिवभक्त श्रीत्र्यंबकेश्वर दर्शनाच्या ओढीने येथे येत असतात.
नाशिक शहरापासून तिसेक कि.मी. अंतरावर असलेल्या त्र्यंबकेश्वर परिसरास मुंबई, पुणे व महत्त्वाच्या शहरांपासून विविध प्रवासमार्गाने भेट देता येते. धर्मशाळा, लॉजेस, हॉटेल्स तसेच भक्तनिवास यांच्या उपलब्धतेमुळे त्र्यंबकेश्वर येथे मुक्काम करून सभोवतालची पुण्यक्षेत्रे, पावनस्थळे पाहता येतात. त्र्यंबकगडाची पार्श्वभूमी लाभलेले हे क्षेत्र भक्तांच्या गर्दीने अव्याहत गजबजलेले असते.
त्र्यंबकेश्वर परिसराचे महत्त्वाचे आकर्षण आहे ते श्रीत्र्यंबकेश्वराचे मंदिर. जागृत आणि स्वयंभू शिवलिंगाचे हे क्षेत्र पुरातन ज्योतीर्लिंगांपैकी महत्त्वाचे ज्योतीर्लिंग क्षेत्र आहे. त्र्यंबक या शब्दाची पह्ड त्रि+अंबर अशी केली जाते. त्रि म्हणजे तीन आणि अंबक म्हणजे डोळे. जो तीन डोळ्यांचा अर्थात त्रिनेत्रधारी अशा श्रीशंभुमहादेवाचे हे स्थान आहे. गायत्री-सावित्री आणि सरस्वती या तिन्ही देवतांचे एकत्रित वास्तव्य येथे असल्यामुळे या क्षेत्राला ‘त्रिसंध्या क्षेत्र’ असेही म्हणतात. महाभारत ग्रंथात श्रीत्र्यंबकेश्वराचा उल्लेख आढळतो.
श्रीत्र्यंबकेश्वराचे मंदिर भव्य, देखणे असून या मंदिर परिसराच्या जीर्णोद्धारामागे पेशवे कुटुंबीयांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. श्रीमंत बाळाजी बाजीराव तथा नानासाहेब पेशवे यांनी जीर्णोद्धारप्रसंगी बराच पुढाकार घेतला. त्यानंतर थोरले आणि सवाई माधवराव हे द्वय तसेच गोपिकाबाई, आनंदीबाई यांनीदेखील मंदिराच्या जीर्णोद्धारप्रसंगी सढळहस्ते मदत केल्याचे सांगितले जाते.
एकदा काही कारणांवरून श्रीब्रह्मा आणि श्रीमहेश्वरामध्ये वाद झाला व तो विकोपाला गेला तेव्हा श्रीमहेशाने श्रीब्रह्मदेवाना शाप दिला, ‘तू पर्वत होऊन पृथ्वीतलावर पडशील आणि कुणीही तुझी पूजा करणार नाही,’ त्यावर श्रीब्रह्मदेवांनी श्रीशंभुमहादेवांना प्रतिशाप दिला की, ‘मी पृथ्वीलोकावर जिथे कुठे पर्वतस्वरुपात पडेन तिथे तुला माझ्यासन्निध राहावे लागेल.’ या दोन्ही श्रेष्ठ देवांची वाणी प्रत्यक्षात उतरली आणि ब्रह्मदेव पृथ्वीतलावरील हिंदुस्थान प्रांतात नाशिक परिसरातील ब्रह्मगिरी पर्वताच्या रूपाने स्थिर राहिले आणि त्यांच्या सान्निध्यात राहून श्रीशंभुमहादेवांना श्रीत्र्यंबकेश्वराच्या रूपाने साथसोबत करावी लागली. आजदेखील आपणास श्रीत्र्यंबकेश्वराच्या सान्निध्यात त्याच्या पाठीशी उभा असलेला ब्रह्मगिरी पर्वत पाहावयास मिळतो. ही कथा लोकपरंपरेनुसार चालत आलेली आहे.
श्रीत्र्यंबकेश्वर परिसराचे माहात्म्य प्राचीन स्वरूपाचे आहे. रामायणकाळात श्रीरामचंद्रांनी आपल्या पित्याचे अर्थात दशरथराजाचे श्राद्ध ब्रह्मगिरी पर्वतानजीक गोदावरीच्या उगम स्थानी केले असा संदर्भ आहे. पूर्वी येथे गौतमऋषींचा आश्रम होता. येथील ब्रह्मगिरी पर्वत श्रीनाथ संप्रदायातील श्रीगोरक्ष आणि श्रीगहिनीनाथांच्या वास्तव्यखुणा दर्शवितो. येथील गुहा श्रीगहिनीनाथांच्या तपःसामर्थ्याने भारलेली आहे. या पर्वताच्या पायथ्याशी श्रीनिवृत्तीनाथांची समाधी असून येथे श्रीज्ञानेश्वर, श्रीतुकाराम, श्रीनामदेव अशा संतश्रेष्ठांचे वास्तव्य झाले आहे.
श्रीत्र्यंबकेश्वराचे मंदिर दगडी बांधणीचे प्रशस्त आणि आखीवरेखीव आहे. मंदिराच्या चारही बाजूने चिरेबंदी दगडी कोट असून चारही बाजूंनी येण्याजाण्याकरिता प्रवेशद्वार आहे. तटाबाहेर श्रीराम, श्रीपरशुराम, श्रीकृष्ण, श्रीगंगादेवी, श्रीलक्ष्मीनारायण यांची मंदिरे असून मागील बाजूस श्रीशंभुमहादेव आणि वेदमाता गायत्रीचे मंदिर आहे. पुढील बाजूस उत्कृष्ट कोरीव शिल्पकलेने समृद्ध रचनेतून साकारलेले श्रीत्र्यंबकेश्वराचे मंदिर हेमाडपंथी धाटणीचे आहे. प्रवेशद्वारापाशी नगारखाना असून मंदिरासमोर भव्य, देखणी दगडी दीपमाळ आहे. उंच जोत्यावर मंदिराची उभारणी केलेली असून हे मंदिर सभामंडप, द्वारमंडप आणि गाभारा अशा तीन प्रकारात विभागलेले आहे. शिवासमोर बसलेल्या नंदीसाठी स्वतंत्र मंदिराची व्यवस्था आहे. प्रवेशद्वारावर द्वारपाल, दिक्पाल आहेत. सर्वत्र उत्तम व उत्कृष्ट कोरीव कलाकुसर केलेली येथे दिसून येते. सभामंडपातील कोपऱयात अष्टभैरव तसेच अन्य देवतांच्या मूर्ती आहेत.
गाभाऱ्यात विराजमान झालेला श्रीत्र्यंबकेश्वर वैशिष्टय़पूर्ण आहे. हिंदुस्थानातील हे एकमेव असे शिवालय आहे की जिथे शिवलिंग दिसत नाही. कारण येथे केवळ वालुकामय पाषाणातील शाळुंका पाहण्यास मिळते. या शाळुंकेच्या मध्यभागी खळगा आहे. या खळग्यात श्रीब्रह्मा-श्रीविष्णू आणि श्रीमहेश्वराची लहान आकारातील तीन स्वयंभू लिंगे आहेत. हा खळगा जवळपास कळशीभर पाणी मावेल इतका खोल व रुंद आहे. श्रीत्र्यंबकेश्वराचे दर्शन भाविकांना सतत घडावे याकरिता मागील बाजूस विशिष्ट प्रकारे बसविलेल्या आरशात पडलेले श्रीत्र्यंबकेश्वराचे प्रतिबिंब भाविकांना पाहता येते. गाभाऱयात सोवळे नेसून प्रवेश दिला जातो. गाभाऱयात प्रामुख्याने ब्रह्मवृंदच असतो.
श्रीत्र्यंबकेश्वराची त्रिकाळ पूजा विधिवत मंत्रजयघोषात पारंपरिक पद्धतीने होते. सोमवारी, श्रावण सोमवारी, महाशिवरात्रीच्या दिवशी तसेच श्रीशिवस्मृतीच्या निमित्ताने येथे भाविकांची विशेषतः शिवभक्तांची गर्दी उसळलेली दिसते. विधिवत पूजा झाल्यावर श्रीत्र्यंबकेश्वराला हिरे-माणके-पाचू आदी रत्नांनी सजवलेला मुकुट परिधान केला जातो. दर सोमवारी, श्रीत्र्यंबकेश्वराचा मुकुट पालखीत घालून मोठय़ा जल्लोषात श्रीशिवनामाचा गजर करीत ज्या कुशावर्त तीर्थावर नेला जातो त्या कुशावर्त तीर्थाचे स्थानमाहात्म्य पुढील लेखात पाहूया.






























































