
>> मीना नाईक
सुरुवातीला लॉकडाऊन सुरू झाले तेव्हा ते इतकं गंभीर असेल, पुढे इतके दिवस चालेल याचा अंदाज नव्हाता. थोडे दिवस असेल, चला आराम करू या, पुस्तकं वाचूया असं माझं पहिले काही दिवस सुरू राहिलं. मी लहान मुलांच्या कविता वाचल्या, विशेषत: विंदा करंदीकर यांच्या! पुढे लॉकडाऊन वाढल्यावर आता काय करायचं हा प्रश्न आला. मला क्रिएटिव्हा काम करायला खूप आवडतं. मग एका दैनिकासाठी पपेट कसं करायचं याचं ऑनलाईन वर्कशॉप घेतलं. यात माझा बराचसा वेळ गेला. त्यानंतर मी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मकर एक मार्गदर्शनपर व्हिडिओ अपलोड केला. एका सायकोथेरपिस्टने मला विचारलं होतं की, तुम्ही लॉकडाऊनमध्ये मुलांना काय सांगाल. त्यादृष्टीने मी तो व्हिडिओ तयार केला होता. खरं तर मानसशास्त्र्ााचे अभ्यासक सांगतात की कंटाळा मधून-मधून यावा; थोडंसं बोअर पण वाटावं. त्यामुळे तुम्ही नका विचार करू लागता, तुमच्या मेंदूला चालना मिळते. त्यातूनच काहीतरी सर्जनशील निर्मिती होते.
खरं तर मला प्रत्यक्ष मुलांना भेटणं, बाहेर जाऊन काम करणं याची मुळातच आकड आहे. तुम्हाला सांगते, लॉकडाऊन होण्याआधी आमच्या ‘अभया’ कार्यक्रमाचे प्रयोग जोरदार सुरू होते. 75 प्रयोग आम्ही केले होते. शो अंतर्गत आम्ही शाळा, संस्थांमध्ये जाऊन मुलांशी प्रत्यक्ष संवाद साधतो.
मला पालकांना सांगायचंय की, या लॉकडाऊनमध्ये तुम्ही घरचं काम करताय, वर्क फ्रॉम होम करताय. तुम्ही त्यात दमून जाता. पण मुलांना खूप गोष्टींचं कुतूहल असतं. खूप प्रश्न पडलेले असतात. ते शाळेतही विचारू शकत नाहीत, मग मुले आई-वडिलांना विचारणार ना…पण असं दिसतंय की आईकडील म्हणतात, आता नको विचारूस. किती प्रश्न विचारतेस? जा बरं खेळ जा …अभ्यास करत बसा. असा संवाद निश्चितच घरोघरी होत असणार. पालकांनी मुलांचं कुतूहल, शंका शमविल्या पाहिजेत, त्यांचं निरसन केलं पाहिजे. त्यामुळे मुलांना आपल्या प्रश्नाला काहीतरी मान, आदर दिला जातोय, असं वाटतं. मुलांना धुडकावून लावू नये, अन्यथा मुले आपल्या समवयस्काकडून माहिती काढतात. इंटरनेटवर माहिती शोधतात…ती चुकीची असू शकते.
सत्यजित रे नक्याने समजले
मी लॉकडाऊनमध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचे दिग्दर्शक सत्यजित रे यांच्या फिल्म परत एकदा पाहिल्या. त्यांचे एक पुस्तक आहे ‘अकर फिल्म्स देअर फिल्म्स’, यामध्ये त्यांची भाषणं, क्याख्यान यांचं कलेक्शन आहे. सगळं खूप इंटरेस्टिंग आहे. गेल्या दोन महिन्यांत सत्यजित रे यांच्या फिल्म नव्याने, वेगळ्या दृष्टीने बघितल्या. त्यांची ‘घरे बाहिरे’ ही फिल्म खूप आकडली. फिल्म रवींद्रनाथ टागोर यांच्या कथेवर आधारित आहे. अरण्येर दिनरात्रि, चारुलता, महानगर, तीन कन्या या फिल्म पाहिल्या. यातील पुरुषांची आणि स्त्र्ायांची ‘कॅरेक्टर’ खूप अभ्यास करण्यासारखी आहे. काळाच्या खूप पुढे जाणारी आहेत.
रस्त्यावर थुंकणाऱया लोकांचे उद्बोधन
रस्त्यावर थुंकू नये, कायद्याने गुन्हा आहे, हे वारंवार सांगितलं जात असतानाही मास्क काढून थुंकणारे दिसतात. अनेकांच्या ते अंगवळणी पडलंय. अशा लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे, पपेट शोमार्फत त्यांचे उद्बोधन कसे होईल, यादृष्टीने डोक्यात विचार सुरू आहे. अनेक सामाजिक विषय घेऊन आम्ही शो करतो. लॉकडाऊन संपल्यावर रस्त्यावर थुंकणाऱयांना समज देण्यासाठी पपेट शो करणार आहे.





























































