
>> नंदेश उमप (लोकगायक)
कोरोनाच्या काळात माझ्यापरीने मला अनेकांना सहकार्य करता आलं. काही गोष्टी माझ्याकडून करता आल्या. महाराष्ट्रातले कलाकार जे आहेत, लोककलावंत, नाटय़कलाकार, बॅकस्टेज कलाकार या सगळ्यांची कामं या काळात बंद असल्यामुळे त्यांच्यावर उपासमार सुरू होती. अशावेळी विठ्ठल उमप फाऊंडेशनच्या वतीने त्यांना सहकार्याचा हात दिला. तो मला खारीचा वाटा म्हणून उचलता आला.
2012 पासून विठ्ठल उमप फाऊंडेशनची स्थापना केलेली आहे. तेव्हापासून शेतकऱयांसाठी, शिक्षणासाठी, कर्परोग रुग्णांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने आमच्या फाऊंडेशनच्या वतीने सहकार्याचा हात देता आला. एक समाज बांधिलकी आहे, समाजाने आपल्याला जे दिलेलं आहे त्याची आपल्याला परतफेड करायची आहे. कारण समाज आपल्याला नाव देतं, प्रतिष्ठा मिळवून देतं, पैसा मिळवून देतं, प्रेम मिळवून देतं. तर अशा कठीण परिस्थितीमध्ये, अवघड स्थितीमध्ये आपणही लोकांच्या मदतीला यायला हवे, असे करत आमच्या फाऊंडेशनच्या वतीने जवळजवळ पावणेपाचशे कुटुंबांपर्यंत आम्ही आर्थिक मदत पोहोचवली आहे. यासाठी माझे मित्र जे देशात आहेत, लंडनमध्ये आहेत, अमेरिकेत आहेत त्या सगळ्यांनी मला सहकार्य केलं. हा काही माझा मोठेपणा नाही, पण मला जेवढं जमेल, शक्य झालं तेवढं मी करतोय. त्याचा मला गवगवा करायचा नाही. अगदी आदिवासी घरात जाऊन पण तिथे पंचवीस-पन्नास घरांमध्ये जाऊन अन्नधान्य वाटप केले. त्याच्यानंतर वांद्रय़ात काही नंदीबैलवाले आले होते आणि ते इथेच अडपून पडले होते. तर त्यांना बरीचशी मंडळी मदत करत होती, पण त्यांना आणखी मदतीची गरज होती. त्यावेळी आम्ही विठ्ठल उमप फाऊंडेशनच्या वतीने त्यांना आम्ही काही धनधान्य वाटप केले आणि आजही इकडून तिकडून मला पह्न येतात. मी माझ्याकडचे पैसे संपले तर इतर संस्थांकडून मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करतो. आपल्याकडे नाहीय ना मग दुसऱया ठिकाणाहून त्यांना मदत कशी मिळेल यासाठीही प्रयत्न करायचो. मग तसेच मला अनेक पह्न येतात की, दादा तुमच्यामुळे अनेकांनी आम्हाला धान्य पाठवले. आपल्या ताटातल्या भाकरीची एक चटकोर देता आली पाहिजे तर बरं वाटतं. आपलंही पोट भरतं आणि दुसऱयाचे ताटही रिकामे राहत नाही. आपल्याला जेवढं शक्य आहे ते केलंच पाहिजे आणि मीही केलं. अगदी संभाजीनगर, सोलापूर, कोल्हापूर, बुद्रुक, सांगली, सातारा, मिरज त्याच्यानंतर जळगाव, धुळे, नगर, पुणे, येवला, अशा बऱयाच ठिकाणी मदत पोहोचवली आहे. एसएमएसच्या माध्यमातून त्यांचे बँक डिटेल्स घेऊन त्यांना आर्थिक मदत केलेली आहे. त्याकाळात मी जेवढे काही कमावले होते ते सगळेच मी माझ्या कलाकार बंधूंना वाटून टाकले आहे.
या काळात मला अनेक पह्न आले होते. त्यात एका व्यक्तीचा पह्न आला होता त्याची बहीण फार आजारी आहे. तिला पुठलातरी मोठा आजार होता, पण तिच्या औषधांसाठी पैसे कमी पडत होते. तेव्हाही पटकन त्यांच्यापर्यंत मला मदत पोहोचवता आली. तसेच एका महिलेचा पह्न आला होता त्यांची आई प्रचंड आजारी होती आणि उपचारासाठी पैसे नव्हते. अशावेळी त्यांच्यापर्यंत आर्थिक मदत पोहोचवली. आठवडाभराने त्या महिलेने आभार मानण्यासाठी पह्न केला. एका पह्नवरून तुम्ही मला पटकन मदत पाठवली. त्यासाठी तुमचे मनापासून आभार. असे धन्यवाद देण्यासाठी बरेचसे पह्न येत असतात. पण मला कोणी धन्यवाद बोलावे याची अपेक्षा नसते. मी माझे काम करतोय. ते माझे कर्तव्य आहे. याकाळात गरीब-श्रीमंत, जात-पात या सगळ्यांना एका पंगतीत आणून बसवलं, त्यांना शिकवलं की कोणी श्रीमंत नाही कोणी गरीब नाही. त्या गरीब माणसालाही हात पसरवावे लागले आणि श्रीमंत माणसालाही हात पसरवावे लागले. त्यामुळे कोणालाही कमी लेखू नका असे मला वाटते. पडत्या काळात आपल्या माणसांना मदत करणं ही एक भावना जागरूक झाली.





























































