प्रस्तुतकर्ता

147

अमोल कागणे… केवळ अभिनेताच नव्हे, तर एकाचवेळी तो निर्माता आणि प्रस्तुतकर्ताही आहे.

>>सामना प्रतिनिधी

एकच काम करायला हल्ली तरुणांना कंटाळा येतो. पण अमोल कागणे हा तरुण आजच्याच काळातला असूनही केकळ अभिनयच नक्हे, तर काही सिनेमांची निर्मितीही तो करतोय आणि काही सिनेमांचा तो प्रस्तुतकर्ताही आहे. एकाचकेळी अनेक कामांमध्ये क्यस्त राहायला त्याला कसं जमतं कळत नाही. आपल्याकिषयी माहिती देताना अमोल म्हणतो, आवड असली, जिद्द असली की सर्क काही शक्य होतं. अभिनयाची आवड मला लहानपणापासूनच आहे. शाळेत गॅदरिंगला मी हमखास नाटकात भाग घ्यायचो. मेडिकल पूर्ण केल्यानंतर मी अभिनय आणि दिग्दर्शनाची पुणे किद्यापीठाच्या ललित कलाकेंद्रमधून डिग्री घेतली. प्रोफेशनल ऑक्टिंग आणि प्रोफेशनल डायरेक्शन काय असतं ते आधी शिकून घेतलं आणि मग या क्षेत्रात आलो.

विशेष म्हणजे अमोलचे आईकडील या प्रोफेशनमध्ये नाहीत. म्हणजे नाक, पैसा, प्रसिद्धी हे त्याला कारशाने मिळालेले नाहीय. जे काही मिळवायचे ते तो स्वतःच्या बळावर मिळवणार आहे. त्याचे आजोबा त्यांच्या काळात नाटक करायचे. त्यांच्यामुळे आपल्यात अभिनयाचं वारे शिरलं असावं असं तो सांगतो. या वर्षभरात त्याचे तब्बल ११  चित्रपट येत आहेत. यातील काही चित्रपटांमध्ये त्याने अभिनय केलाय, तर काही सिनेमांची तो निर्मिती करतोय. काही सिनेमांचा तो प्रेझेंटर आहे.

एखाद्या भूमिकेचा अभ्यास करावाच लागतो असं तो सांगतो. तो म्हणतो, एखादा सिनेमा स्वीकारतो तेव्हा त्यात भूमिका कशी आहे त्याची कल्पना येतेच. आतापर्यंत ३० ते ४० नाटके केलेली असल्यामुळे भूमिकेचा गाभा लगेच कळतो. तो कसा दिसेल, तो कसा बोलेल, कसा वागेल, त्यानुसार रोल साकारायला सोपं जातं. शिवाय आसपास असलेल्या लोकांकडे पाहूनही तशी व्यक्तिरेखा साकारतो, असंही अमोल म्हणाला.

आपली प्रतिक्रिया द्या