सामाजिक बांधिलकी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचे योगदान सर्वात मोठे आहे. कोरोनाच्या काळात महाराष्ट्रातील उद्योग व्यवसायाला उतरती कळा लागली होती; परंतु दिवाळीनंतर पुन्हा एकदा उद्योग व्यवसाय नव्या जोमाने सुरू झाला खरा, पण कोरोनाच्या दुसऱया लाटेने पुन्हा एकदा उद्योग व्यवसाय अडचणींत आले.

मार्च 2020मध्ये जेव्हा पहिल्यांदा लॉकडाऊन जाहीर झाले तेव्हा संपूर्ण उद्योगजगत संभ्रमाच्या अवस्थेत गेले व काय करावे हे कोणालाच सुचत नव्हते. अशा वेळेस अर्थसंकेतने पुढाकार घेऊन फेसबुक व यू-टय़ूबच्या साहाय्याने ऑनलाईन माध्यमातून मोफत मार्गदर्शनाचे कार्यक्रम 1 एप्रिल 2020पासून सुरू केले. अर्थसंकेतमुळे दिशा व प्रेरणा मिळाल्याने इतर उद्योजकीय संस्थांनी अशाच प्रकारे ऑनलाईन मार्गदर्शन कार्यक्रम सुरू केले व महाराष्ट्रातील उद्योग जगत सावरू लागले. अशावेळी उद्योग आणि अर्थक्षेत्रात काम करणाऱया ‘अर्थसंकेत’ या संस्थेतर्फे सामाजिक बांधिलकी म्हणून पालघर येथील 20 आदिवासी कुटुंबांना एका महिन्याचा शिधा वाटण्यात आला. आर.के. बझारचे मनोज डुंबरे यांनी या कार्यात सढळ हाताने विशेष मदत केली. त्याचप्रमाणे आदिवासी कुटुंबांना कपडे व भांडी तसेच विद्यार्थ्यांना पुस्तके व मिठाईचे पदार्थ वाटण्यात आले.

एप्रिल 2021मध्ये दुसऱयांदा लॉकडाऊन जाहीर झाल्यावर पुन्हा एकदा अर्थसंकेतने पुढाकार घेऊन अगदी नगण्य दरात जाहिरात सेवा उपलब्ध करून दिली. तसेच उद्योजकांना हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले व फक्त 100 रुपयांत उद्योजकीय कार्यक्रम घेण्यास सुरुवात केली. ज्या माध्यमातून हजारो उद्योजकांना नवनवीन विषय शिकता आले. व्यवसायात पेटंटचे महत्त्व, शेअर मार्पेटमधील गुंतवणूक, ऑनलाईन फसवणूक, सोशल मीडिया मार्पेटिंग, प्रभावी संभाषण हे व असे विविध महत्त्वाचे विषय संपूर्ण महाराष्ट्रातील उद्योजकांना उपलब्ध करून दिले.