
केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागातील शिखर संस्था असलेल्या संगीत नाटक अकादमीवर डॉ. संध्या पुरेचा यांची अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली आहे. त्यांच्या या नेमणुकीने भरतनाटय़मसारख्या अभिजात नृत्यशैलीचा सन्मानच झाल्याची भावना कलाक्षेत्रात निर्माण झाली आहे.
संध्या पुरेचा या केवळ भरतनाटय़म नृत्यांगना नाहीत तर त्या नृत्य विदुषी, नृत्य संरचनाकार आहेत. त्या शास्त्र्ााrय नृत्याच्या संदर्भात मौलिक ग्रंथ निर्मिती करणाऱ्या संशोधक आणि अभ्यासकदेखील आहेत .नृत्य क्षेत्रातील बहुमोल योगदानाबद्दल त्यांना 2019 साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्राप्त झाला. गुरू-शिष्य परंपरेनुसार डॉ. संध्या पुरेचा यांनी भरतनाटय़मसारख्या शास्त्र्ााrय नृत्यशैलीचे शिक्षण आचार्य गुरू पार्वती कुमार यांच्याकडे घेतले. परंपरा आणि नवता यांचा सुरेख संगम त्यांनी शास्त्र्ााrय नृत्यशैलीत घडविला.
नाटय़शास्त्र्ााच्या पठडीतून भरतनाटय़मचे सिद्धांत आणि प्रत्यक्ष नृत्य अंगिक अभियानाच्या दृष्टीने सखोल चिंतन करीत त्यांनी डॉक्टरेट ही पदवी संपादन केली. सुमारे 5 हजार विद्यार्थिनींना भरतनाटय़म नृत्य शैलीत त्यांनी ज्ञानदानाचे गुरू म्हणून कार्य केले. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ नागपूर यांच्याशी संलग्न असणाऱ्या भरत कॉलेज ऑफ फाइन आर्ट्स ऍण्ड कल्चर या आपल्या संस्थेद्वारे त्यांनी शास्त्र्ााrय नृत्यातल्या प्रशिक्षणाचे अखंड सेवा व्रत घेतलेले आहे. हिंदुस्थानी कला आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी सरफोजी राजे भोसले सेंटर या संस्थेची उभारणी त्यांनी केली. त्याद्वारे कलाक्षेत्रासाठी प्रशिक्षण संशोधनाचे कार्य अविरत सुरू ठेवले.
1986 मध्ये अभिनय दर्पणमधील श्लोकांवर त्यांनी कार्यक्रम सादर केला. अभिनय दर्पणवरील हा कार्यक्रम त्यांनी आपले गुरू पार्वती कुमार यांना अर्पण केला. संस्कृत भाषा भरताचे नाटय़ शास्त्र्ा सरफोजी राजे भोसले यांचे वाङ्मय हे
डॉ. संध्या पुरेचा यांच्या अभ्यासाचे आणि आस्थेचे विषय राहिले आहेत. संस्कृत काव्यरचनांचे शास्त्र्ा आणि संप्रदाय यांचे अनोखे सादरीकरण त्यांनी घडविले आहे. ताज फेस्टिवल, अजंठा फेस्टिवल, एलिफंटा फेस्टिवल तसेच संगीत नाटक अकादमीचे महोत्सव अशा अनेक राष्ट्रीय महोत्सवांमध्ये डॉ. संध्या यांनी आपली कला सादर केली आहे.
राष्ट्रीय महोत्सवांसोबत आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्येदेखील त्यांनी आपली कला सादर केली आहे. नेदरलँड, दुबई, ब्रिटन, रशिया, अमेरिका अशा देशांमध्ये त्यांनी आपली कला सादर केली आहे. इतकेच नव्हे तर राष्ट्रीय पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी आपला शिष्य संप्रदाय वाढविला आहे. डॉ. संध्या या भरतनाटय़म नृत्य शैलीसाठी ओळखल्या जात असल्या तरी त्यांना सर्वच शास्त्र्ााrय नृत्य प्रकार आणि लोकनृत्य प्रकार या संबंधात विशेष आस्था आहे. त्यांनी भरतनाटय़म, कथ्थक, मोहिनीअट्टम आणि लावणी या शास्त्र्ााrय नृत्य आणि लोकनृत्यातून साकार झालेला कार्यक्रम गेटवे ऑफ इंडिया येथे सादर केला होता. केवळ शास्त्र्ााrय नृत्याच्या नव्हे तर लोकनृत्याच्या कार्यशाळांमध्येदेखील त्या आपला सहभाग नोंदवित असतात. भरताच्या नाटय़शास्त्र्ाावर त्यांनी लिहिलेला ग्रंथ महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रसिद्ध केला आहे. तंजावरच्या सरफोजी राजे भोसले यांच्या परंपरेचा डॉ. संध्या पुरेचा यांचा विशेष अभ्यास आहे.
त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. लोकरंग सांस्कृतिक मंच या ठाण्यातील संस्थेने त्यांच्या शास्त्र्ााrय नृत्य क्षेत्रातील योगदानाची दखल घेत ज्येष्ठ नाटककार, गीतकार अशोकजी परांजपे पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे. संगीत नाटक अकादमीच्या अनेक परिषदांमध्ये मौलिक शोधनिबंधांचे वाचन,अनेक ग्रंथांचे संपादनही त्यांनी केले आहे. अभिनय दर्पणच्या 324 श्लोकांचा दृकश्राव्य प्रकल्प त्यांनी साकार केला आहे.
शास्त्र्ााrय नृत्य आणि लोकनृत्य, लोककला यांचा सन्मान वाढविण्याचे काम डॉ. संध्या संगीत नाटक अकादमीचे अध्यक्ष म्हणून निश्चित करतील अशी खात्री आहे.
>> . डॉ. प्रकाश खांडगे
























































