लेख – स्वागत दिवाळी अंकांचे (भाग – 3)

990

ललित

दिवाळी अंकाच्या परंपरेत वाङ्मयीन ओळख जपणाऱया या अंकाने चोखंदळ वाचकांच्या मनात जिव्हाळय़ाचे स्थान मिळवले आहे. या अंकात ‘संदेश’ या बंगालीतील कुमार मासिकाचा गेल्या एकशे सहा वर्षांच्या वाटचालीचा गोषवारा घेणारा विजय पाडळेकर यांचा लेख, अमेरिकन लेखिका, कवयित्री माया अँजेलोच्या जीवन संघर्षाचा मीना वैशंपायन यांनी घेतलेला आढावा ‘…आणि तरीही मी उभी राहीन’ आणि गालिबच्या वाङ्मयीन प्रवासाचा आलेख मांडणारा ‘तिलिस्माती शायर!’ हा डॉ. नंदू मुलमुले यांचा लेख वाचकांना विचारप्रवृत्त करणारे आहेत. प्रकाश खांडके यांनी लिहिलेला ‘बाजीराव नाना…’ हा लेख वाचकांना अस्वस्थ करणारा आहे.

संपादक अशोक केशव कोठावळे

पृष्ठ164.,  मूल्य 200/- रु.

शब्दालय

‘बदलते नातेसंबंध’ हा विषय मध्यवर्ती ठेवून विविध पातळ्यांवरील नातेसंबंधांचा घेतलेला मागोवा हे या दिवाळी अंकाचे वैशिष्टय़. ‘माझं खास नातं’ या सदरात मुकेश माचकर, विनायक पाटील, उदय कुलकर्णी, सुदीप गुजराथी यांचे लेख जमून आलेत. ‘गांधी-आंबेडकर – सतत बदलत गेलेले नाते’ हा प्रा. हरी नरके यांचा वैचारिक लेख वाचनीय आहे. साकी मलोसे या अफगाण युवतीची सत्यकथा ‘यात्रा’ वाचकांना खिळवून ठेवते.

कार्यकारी संपादक – मृण्मयी लांडे

पृष्ठs 180/-, मूल्य – 200/- रुपये.

उद्वेली हास्यानंद

विनोदाचे विविधरंगी अंतरंग घेऊन येणारा हा विनोदी विशेषांक मुखपृष्ठापासूनच वाचकांना हसविण्यात यशस्वी ठरला आहे. विनोदी कथा, लेख, कविता, वात्रटिका, चारोळय़ा, व्यंगचित्रे, हास्यचित्रमालिका आदी विनोदाचा फराळ वाचकांचा आनंद द्विगुणित करेल. यासाठी भा. ल. महाबळ, बंडा यज्ञोपवित, सुरेश वांदिले, वि. रा. अत्रे, माधव गवाणकर, प्रियंवदा करंडे, सुधीर सुखठणकर, संतोष पवार, रेखा नाबर, शेखर गजभार, डॉ. सुधीर मोंडकर आदींनी लेखन केले आहे. विवेक मेहेत्रे, यशवंत सरदेसाई, उमेश कवळे, राजेंद्र सरग, सुरेश क्षीरसागर आदींच्या हास्यचित्रमालिका जमून आल्यात.

संपादक – विवेक मेहेत्रे

पृष्ठs 172, मूल्य – 150/- रुपये

कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी 2019

‘कला’ हे वैशिष्टय़ असणारा ‘कालनिर्णय…’ या अंकात युवा चित्रकार शशिकांत धोत्रे यांची शर्मिला फडके यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत तसेच प्रसिद्ध चित्रकार प्रल्हाद धोंड यांचा जीवन प्रवास उलगडणारा प्रा. मंगेश राजाध्यक्ष यांचा लेख वाचनीय आहे. नामांकित संगीतज्ञ व समीक्षक शरच्चंद्र गोखले यांच्या आठवणी जागवणारा विक्रांत आजगावकर यांचा माहितीपूर्ण लेख, आदिवासी लोककलावंत तीजनबाईची ओळख करून देणारा ‘पंडवानीची पताका तीजनबाई’ हा डॉ. प्रकाश खांडगे यांचा लेख वाचकांना नक्की आवडतील. हिंदुस्थानचा सर्वोच्च सैनिकी पुरस्कार ‘परमवीर चक्र’ तयार करणाऱया सावित्री खानोलकर यांची गाथा उलगडली आहे जयराम साळगावकर यांनी.

संपादक – जयराज साळगावकर

पृष्ठs 224, मूल्य – 140/- रुपये

आवाज

या अंकाने 69 वर्षे आपली गुणवत्ता कायम राखली आहे. मुकुंद टाकसाळे, विजय कापडी, प्रभाकर भोगले, संतोष पवार, अवधूत परळकर, श्रीकांत बोजेवार, सुधीर सुखटणकर, नीलेश मालवणकर, मंगला गोडबोले, सुभाष सुंठणकर, श्रीनिवास आठल्ये आदी मान्यवरांच्या विनोदी कथा वाचकांना हसविण्यात यशस्वी झाल्या आहेत. प्रभाकर वाईरकर, श्रीनिवास प्रभुदेसाई, ज्ञानेश बेलेकर, विवेक मेहेत्रे, महेंद्र भावसार आदींची हास्यचित्र मालिका वाचकांच्या आनंदात भर घालणारी! मुखपृष्ठासह पानोपानी असणाऱया विनोदी चित्रखिडक्या दरवर्षीप्रमाणेच आकर्षक असून वाचकांना नक्कीच पसंतीस पडतील.

संपादक भारतभूषण पाटकर

पृष्ठ236, मूल्य 280/-.

दर्याचा राजा

diwali

सागरी जीवनाशी संबंधित विषयांना स्पर्श करणारा व सोबत कला, क्रीडा, सिनेमा, पर्यटन, कथा, भक्तिपर, बालांगण यांचा योग्य समतोल या दिवाळी अंकात आहे. मधु मंगेश कर्णिक, माधवी कुंटे, पंढरीनाथ तामोरे, माधव गवाणकर, सदानंद संखे, नवनाथ तांडेल, डॉ. संपदा जोगळेकर आदी नामवंतांच्या उत्तम कथांचा समावेश आहे. मत्स्य विभागात माशांची स्वच्छता आणि आरोग्य (डॉ. विनय देशमुख), नयनरम्य रापण (प्रा. डॉ. सूर्यकांत येरागी), भारतीय किनारपट्टीवरील धार्मिक वैभव (हरेश्वर मर्दे),  मासळी व्यवसायाला दुष्काळाच्या झळा (प्रमोद कांदळगावकर), मच्छीमारांची मासेमारी की हाराकिरी (चिंतामण मेहेर) हे लेख माहितीपूर्ण आहेत. याखेरीज ‘महाराणी येसूबाईंची महत्ता’ (अशोक बेंडखळे), ‘दीपावलीचा सांस्कृतिक अन्वयार्थ’ (डॉ. पांडुरंग भानुशाली), ‘आदी लेख आहेत. याखेरीज ‘महाभारत – दंतकथा की गूढकथा’, ‘मेघदूत आणि रामायण’, ‘मारुस्ती स्तोत्र – एक प्रेरणादारी काव्य’ हे भक्तिपर लेखही उत्तम आहेत.

संपादक – पंढरीनाथ तामोरे

पृष्ठs 200, मूल्य – 75/-  रुपये

उल्हास प्रभात

उल्हास प्रभात वृत्तपत्राचा रौप्य महोत्सवी दीपावली विशेषांक प्रसिद्ध झाला असून या अंकात ऑनलाइन फ्रेंडशिप- राजेंद्र वैद्य, सबका मालिक एक-उमेश गंगाधर पारसकर, खचणारे शहर तेहरान-शशिकांत काळे, जिभेला हाड हे हवेच-अनिल जावकर, मृत्यूच्या कराल दाढेतील कश्मीर सफर- चंद्रकांत शिंदे, वैराग्य-अनुजा सावंत, श्रींचे अनुभव-विनायक चांदेकर, देवाची कृपा-उत्तम सदाकाळ, तुळस-अनघा कुलकर्णी, कॅलेंडरनामा-आनंद देशमुख, हरवलेले बालपण-विश्वनाथ महादेव प्रभुणे, स्वप्न क्षय-रघुनाथ मोहिते, मास्तर एके मास्तर-शांतीलाल ननावरे, स्त्री सबलीकरण-वैशाली चांदेकर, परित्यक्त्या-सुरेश देहेरकर, वार्षिक राशिभविष्य-ज्योतिषाचार्य सोपानदेव बुडबाडकर, आधार-सुदर्शन दिलिप पाटील, दिव्या ज्योत-प्रकाश पोळ, आनंददीप-शरद गणेश अत्रे, आई म्हणजे घरदार-चंद्रकांत आप्पाजी कोकीतकर आदी साहित्यिकांच्या कथा, कविता व लेखांचा या अंकात आहे.

संपादक – डॉ. गुरुनाथ पांडुरंग बनोटे.

पृष्ठs 120., किंमत – 100/- रु.

आपली प्रतिक्रिया द्या