माता, बालकांचे ‘अरमान’, डॉ. अपर्णा हेगडे यांच्या कार्याचा होतोय गौरव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डॉ. अपर्णा हेगडे प्रसिद्ध युरोगायनेकोलॉजिस्ट आहेत. ‘अरमान’ या सामाजिक संस्थेच्या त्या संस्थापक आणि व्यवस्थापकीय विश्वस्त आहेत. गरोदर माता, नवजात बालके यांच्या सुदृढ आरोग्यचे ‘अरमान’ पूर्ण करण्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत.
देशातील गरोदर महिलांचे आजार आणि त्यामुळे होणारे मृत्यू, तसेच नवजात बालकांचे आजारपण-मृत्यू यांचा वाढता आलेख पाहता डॉ. अपर्णा हेगडे यांनी काम करायला सुरुवात केली. त्यातूनच 2008 साली ‘अरमान’ या संस्थेची स्थापना झाली. गरोदर माता किंवा बाळंतीण झालेल्या महिलांना स्वतःची आणि बाळाची काळजी कशी घ्यावी, त्यांना उपचारासाठी मदतीचा हात देण्याचे काम त्यांनी मोबाइलच्या माध्यमातून केले. त्यासाठी त्यांनी ‘एम मित्र’ आणि ‘किलकारी’ हे कार्यक्रम सुरू केले. त्यांचे दोन्ही कार्यक्रम आज देशभरातील 32 दशलक्ष महिला-बालकांपर्यंत पोहोचले आहेत.

जगभरात जेवढय़ा गरोदर मातांचा मृत्यू होतो, त्यापैकी 9 टक्के मृत्यू आपल्या देशात होतात. दरवर्षी 26 हजारांहून अधिक स्त्रिया गर्भधारणा/प्रसूती संबंधित गुंतागुंतीमुळे मरतात. ही चिंताजनक बाब आहे. त्यावर तंत्रज्ञान आधारित उपाय शोधताना डॉ. अपर्णा हेगडे यांच्या ‘अरमान’ संस्थेने ‘एम मित्र’ (मोबाइल मित्र) ही व्हॉइस कॉलिंग सर्विस सुरू केली. हे एक

टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म असून फ्री आहे. व्हॉइस कॉल सर्विस प्रोग्रॅम आहे. याअंतर्गत गरोदर माता आणि बाळ एक वर्षाचे होईपर्यंत मोबाइलवर आठवडय़ातून दोनदा व्हॉइस कॉल पाठवले जातात. 2.6 दशलक्ष माता महिलांपर्यंत ‘एम मित्र’ पोहोचले आहे.

देशभरात पोहोचतेय ‘किलकरी’

‘एम मित्र’चे कार्य पाहून केंद्र सरकारने ‘अरमान’सोबत 2019 पासून ‘किलकरी’ कार्यक्रम सुरू केला. आज ‘किलकरी’ कार्यक्रम 18 राज्यांत सुरू आहे. ही फ्री व्हॉइस सर्व्हिस आहे. आतापर्यंत 38 दशलक्ष माता-बालकांपर्यंत ‘किलकरी’ पोहोचली आहे. येत्या तीन-चार वर्षांत देशभरात पोहोचण्याचे लक्ष्य आहे. आता बहुतांश लोकांकडे स्मार्टपह्न आले आहेत. त्यामुळे व्हॉइस कॉलिंग सर्व्हिसच्या पुढे जात मल्टिमीडिया पंटेड उपलब्ध करून दिला जाणार आहे. लो रिस्क मदर आणि लो रिस्क चाइल्ड यांच्यासाठी मल्टिमीडिया पंटेड पाठवले जाणार आहेत. यामध्ये टार्गेटेड हॅण्ड होल्डिंग, टू वे कम्युनिकेशन, इंटरॅक्शन यांचा समावेश आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर हा कार्यक्रम सुरू आहे, असे डॉ. अपर्णा हेगडे यांनी सांगितले.

आरोग्यसेवकांना प्रशिक्षण

‘अरमान’ने आरोग्यसेवकांना प्रशिक्षण देण्यासाठी सरकारसोबत ‘मोबाइल अकॅडमी’ कार्यक्रम सुरू केलेय. यामध्ये तीन लाख 25 हजार आशा वर्करला प्रशिक्षण देण्यात आलेय. पूर्वी हे व्हॉइस कॉल आधारित प्रशिक्षण होते. ते आता लवकरच मल्टिमीडिया पंटेट स्वरूपात उपलब्ध होईल. सध्या मोबाइल अपॅडमी 17 राज्यांत पोहोचली असून येत्या तीन-चार वर्षांत देशभरात पोहोचेल.

– नर्स, मेडिकल ऑफिसर, स्पेशालिस्ट ट्रेनिंग- हा हाय रिस्क पेशंटसाठी प्रोग्रॅम तयार करण्यात आला आहे. ‘अरमान’च्या या प्रोटोकॉलवर तेलंगणा सरकारने आरोग्य धोरण (पॉलिसी) तयार केले आहे. मल्टिमीडिया पंटेड स्वरूपातील हा कार्यक्रम आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि उत्तर प्रदेशात घेतला जातोय, असे डॉ. हेगडे यांनी सांगितले.

प्रसिद्ध युरो-गायनेकोलॉजिस्ट डॉ. अपर्णा हेगडे यांनी ‘अरमान’ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून लाखो माता, बालकांना नवे जीवन दिले आहे. त्या सोशल आंत्रप्रेन्योर ऑफ द इयर इंडिया अवॉर्ड 2023 या प्रतिष्ठsच्या पुरस्काराच्या स्पर्धेत आहेत. ज्युबिलंट फाऊंडेशन आणि श्वाब फाऊंडेशनचा हा पुरस्कार आहे.