
>> शिवानी गोंडाळ (मेकअप आर्टिस्ट)
सुंदर दिसण्यासाठी सगळय़ात आवश्यक आहे ती निरोगी त्वचा. चमकदार त्वचेसाठी तुमची जीवनशैली, आहार, उत्तम आरोग्य, पुरेशी झोप मनशांती आवश्यक आहे. आपली त्वचा सेलिब्रिटींसारखी गोरी आणि सुंदर असावी असे प्रत्येक तरुणीचे स्वप्न असते. मात्र प्रत्येकीची त्वचा गोरी नसते. बऱयाच मुली सावळी त्वचा गोरी करण्यासाठी बरेच उपायदेखील करत असतात आणि तरीदेखील बऱयाच वेळा अपेक्षित लाभ मिळत नाही. गोरा रंग मिळण्यासाठी हजारो रुपयांची क्रीम बाजारातून विकत घेतली जाते आणि त्यामुळेच गोरा रंग करण्याच्या क्रीम मार्केटमध्ये जोमात धंदा करत आहेत. तुम्ही सुंदर व स्मार्ट तेव्हाच दिसाल, जेव्हा सुंदरता तुम्ही स्वत:मध्ये अनुभवाल. सावळ्या रंगासोबत योग्य रितीने तयार व्हा.
‘गोरीपान मुलगी हवी’ अशी जाहिरात आपण अनेक वेळा पाहत आलो आहोत. खरं तर गोऱया रंगाचा इतका अट्टाहास कशासाठी? सौंदर्य या शब्दाची व्याख्या आपण किती संकुचित बनवून टाकली आहे. गोरी मुलगी म्हणजे सुंदर असा गैरसमज त्यांच्या मनात घर करून राहिला आहे. सुंदर दिसण्यासाठी सगळय़ात आवश्यक आहे ती निरोगी त्वचा. चमकदार त्वचेसाठी तुमची जीवनशैली, आहार, उत्तम आरोग्य, पुरेशी झोप मनशांती आवश्यक आहे. जर त्वचा निसर्गतः चमकदार असेल तर कमीत कमी मेकअप करूनही तुम्ही आकर्षक दिसू शकतात.
बॉलीवूडच्या अभिनेत्री आपण पाहिल्या तर आपल्या लक्षात येईल की नूतन, रेखा, स्मिता पाटील, विद्या बालन, काजोल, बिपाशा बासू, लारा दत्ता, नंदिता दास यांसारख्या अनेक अभिनेत्रींनी स्वतःचे एक स्थान निर्माण केले आहे. सावळा रंग असूनही शार्प फीचर्स असलेल्या या अभिनेत्रींनी प्रेक्षकांच्या मनावर याच सावळय़ा रंगाने गारुड निर्माण केले आहे. या अभिनेत्रींच्या यशात त्यांचे सावळेपण कधीच आड आले नाही, उलट त्यांचा सावळा रंग हाच त्यांच्या नेत्रदीपक यशाचे गमक होता.
फॅशन इंडस्ट्रीमध्ये या डस्की रंगाला खूपच महत्त्व असल्यामुळे अनेक डस्की मॉडेल्स किंवा सावळय़ा रंगाच्या मॉडेल्स या प्लॅटफॉर्मवर चालताना दिसतात. तसेच अनेक जाहिरातींमधून आपल्याला अशा रंगांचे चेहरे बघावयास मिळतात. म्हणूनच त्यांचा रंग जरी सावळा असला, तरीही त्यांच्या त्या सावळय़ा रंगामुळेच त्या खरं तर जास्त ओळखू येऊ लागल्या आणि त्यांनी त्यांचे स्वतःचे एक स्थान निर्माण केले. त्यांनी कुठल्याही प्रकारचा न्यूनगंड न बाळगता स्वतःला या इंडस्ट्रीमध्ये सिद्ध केले आहे.
डॉक्टर्स म्हणतात की, सावळा रंग किंवा डार्क रंग असणे वाईट नाही तर त्याचे फायदे जास्त आहेत. डार्क स्किनमध्ये कलर पिगमेंट, मेलॅनिनचे प्रमाण जास्त असते, जे चांगल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. त्यामुळे अधिक यंग आणि ताजेतवाने दिसता येते.
तुम्ही सुंदर व स्मार्ट तेव्हाच दिसाल, जेव्हा सुंदरता तुम्ही स्वतःमध्ये अनुभवाल. मनाच्या स्थितीचा संबंध हा त्वचेच्या तेजाशी असतो. कपडय़ांचे रंग, पॅटर्न, फॅब्रिक आणि स्टाइल अशी असावी जी तुमच्यावर शोभेल आणि तुम्हाला स्मार्ट लूक देईल. फार भडक रंग सावळय़ा रंगावर छान दिसत नसले तरी काही रंग किंवा काही स्टाइल या अपवाद असतात. तसेच अनुभवाने आणि समजून केलेल्या मेकअपमुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वात जास्त भरच पडत असते.
एखाद्या स्त्र्ाच्या सौंदर्याचे मोजमाप गोऱया रंगावरून केले जाते. आजच्या युगात मात्र या रंगापेक्षाही त्या स्त्र्ााrने केलेली फॅशन, स्मार्टनेस, तिचा आत्मविश्वास आणि तिने वापरलेली योग्य मेकअपची शैली यांनाही खूप महत्त्व आहे आणि म्हणूनच तुमच्या सावळय़ा रंगासोबत तुम्ही जर योग्य रीतीने तयार झालात तर इच्छा असूनही लोक तुमच्या चेहऱयावरून नजर हटवू शकत नाहीत.
अशा या सावळय़ा आणि सुंदर रंगाचा मेकअप कसा करायचा त्यावर कोणती स्टाइल जास्त चांगली दिसेल, त्यासाठी कोणत्या कोणत्या रंगांचा वापर करायचा याची माहिती आपण पुढील लेखात घेऊया…




























































