पर्यावरण तज्ञ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
  • शैलेश माळोदे

वृक्षलता वेलींवर आयुष्यभर प्रेम आणि त्याविषयीचं संशोधन करणारे वनस्पतीतज्ञ डॉ. कमलजीत सिंग बावा यांच्याशी गप्पा.

मे महिन्याच्या उन्हाच्या काहिलीत मनाला थंडावा देणाऱया वृक्ष लता वेलींचा विचार मनात घोळत असतानाच एक आनंदायी बातमी कळाली. याच वृक्षलता वेलींवर आयुष्यभर प्रेम करणाऱया अणि त्याविषयीचं संशोधन करणाऱया वनस्पतीतज्ञाला म्हणजे जागतिक दर्जाचे शास्त्रज्ञ असलेल्या डॉ. कमलजीत सिंग बावा यांना ‘द लिनिअन मेडल’ हे प्रतिष्ठत पारितोषिक देण्यात येणार असल्याची ही ती बातमी होती. असा सन्मान प्राप्त होणारे डॉ. बावा हे प्रथम वनस्पतीशास्त्रज्ञ आहेत. डॉ. बावा हे रॉयल सोसायटी ऑफ लंडनचे मानद फेलो म्हणजे एफ.आर.एस. म्हणून निवडले गेले होते. ‘लिनिअन मेडल हे संवर्धन आणि स्थायीत्वाविषयीच्या आमच्या कार्याला लाभलेली एक उत्तम पावती असून त्यामुळे आपल्या पृथ्वीतलावरील घटत्या वृक्षसंपदेच्या दस्ताऐवजीकरणाचे आणि अध्ययनाचे आपले प्रयत्न दुपटीने व्हायला हवेत याची आठवणही करून देणारे आहे’ अशा शब्दांत त्यांनी आपली कृतज्ञता व्यक्त केली.

लिनियन मेडल दरवर्षी दिलं जातं. जगातल्या सर्वात जुन्या जैवशास्त्राrय सोसायटीतर्फे दिलं जाणारं हे प्रतिष्ठत मेडल प्रसिद्ध स्वीडिश जीवशास्त्रज्ञ कार्ल लिनिअस यांच्या नावे देण्यात येते. लिनिअस यांनी जगात सर्वप्रथम वनस्पती आणि प्राणी यांना शास्त्रशुद्ध वर्गीकरण प्रणालीद्वारे नावं देण्याची पद्धत सुरू केली. डॉ. कमलजीतसिंग बावा हे पर्यावरणीय संवर्धन आणि शाश्वत विकासाबाबतचं धोरण आणि क्रियान्वयानासाठी बहुशास्त्राrय ज्ञाननिर्मिती करणाऱया जगातील 20 मुख्य थिंक टँक्सपैकी 18 व्या स्थानी आहेत. डॉ. बावा यांच्या कार्याचा निश्चित धांडोळा गप्पांमधून मिळाला. बावा यांनी ‘कन्झर्व्हेशन ऍण्ड सोसायटी’ नावाचे एक शास्त्रीय जर्नल स्थापन केले. त्यांनीच ‘इंडिया बायोडायव्हर्सिटी पोर्टल’ नावाचं ऑनलाइन सिटीझन सायन्स पोर्टल स्थापन केलं.

7 एप्रिल 1939 साली पंजाबमध्ये जन्मलेले डॉ. कमलजीतसिंग बावा वॉल्टन येथील मॅसॅच्युसेटस् विद्यापीठात मानद प्राध्यापक असून उक्रांती पर्यावरणतज्ञ, संवर्धन जीवशास्त्रविषयक संशोधन करीत आहेत. ते अमेरिकेत पोस्टडॉक संशोधक म्हणून गेले. सुरुवातीला त्यांनी वॉशिंग्टन विद्यापीठ आणि हार्वर्ड विद्यापीठात फेलोशिप मिळवून संशोधन केलं. नंतर त्यांनी मॅसॅच्यूसेटस् विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केलं. पुढे ते पूर्ण वेळ प्राध्यापक झाले. 1996 पासून त्यांनी मानद प्राध्यापक म्हणून कार्य सुरू ठेवलंय. ते बऱयाचदा दार्जिलिंग येथे वास्तव्यास असतात.

डॉ. बावा यांना जगातील दोन प्रमुख वैज्ञानिक सोसायटीजनी फेलोशिपद्वारे सन्मानित केलंय. 2007 मध्ये त्यांना पी. एन. मेहरा स्मृती पुरस्कार देण्यात आला. हिंदुस्थानच्या राष्ट्रीय विज्ञान अकादमी आणि अमेरिकेच्या अमेरिकन असोसिएशन फॉर ऍडव्हान्समेंट ऑफ सायन्स याबरोबरच अनेक संस्थांचेही ते सन्मान्य फेलो आहेत. नॅशनल जिऑग्राफिक सोसायटीच्या संशोधन आणि एक्सपोरेशन समितीचे सदस्य आहेत. एस. एन. सेहगल फाऊंडेशन या स्थानिक आरोग्य परंपरांचे पुनरूज्जीवन करणाऱया संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे ते सदस्य आहेत.

डॉ. बावा यांनी 180 पेक्षा जास्त शोधनिबंध लिहिले असून दहाहून अधिक पुस्तकं, पुस्तिका आणि नियतकालिकांच्या विशेष अंकांचे लेखक-संपादक म्हणूनही काम केलंय. ‘द हिंदू’तर्फे पर्यावरणविषयक काढल्या जाणाऱया विविध वार्षिकांमध्ये त्यांनी पूर्व हिमालय, सह्याद्री इत्यादींमधील वनस्पतीविश्वाविषयी लेखन प्रकाशित केलंय.

सध्या ते ‘कन्झर्व्हेशन ऍण्ड सोसायटी’ या शास्त्राrय नियतकालिकाचे मुख्य संपादक असून ‘इकॉलॉजी ऍण्ड सोसायटी’ या शोधनियतकालिकाचे सहसंपादक आहेत. PlOS ONE या संशोधन नियतकालिकाचे ते ऍकॅडमिक संपादकही आहेत. संशोधन, शिक्षण आणि संस्था निर्मितीबरोबरच तरुण संशोधकांना मार्गदर्शन (मेंटरिंग) करण्याबरोबरच नवनवीन आंतरराष्ट्रीय विषयांमध्ये संशोधन करण्याचं काम ते नेहमी करीत असतात. हिंदुस्थानबरोबरच जगातील वनस्पती वैविध्य टिकावं यासाठी ते खूपच आग्रही आणि प्रयत्नशील आहेत.

‘हिमालया- माऊंटेन्स ऑफ लाइफ’ या पुस्तकातून त्यांनी हिमालयातील वनस्पती आणि जैववैविध्याविषयीचं सुरेख दस्ताऐवजीकरण केलंय. शिकवण्याबरोबरच सोप्या पद्धतींचा विकास करून संशोधन करणं आणि तरुण संशोधकांना मार्गदर्शन मित्रत्वाने करणे यात त्यांचा हातखंडा आहे. ATREE बंगळुरू या संस्थेतील डॉ. एम. समुद्रादेवी टी गणेश, आर. गणेशन यासारखे संशोधक सहकारी याविषयी गौरवानं सांगतात. असे डॉ. कमलजीतसिंग बावा वयाची 80 वर्षे पूर्ण असतानाही एका तरुणाच्या उत्साहानं कार्यरत आहेत. म्हणूनच ते तरुणांसाठी एक प्रेरणास्रोत आहेत.

[email protected]