मुद्दा – खासगी सेवानिवृत्त

823

>> अशोक अर्जुन शिर्के

खासगी क्षेत्रातील सर्व कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त झाल्यावर पेन्शन मिळत नव्हती. ते पेन्शनविना वंचित होते. त्या सर्व कर्मचाऱ्यांना फॅमिली पेन्शन योजना 95 मध्ये समाविष्ट करण्यात आले. पूर्वी खासगी क्षेत्रातील कर्मचारी निवृत्त झाल्यावर भविष्यनिर्वाह निधीचा पैसा लग्नकार्यात, घर बांधण्यासाठी तसेच कर्ज फेडण्यात खर्च होत असे. अशा खासगी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त झाल्यावर ‘फॅमिली पेन्शन योजना 95’ अमलात आली, परंतु जवळ जवळ 24 वर्षांचा काळ लोटला, फॅमिली पेन्शन योजनेमध्ये वाढ झालेली नाही. शासनाकडून कोशियारी समिती नेमण्यात आली. तिने दोन वर्षांपूर्वी आपला अहवाल केंद्राला सादर केला. कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेने वाढीव पेन्शनविरोधात केरळ हायकोर्टात याचिका केली. केरळ हायकोर्टाने कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ सुचवली. केरळ हायकोर्टाच्या निकालाविरोधात कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने केरळ हायकोर्टाने दिलेला निकाल कायम ठेवून घसघशीत वाढीव पेन्शनचा मार्ग मोकळा केला. मग आता अडले कुठे? केंद्र शासनाने आता तरी विधानसभा 2019 पूर्वी खासगी क्षेत्रातील सर्व कर्मचाऱ्यांना वाढीव पेन्शन घोषित करावी.

आपली प्रतिक्रिया द्या