सुंदर मी होणार – शोभिवंत कुंकू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> शिवानी गोंडाळ, मेकआप आर्टिस्ट

आपल्या कपडय़ांच्या रंगाप्रमाणे मिळत्याजुळत्या रंगाच्या टिकल्या लावणे हा तर फॅशनचा भाग आहे. अलीकडे कुंकवाची जागा गंध किंवा रंगीबेरंगी विविध आकारातल्या कलात्मक टिकल्यांनी घेतली असली तरी मंगल कार्यात मात्र आजही कुंकवाचाच वापर केला जातो.  

स्त्रिया या सौभाग्य म्हणून कपाळावर गंध किंवा टिकल्या लावत असतात. तसेच त्या टिकल्या आणखी आकर्षक करण्यासाठी त्याच्याभोवती वेगवेगळय़ा रंगांचा वापर करून कलात्मक दृष्टिकोनाने वेगवेगळय़ा डिझाइन काढत असतात. कपाळावर वेगवेगळय़ा प्रकारच्या टिकल्यांच्या डिझाइन्स काढणे हा आता ट्रेंड झाला आहे. कलात्मकदृष्टीने कपाळावर टिकल्यांचे डिझाइन काढणे तसेच तयार टिकलीच्या भोवती वेगवेगळय़ा प्रकारचे डिझाइन रंगवणे हा आजच्या तरुणींचा आवडता छंद झाला आहे.

पूर्वी टिकलीच्या जागी गोंदण केले जात असे तसेच अनेक समाजात त्यांच्या प्रांताप्रमाणे, धर्माप्रमाणे वेगवेगळय़ा प्रकारची गोंदण कपाळावर काढली जात असत. तसेच हनुवटीवर, डोळय़ांच्या कॉर्नरला, आयब्रोच्या टोकाच्या खाली अशा प्रकारचे गोंदण काढले जात असे.

आपल्या  संस्कृतीत हिंदू परंपरांमध्ये श्री गणेशाचे पूजन करून कोणत्याही मंगल कार्याचा शुभारंभ करताना, मंगल द्रव्य म्हणून कुंकवाचा वापर मुख्यत्वे केला जातो,  जातीनुसार, प्रांतानुसार कुंकू लावण्याच्या पद्धतीमध्ये व कुंकवाच्या पद्धतीमध्ये बदल दिसून येतो. काही ठिकाणी लग्न झाल्यावर मोठे कुंकू किंवा चिरी कपाळावर लावली जाते, तर काही ठिकाणी समाजात मळवट भरला जातो. काही स्त्र्ाया केसांमधील भांगामध्ये कुंकू लावतात. त्यांचाही रंग प्रांताप्रमाणे केशरी, लाल असा बदलत जातो.

वेगवेगळय़ा सांप्रदायातील लोक एका विशिष्ट प्रकारे तिलक लावतात आणि हे तिलक कस्तुरी, कुमकुम, चंदन, तुळशीच्या मुळातील माती किंवा गोपीचंदन इत्यादींपासून तयार केलेले असते.

तिलक किंवा टीका यांचे लघुत्वदर्शक स्वरूप म्हणजे टिकली होय. पूर्वी प्रसाधनांसाठी झाडाच्या पानांचाही वेगवेगळय़ा प्रकारच्या टिकल्या बनविण्यासाठी उपयोग केला जायचा. खरं तर टिकली लावण्याची पद्धत उत्तर प्रदेश, राजस्थान, मारवाडी या भागांत मुख्यत्वे करून आहे, तर दक्षिणेत टिकली फारसी प्रचारात नाही. आपल्या आवडीप्रमाणे कुंकवाच्या किंवा टिकल्यांच्या आकारात फेरफार झालेला दिसून येतो.

सौंदर्याचा दृष्टिकोन असणाऱया स्त्र्ाया आपल्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणे किंवा आपण केलेल्या वेशभूषाप्रमाणे गंध किंवा वेगवेगळय़ा बिंदीची निवड करत असतात. या बिंदीचेही वेगवेगळे आकार निवडून त्यांचा वापर कलात्मकदृष्टय़ा कपाळावर करत असतात. आपल्या ड्रेसच्या रंगाप्रमाणे  वेगवेगळय़ा टिकल्या किंवा वेगवेगळय़ा रंगांचे गंध वापरतात किंवा काजळ किंवा आयलाइनरने वेगवेगळय़ा डिझाइन्सही कपाळावर काढल्या जातात.

अलीकडे टीव्ही मालिका किंवा एखाद्या फिल्ममध्ये वेगळे पॅरेक्टर दाखवताना अशा प्रकारची टिकल्यांची वेगवेगळी डिझाइन्स कपाळावर करून त्या पॅरेक्टरला एक वेगळा लूक दिला जातो. अनेक वेळा मोठी लाल रंगाची टिकली किंवा मोठे लाल कुंकू लावले जाते तर काही वेळा चंद्रकोर काढली जाते, मात्र याचा आकारही चेहऱयाच्या कपाळाच्या उंचीनुसार ठरविला जातो. कारण कपाळपट्टी जर छोटी असेल तर फार मोठी टिकली चांगली दिसत नाही. तसेच कपाळ जर मोठे असेल तर जास्तीत जास्त मोठी टिकली कपाळावर उठून दिसते.  अनेक वेळा खडय़ांच्या चकचकीत अशा वेगवेगळय़ा टिकल्याही वापरण्याची रीत आहे, पण या टिकल्याही एका विशिष्ट कार्यक्रमासाठी किंवा विशिष्ट वेळेसाठी कपाळावर छान दिसतात. बऱयाच वेळा कपाळावर टिकली लावायला आवडत नसली तरी काही विशिष्ट ड्रेसवर किंवा विशिष्ट कार्यक्रमाच्या वेळेस कपाळावर टिकली लावल्यास चेहऱयातील गोडवा वाढण्यास मदतही होते.

अनेकदा मुली डायमंडच्या टिकल्यांचा वापर करताना दिसतात. या डायमंडच्या टिकल्यांमध्येही वेगवेगळा आकार व रंग उपलब्ध असतात. दक्षिणेकडे उभ्या टिकल्या लावण्याची पद्धत आहे. तसेच त्या टिकलीच्या भोवती पांढऱया रंगाने टिपके देऊन त्या टिकलीला रंगवण्याची पद्धती आपण पाहतो. विशिष्ट प्रकारचे गंध लावणे किंवा टिकल्या लावणे याला विशिष्ट असा नियम नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या टिकल्या किंवा गंध या आपल्या आवडीप्रमाणे आणि आपल्याला भावतील तशा काढल्या जातात, मात्र नियमित अभ्यास व कलात्मक दृष्टिकोन असल्यास अशा प्रकारे डिझाइन करण्याची कला आत्मसात करता येते व या कामात निपुण होता येते.

[email protected]