क्षेत्र विविध कलांचे

कलाक्षेत्रातील वैशिष्टय़पूर्ण गुण स्वतःमध्ये विकसित करणे आणि सादर करणे म्हणजे परफॉर्मिंग आर्ट. परफॉर्मिंग आर्टमधील करीअरच्या संधी जाणून घेऊया.

टीव्ही वाहिन्यांवर संगीत, नृत्याशीसंबंधित विविध कार्यक्रम-शो आपण पाहत असतो. या कार्यक्रमांसाठी आवश्यक असलेले कौशल्य म्हणजे अभिनय, म्हणजेच स्वतःच्या अंगी असलेल्या विविध कला.

कलाक्षेत्रातील वैशिष्टय़पूर्ण गुण स्वतःमध्ये विकसित करणे आणि सादर करणे म्हणजे परफॉर्मिंग आर्ट. परफॉर्मिंग आर्टस्मध्ये मुख्यत्वे करून सर्व कला/कौशल्यांचा समावेश होतो. संगीत, नृत्य, नृत्यदिग्दर्शक, संगीतकार, संगीत दिग्दर्शक, चित्रपट दिग्दर्शक, नाटय़ दिग्दर्शक, वेशभूषा डिझायनर, संगीत शिक्षक, नेपथ्यकार, कथालेखक, संभाषण लेखक, प्रकाशयोजना डिझायनर, नाटय़संहिता लेखक, विविध करमणूक वाहिन्यांमध्ये सादरीकरण करणारे कलाकार, रेकार्ंडग निर्माते, ऑनिमेटर इत्यादी.

या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी खास शैक्षणिक अर्हता असावीच लागते असे नाही, परंतु आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात ऑनिमेशन, लाइट अरेंजमेंट, साऊंड सिस्टम, वेशभूषा डिझाइन इत्यादीसाठी बारावीनंतरचे शॉर्ट टर्म कोर्सेस करणे आवश्यक असते.

साऊंड सिस्टमसाठी साऊंड इंजिनीअरिंग आणि वेशभूषा डिझाइनसाठी फॅशन टेक्नॉलॉजी हे अभ्यासक्रम असल्यास चांगले करीअर करू शकता.

 

काही संस्था

स्कूल ऑफ ब्रॉडकास्टिंग ऍण्ड कम्युनिकेशन मुंबई

l डिप्लोमा इन फिल्म मेकिंग

l डिप्लोमा इन थेटर ऑक्टिंग ऍण्ड परफार्ंमग आर्टस्

l सर्टिफिकेट कोर्स इन रेडिओ जॉकी.

l https://www.sbc.ac.in

एनएमआयएमएस मुंबई

l परफार्ंमग आर्टस्

l https://www.nmims.edu

नालंदा डान्स रिसर्च सेंटर मुंबई 

l बॅचलर ऑफ परफार्ंमग आर्टस् (नृत्य)

l मास्टर ऑफ परफार्ंमग आर्टस् (भरतनाटय़म)

l मास्टर ऑफ परफार्ंमग (कथ्थक)

l मास्टर ऑफ परफार्ंमग आर्टस् (मोहिनीअट्टम)

l https://www.nalandadancecollege.edu.in

रचना संसद इन्स्टिटय़ूट ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट

l डिप्लोमा कोर्स ऑक्टिंग

l इन डिप्लोमा इन डिजिटल फिल्म मेकिंग

l डिप्लोमा इन इव्हेंट मॅनेजमेंट

l डिप्लोमा इन फॅशन ऍण्ड टेक्स्टाइल डिझाइन

l डिप्लोमा इन म्युझिक

l डिप्लोमा इन फोटोग्राफी

l सर्टिफिकेट कोर्स इन साऊंड इंजिनीअरिंग ऍण्ड म्युझिक प्रोडक्शन

l सर्टिफिकेट इन परफार्ंमग आर्टस्  ऍण्ड इंडियन क्लासिकल डान्स

l https://rachanasansad.edu.in

या क्षेत्रामध्ये नोकरीच्या संधी कमी असल्या तरी स्वतःतील कला/कौशल्यांचा विकास उत्कृष्ट झाल्यास स्वतःला एक कलाकार म्हणून उत्कृष्ट रीतीने सिद्ध करू शकता.

n सुदाम कुंभार (निवृत्त प्राचार्य तथा समुपदेशक)