आरोग्यभान – घराचे निर्जंतुकीकरण : हे वाचा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. सुधीर गोरे

कोरोनाविषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना लोकांनी घरामध्ये विषाणूच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी निर्जंतुकांचा वापर वाढवला आहे. लोक ब्लिच व सॅनिटायझर्स वापरत फळे व भाज्या धुवत आहेत, त्वचेवर घरगुती क्लिनिंग किंवा निर्जंतुक उत्पादनांचा वापर केला जात आहे, नकळतपणे त्यांच्या शरीरामध्ये निर्जंतुकांनी प्रवेश केला आहे. पण, या उत्पादनांमध्ये रसायने असतात, जी विशेषतः योग्य प्रकारे न वापरल्यास तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे साबण/डिटर्जंट व पाण्याने हात स्वच्छ धुण्याची प्राचीन पद्धत कोविड-19 विरोधात गुणकारी आहे. सतत मिळत असलेल्या पुराव्यांमधून निदर्शनास येते की, नियमितपणे स्वच्छतेसाठी साबण व पाण्याचा वापर या विषाणू दूर करण्यासाठी आणि संसर्गांपासून प्रतिबंधासाठी पुरेसा आहे. ज्याप्रमाणे आपण साबण व पाण्याने आपले हात स्वच्छ धुतो, अगदी त्या प्रकारेच आपली घरे देखील स्वच्छ ठेवता येऊ शकतात.

निर्जंतुकांमध्ये घातक रसायने असतात क्लिनिंग व निर्जंतुक उत्पादने सूचनांनुसार वापरणे गरजेचे आहे. काही निर्जंतुकांमध्ये अमोनियम संयुगे असतात, ज्यामुळे दमा होऊ शकतो. त्यामुळे, सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. विशेषतः घरामध्ये लहान मुले व वृद्ध व्यक्ती असतील तर विशेष काळजी घेण्याची गरज आहे. ब्लिचिंगमुळे श्वसन, त्वचा व डोळ्यांना संसर्ग होऊ शकतो. हायड्रोजन पेरॉक्साईड, अल्कोहोल (इसोप्रोपिल अल्कोहोल किंवा इथेनॉल), सायट्रिक ऑसिड व लॅक्टिक ऑसिड असलेल्या निर्जंतुकांचा वापर करावा, पण खाद्यपदार्थ, कपडे, भांडी आणि निश्चितच मोकळ्या हातांवर त्यांचा वापर करू नये.

कोविड आजार पृष्ठभागापेक्षा संपर्कातून अधिक पसरतो. अनेक तज्ञांनी वेळोवेळी निदर्शनास आणले आहे की, विषाणू मुख्यत्वे व्यक्ती ते व्यक्ती संपर्कातून पसरतो. प्रभावी क्लिनिंग पृष्ठभागांवरून जीवाणूंना दूर करते आणि निर्जंतुकीकरण त्याच ठिकाणी त्यांना नष्ट करते. पण पृष्ठभाग सतत स्वच्छ करण्याबाबत धास्ती घेण्याची गरज नाही. नुकतेच सेंटर फॉर डिसीज कंट्रोल ऍण्ड प्रीव्हेंशन, यूएस अहवालामधून निदर्शनास आले की यूव्ही रेडिएशन, एलईडी ब्ल्यू लाइट्स किंवा टनेल्सचे सॅनिटायझेशन यांसारख्या पर्यायी निर्जंतुकीकरण पद्धती विषाणू नष्ट करण्यासाठी उपयुक्त ठरतात याबाबत कोणताच उत्तम पुरावा नाही. हवा खेळती नसल्यास निर्जंतुकाच्या उपयुक्ततेपेक्षा तुमच्या आरोग्यावर अधिक घातक परिणाम होऊ शकतो. सीडीसीचा अहवाल निदर्शनास आणतो की, औद्योगिक क्षेत्रांच्या स्वच्छतेसाठी फॉगिंग, धुराचा मारा आणि इतर अशाप्रकारची कार्ये मानवी आरोग्याच्या संदर्भात उपयुक्त ठरण्यापेक्षा घातक ठरू शकतात. यामागील कारण म्हणजे जागेमधून विषाणू पूर्णपणे नष्ट करण्यासाठी केल्या जाणाऱया फॉगिंगमुळे लोकांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.

योग्य क्लीनिंग आणि तुमच्या स्वतःचे व कुटुंबाचे संरक्षण करण्याबाबत सोप्या पायऱ्य़ा

पृष्ठभागांच्या योग्यप्रकारे स्वच्छतेसाठी साबणाचे पाणी वापरा.

तुम्ही निर्जंतुकाचा वापर करत असाल तर उत्पादनासंदर्भातील सर्व सूचना वाचा, ज्यामुळे तुम्हाला निर्जंतुक कशाप्रकारे काम करते आणि त्याचा कशाप्रकारे वापर करावा हे समजेल.

स्वच्छतेसाठी घातक रसायनांचा वापर करत असाल तर मास्क व प्रोटेक्टिव्ह आय गिअर परिधान करा; हवा खेळती राहण्यासाठी स्वच्छ करत असलेली खोली उघडी ठेवा. मुले व वृद्धांनी क्लिनिंग केल्यानंतर किमान 4 दिवस या खोलीमध्ये प्रवेश करू नये.

खोल्यांची साफसफाई करताना हवा खेळती राहण्यासाठी खिडक्या व दरवाजे उघडे ठेवा.

(लेखक कल्याण येथील फोर्टिस हॉस्पिटलमधील ट्रॉमा ऍण्ड इमर्जन्सीचे प्रमुख आहेत)