
>> ब्रिगेडियर हेमंत महाजन
चीनची आर्थिक ताकद प्रचंड आहे, त्या देशाने जो प्रकार इटलीबाबत केला तोच प्रकार हिंदुस्थानाबाबतही होऊ शकतो, यावर आपण लक्ष ठेवून आहोत का? आपण जास्त सावध राहायची गरज आहे.चिनी प्रभाव आपल्या मीडियामध्ये, विचारवंतांवर आहे. चीन आपल्याला इटलीप्रमाणेच गिळंकृत करण्याचा प्रयत्न करेल. आपण सावध रहायला पाहिजे, कारण रात्र वैऱयाची आहे.
ट्रेसी बियान्झ हे इटलीमधील एक प्रसिद्ध पत्रकार आहेत आणि अनकव्हर डीसीचे संस्थापक संपादक आहेत. प्रस्तुत लेख यांच्या लिखाणावर आधारित आहे. तीस वर्षांपूर्वी इटलीमध्ये अवैध घुसखोरांच्या प्रश्नाची सुरूवात झाली. इटलीने त्यांच्या शहरं व ग्रामिण भागातील वस्त्रोद्योगामध्ये कमी पगारावर काम करण्यासाठी चिनी लोकांची भरती सुरू केली होती. चिन्यांनी मात्र इटालियन पद्धतीच्या वस्त्रनिर्माणाचे तंत्र फारच झपाटय़ाने आत्मसात केले व मूळ इटालियन वस्त्रोद्द्योगाची वाट लावली.’मेड इन इटली’चे लेबल कायम ठेऊन चिन्यांनी इटलीचा वस्त्रोद्योग बळकावला. इटलीमध्ये हजारो चिनी कामगार चीनमधून आयात केलेला कच्चा माल वापरून स्वस्त कपडे, पादत्राणं व तत्सम उत्पादनं बनवून जगभरात स्वस्त किमतीत विकत. पिढयान्पिढय़ांपासून वस्त्रोद्योग करणाऱया इटालियन कुटुंबांना चिन्यांनी ग्रामीण भागातून विस्थापित केले आणि त्या परिसराला स्वत:ची वसाहतच बनवून टाकली.
चिनी कर चुकवेगिरीमध्ये वस्ताद होते. इटालियन लोकांना सर्व प्रकारचे कर व कामगार हिताचे नियम पाळावे लागत असतानाच चिन्यांनी मात्र करचुकवेगिरी करून व कामगारांसंबंधी नियम,कायद्यांना धाब्यावर बसवले. तसेच अवैध मानवी वाहतुक करून स्वत:चा व्यापार भरभराटीस आणला.
2019 ला जेव्हा ‘वन बेल्ट, वन रोड’ प्रकल्पाची सुरूवात झाली तेव्हा इटलीने चीनसोबत जगाला प्रभावित करणाऱया त्यांच्या प्रकल्पात सहभागाची इच्छा दर्शवली. आर्थिक सहकार्याच्या रूपात चीनने उत्तर इटलीचे ट्रिएस्टा बंदर विकसित करून त्याचा स्वत: वापर करायला सुरूवात केली.या प्रकल्पामुळे चिनी कच्चा माल व उत्पादनांच्या वाहतुकीसाठी आवश्यक असलेल्या सोयीसुविधांमध्ये प्रचंड गुंतवणूक झाली.
कर्जाच्या जीवघेण्या ओझ्याखाली दबलेला इटली चीनला होणारी निर्यात वाढवून व चिनी गुंतवणूकीला आकर्षित करून स्वत:च्या मरगळलेल्या अर्थव्यवस्थेत नवीन प्राण फुंकायचे स्वप्न बघत होता.इटली चीनवर अवलंबून आहे व चिनी भांडवल हे इटालियन अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार आहे. दुर्दैवाने चिनी गुंतवणूक आकर्षित करण्याच्या नादात इटलीने स्वत:च्या जनतेला गंभीर संकटात लोटल्याचे दिसते आहे.
आता मानवीय दृष्टिकोनातून मदत करण्याऐवजी चीन इटलीमधली आपली गुंतवणूक सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतोय.चीनमधून इटलीला जाणाऱया प्रचंड मदत व साहित्य सामग्रीच्या पुरवठय़ाचे कारण यामुळे स्पष्ट होत आहे.
इटलीमध्ये चिनी लोकांची संख्या पुष्कळच वाढली आहे. याशिवाय वेगवेगळ्या कारणासाठी इटलीमधून चिनी लोक चीनमध्ये जातात आणि अनेकजण इटलीमध्ये परत येतात. हे सगळे कोरोना व्हायरसला इटलीमध्ये पसरवण्यासाठी जबाबदार आहेत. अर्थात अनेक इटालियनसुद्धा वेगवेगळ्या कारणांमुळे चीनमध्ये जात असतात. त्यांच्या अनिर्बंधित जाण्यायेण्यामुळे कोरोनाचा प्रसार झाला.अमेरिकेनंतर इटलीमध्ये सर्वात जास्त मृत्यू करोनामुळे झाले आहेत. करोनाग्रस्त रुग्णांची संख्यादेखील जास्त आहे.
इटलीमध्ये वृद्धांच्या लोकसंख्याधिक्यासोबतच चीनच्या दबावात असलेले सरकार आहे. त्या सरकारने चीनच्या दबावाखालीच चिन्यांपासुन सामाजिक अंतर राखण्याच्या प्रयत्नांना खिळ घातली. इटलीतील घटनाक्रमाला समजून घेण्यासाठी खालील गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात.
गेल्या काही महिन्यांत चीनचा वाढता जागतिक प्रभाव सर्वसामान्यांच्या दृष्टिपथात येत असतानाच अगदी अमेरिकनांनादेखील औषधींसारख्या जीवनावश्यक गोष्टीच्या पुरवठय़ासाठी चीनवरचे अवलंबित्व जाणवायला लागले आहे.
इटलीमध्ये जे घडले त्यापासून हिंदुस्थानला काय शिकता येईल? सर्वात प्रथम इटलीच्या अर्थव्यवस्थेला मदत करण्याकरता तिथे चिनी कारखाने सुरू करायचे असे ठरले. .चीनने इटलीमध्ये आर्थिक घुसखोरी करायला सुरुवात केली. स्वस्त मजुरीकरिता चिनी नागरिकांना इटलीमध्ये आणण्यात आले. नंतर त्याचे लोंढय़ामध्ये रुपांतर झाले..पुढे अजून जास्त प्रमाणामध्ये चिनी नागरिकांनी घुसखोरी केली, काही घुसखोरी कायदेशीर होती आणि बरीचशी घुसखोरी ही बेकायदेशीर होती (तसे बांगलादेशींच्या बाबतीमध्ये हिंदुस्थानमध्ये घडत आहे) त्यामुळे पुष्कळशी अर्थव्यवस्था ही चिनच्या ताब्यात गेली. त्याचवेळी खालावणारी अर्थव्यवस्था आणि वाढलेले कर्ज यातून मार्ग काढण्यासाठी चिनशिवाय दुसरा पर्याय नाही. असे इटलीला वाटले. दुसरीकडे चिनने तेथील राजकीय पक्षांमध्येही घुसखोरी केली. इतर क्षेत्रांतमध्येही तेच केले. त्यामुळे इटलीची धोरणे चिनीला अनुकूल अशी बनवता आली. चीनचा इटलीवर प्रभाव एवढा वाढला की, नंतर त्याचे नियंत्रण इटलीच्या राज्यकर्त्यांना अशक्य झाले आणि त्याचे परिणाम आज इटलीला भोगावे लागत आहेत.
चीनची आर्थिक ताकद प्रचंड आहे, त्या देशाने जो प्रकार इटलीबाबत केला तोच प्रकार हिंदुस्थानाबाबतही होऊ शकतो, यावर आपण लक्ष ठेवून आहोत का? आपण जास्त सावध राहायची गरज आहे.चिनी प्रभाव आपल्या मीडियामध्ये,विचारवंतांवर आहे. चीन आपल्याला इटलीप्रमाणेच गिळंकृत करण्याचा प्रयत्न करेल. आपण सावध रहायला पाहिजे ,कारण रात्र वैऱयाची आहे. ह





























































