
>> उदय जोशी, बीड
तब्बल 60 वर्षांचा दैदिप्यमान राजकीय वारसा लाभलेले बीड जिल्ह्यातील माजलगाव मतदारसंघातील सोळंके कुटुंब, नक्कीच प्रेरणादायी राहिले. राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री भूषवलेले आजोबा, 20 वर्षे माजलगावचे विधानसभेत प्रतिनिधीत्व करत महसूल राज्यमंत्रीपद भूषवलेले चुलते, सहकार, सामाजिक आणि कृषी क्षेत्रामध्ये ग्राऊंडवर काम करणारे वडील असा संपन्न वारसा लाभला असतानाही कोणतेही पद रेडीमेड नको म्हणत आपले कर्तृत्व सिद्ध करून वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी सामाजिक कार्यातून राजकीय वाटचाल करत पंचायत समिती जिल्हा परिषदेतील महत्वाची पदे भूषवत नावलौकीक मिळवणारे जयसिंह सोळंके युवा पिढीसाठी दिशादर्शक आणि आदर्शच, आज त्यांचा वाढदिवस. वाढदिवसाच्या त्यांना मनपूर्वक शुभेच्छा.
राज्याच्या राजकारणात माजलगावच्या सोळंके कुटुंबाचं नाव नक्कीच आदराने घेतले जाते. सुसंस्कृत आणि संस्कारीत असलेल्या या कुटुंबाची राजकीय वाटचाल तब्बल 60 वर्षांची आहे. स्व.सुंदररावजी सोळंके यांच्या रूपाने जनतेच्या आग्रहाखातर राजकारणामध्ये प्रवेश केला. 17 वर्षे राज्याच्या मंत्रिमंडळात विविध मुख्य खाते सांभाळत पहिले उपमुख्यमंत्री पद भूषवले. केवळ हिच त्यांची ओळख राहिली नाही. या ओळखीपेक्षा त्यांनी केलेल्या विधायक कामानेच या कुटुंबाला जनतेने खरा नावलौकीक मिळवून दिला. स्व.सुंदररावजी सोळंके यांचा वारसा विद्यमान आमदार माजी मंत्री प्रकाशदादा सोळंके यांनी सक्षमपणे चालवला. हा वारसा चालवत असताना पुतण्या जयसिंह सोळंके यांना राजकारणाचे धडे दिले. जयसिंह धैर्यशिल सोळंके या युवकाने अल्पावधीतच राजकारणामध्ये आपला जम बसवला.
मन शुद्ध असेल, ध्येय ठरलेले असेल आणि काम प्रामाणिक असेल तर यश नक्की मिळते हेच वडिल धैर्यशिल सोळंकेंचे संस्कार अंगिकारत राजकारणामध्ये आपली वाटचाल सुरू केली. मितभाषी, संकटकाळात लोकांसाठी धावत जाण्याची तत्परता आणि धैर्याने तोंड द्यायची क्षमता यामुळे जयसिंह सोळंके माजलगावच्याच नव्हे तर बीड जिल्ह्याच्या राजकीय पटलावर अल्पावधीत नावारूपाला आले. संघटनकौशल्यामुळे युवकांची फौज निर्माण झाली. या युवकांना हाताशी धरून आणि पायाभूत काम करण्याची दृष्टी समोर ठेवून जे करायचे ते चांगले करायचे, चांगल्यासाठी करायचे हे धोरण समोर ठेवले. आजोबांनी दिलेला विकासाचा मंत्र, वडिलांनी दिलेला संस्काराचा गुरूमंत्र जयसिंह सोळंकेंच्या कामी आला.
राजकारण करत असताना प्रत्येक कुटुंबातील तरूणांनी आपल्या कुटुंबाची आधी काळजी केली पाहिजे. युवकांनी आपल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजे. यावर जयिंसह सोळंकेंचा भर सर्व काही सांगून जातो. आजकालच्या तरूणांनी व्यसनापासून दूर राहायला हवे. गावातील तरूणांनी एकत्र येवून गावासाठी काम केलं पाहिजे. गावाचा विकास साधला पाहिजे, अन्यायाच्या विरोधामध्ये संघटीत झालं पाहिजे, हीच प्रेरणा जयसिंह सोळंकेंनी शेकडो तरूणांना दिली आणि हे शेकडो तरूण आज जयसिंह सोळंकेंचे शेकडो हात झाले आहेत. पद कोणतेही मिळो, मिळालेल्या पदाला न्याय देता आला पाहिजे हे नविन राजकारणात उतरलेल्या तरूणांना जयसिंह सोळंके यांनी दाखवून दिले. धारूर पंचायत समितीचे उपसभापतीपद भूषवताना पंचायत समितीतला बोकाळलेला भ्रष्टाचार खणून काढण्याचे काम त्यांनी केले. जिल्हा परिषदेतील बांधकाम आणि अर्थ खाते सांभाळताना रेंगाळलेल्या कामांना गती देण्याचे काम त्यांनी केले. ग्रामीण भागातील मुलभूत विकास साध्य करण्याचे काम त्यांनी केले. वय कमी असले तरी वारसाने भेटलेली बुद्धी, वारसाने भेटलेली क्षमता नावारूपाला आणली. पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी समर्थपणे पार पाडण्याची ताकद जयसिंह सोळंके यांनी निर्माण केली.
राजकारण आणि समाजकारण करत असताना कधी वडिलांच्या कामात ना कधी चुलत्यांच्या कामात हस्तक्षेप केला. आपले स्वत:चे वेगळे विश्व निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. वेळ कोणतीही असो मदतीसाठी आवाज दिला की, जयसिंह भैय्या मदतीसाठी धावून आलाच म्हणून समजा. हा विश्वास त्यांनी सामान्य जनतेमध्ये निर्माण केला. गोरगरिबांच्या झोपडीला आपलं घर मानलं. गोरगरिबांना आपली माणसं मानली. संपन्न वारसा असताना डोक्यात हवा कधी जाऊ दिली नाही. लाघवी स्वभाव, संयम, समयसुचकता हे गुण जयसिंह सोळंके काही वेगळाच आहे हे सांगून जातात. तो रस्त्याावर उतरला की अपोआप तरूणांचा गराडा पडतो. तो भाषणाला उभा राहिला की सगळीकडे शांतता निर्माण होते. आणि तो एकदा कामाला लागला की काम फत्तेच होणार ही खात्री निर्माण होती. स्पष्टवचनी, शब्दाला किंमत देणारा, मित्र परिवारांसाठी स्वत:ला झोकून मदत करणारा, कुटुंबासाठी भावनिक होणारा, आपल्या लोकांसाठी धडपडणारा हा युवक असामान्यच हे नक्की. सर्वगुणसंपन्न, वैचारिक पातळी असणारा, संवेदनशिल मनाचा, जबाबदारीची जाण असणारा, कोणतंही संकट झुगारणारा हा तरूण नक्कीच लंबी रेस का ठरणार आहे.
वडील धैर्यशिल सोळंके यांचा पुत्र जयसिंहला कानमंत्र..
जयसिंह…! तू कष्टाळू आहेस. तुझ्यात संघटन कौशल्य आहे. तू आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक आहे. तुझा मेहनती स्वभाव तुला सर्व काही मिळवून देईल. 60 वर्षांचा दैदिप्यमान वारसा तुझ्यासोबत आहे. माजी उपमुख्यमंत्री स्व.सुंदरराव सोळंके साहेबांचा संपन्न वारशामध्ये तू घडला आहेत. हा संपन्न आणि दैदिप्यमान वारसा डोळ्यासमोर ठेवत तुला आगामी काळामध्ये काम करायचे आहे. जे काम हाती घेतले. ते प्रामाणिकपणे कर, निष्ठेने कर, राजकारण करत असताना शब्दाला मोठी किंमत असते. दिलेला प्रत्येक शब्द पाळण्यासाठी वचनबद्ध राहा, सामाजिक कामात स्वत:ला झोकून दे, गोरगरिबांचे, सामान्य माणसांचे आशिर्वाद नेहमी कामाला येतात. त्यांच्यासाठी काही कर, डोळ्यासमोर उद्दीष्ट ठेव, ध्येयवेडा हो, आखलेल्या धोरणाच्या चौकटीत राहून काम कर, तुझ्या पाठिशी सोळंके कुटुंबाचीमोठी शिदोरी आहे. कोणताही कलंक लावून न घेता वाटचाल करत रहा, नक्कीच यशाचे शिखर सर होईल.
असा आहे माझा जयसिंह, आईने व्यक्त केल्या भावना
जयसिंहबद्दल काय बोलावं, सुसंस्कारीत अशा या पुत्राचे जेवढे कौतुक करेल तेवढे कमीच. हट्टी असणारा जयसिंह, वाढत्या वयासह बदलत गेला. शांत, मितभाषी , प्रेमळ स्वभावाचा, वयस्कर लोकांबद्दल नेहमी आदर असणारा, सामान्य लोकांची आस्था ठेवणारा, कोणत्याही अडचणीवर मात करणारा, शिस्तीत जगणारा आणि संकटाशी दोन हात करणाऱ्या जयिंसहबद्दल मला नक्कीच अभिमान आहे. यश कोणतेही मिळो जयसिंहच्या डोक्यात यशाची हवा कधी जात नाही, नाटकीपणा त्याला आवडत नाही, अत्यंत प्रामाणिक आणि लोकांच्या मदतीला धावून जाणारा त्याचा स्वभाव, इतरांची संकट आणि अडचण आपले समजणारा जयिंसह, खोटा कधी वागू शकत नाही, मला आठवतंय त्याचा एक किस्सा, सातवीत असताना परिक्षा देत होता. त्याच्या शेजारचा मुलगा कॉपी करत होता आणि वर्गावर गार्डींगला असणारे सर त्या मुलाला मदत करत होते. जयसिंहला हे सहन झाले नाही. कॉपी करून पास होण्याला काय अर्थ असे म्हणत त्याने त्या शिक्षकाची तक्रारच केली.
कोण आहेत जयसिंह सोळंके ?
बीड जिल्हा परिषदेचे अर्थ आणि बांधकाम सभापती असणारे जयसिंह सोळंके माजी उपमुख्यमंत्री, मराठवाड्याचे भाग्यविधाते स्व.सुंदरराव सोळंके यांचे नातू, माजी मंत्री तथा माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाशदादा सोळंके यांचे पुतणे, माजलगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष, जिल्हा परिषदेचे माजी सभापती धैर्यशिल सोळंके यांचे पुत्र, जयसिंह सोळंके पुण्याच्या वाडिया कॉलेजमध्ये बीसीएची डिग्री घेत असताना आ.प्रकाश सोळंके यांनी 2011 साली मतदारसंघात बोलावून घेतले आणि तेव्हापासून आपले चुलते प्रकाशदादा सोळंके यांच्यावर निष्ठा ठेवून राजकारणात वाटचाल करत आहेत. 2012 साली मोहखेड या जन्मभूमीच्या गणातून जयसिंह सोळंकेंना पंचायत समितीची उमेदवारी देण्यात आली. मोठ्या मताधिक्याने विजयी होत राजकारणात यशाचा श्रीगणेशा केला. विजयानंतर जयसिंह सोळंके धारूर पंचायत समितीचे उपसभापती झाले. अडीच वर्षाच्या या कारकिर्दीत राजकारणाचे धडे गिरवत गावपातळीवरील समस्या समजून घेतल्या. उपसभापती काय करू शकतो हे दाखवून दिले. मस्तावलेल्या अधिकाऱ्यांना सुतासारखे सरळ केले. पंचायत समितीमध्ये योजनांचा झालेला बेसिक अभ्यास त्यांना जिल्हा परिषदेच्या कारकिर्दीत कामाला आला. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत जिल्हा परिषदेत अर्थ आणि बांधकाम सभापती झाले. जिल्हा परिषदेची आणि राज्याची आर्थिक स्थिती नाजूक असताना जयसिंह सोळंके यांनी 15 कोटी रूपयांच्या विकास कामाच्या योजना माजलगाव विधानसभा मतदारसंघात आणल्या. यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेच्या वर्गखोल्या, ग्रामीण भागातील रस्ते, नदी, नाल्यावरील पूल, जिल्हा परिषदेसाठीच्या शाळा, गावासाठी हातपंप, इंधन विहिर, तिर्थक्षेत्रासाठी हायमास्ट लाईट, पेवरब्लॉक, सिमेंट रस्ते आदी कामे पूर्ण केली.



























































