उंच तिचा झोका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
कविता महाजन, साहित्यिका

>> अंजली स. केऱ्हाळकर

सत्यातील शिवत्व आणि शिवत्वातील सौंदर्य यातून साहित्यपृती घडत जाते असे म्हणतात. साहित्याची निर्मिती ही लेखकाची एक सत्य शिवाला स्पर्शून गेलेली सुंदर तपश्चर्याच असते जणू! कविता महाजन यांच्या अनेक साहित्यपृतींचा मागोवा घेतला तर हे महत्त्व पटते. कथा, कविता, कादंबऱ्या, बालसाहित्य, निसर्गचित्रण, उत्तम चित्रकार, ब्लॉग लेखन अशा सर्व प्रकारांना घेरून धरून कविता महाजन यांनी एक ठसा उमटवला. आधुनिक काळाला पण धरूनच त्यांनी लेखनातील बदल पण सहज आत्मसात केले. त्यांच्या साहित्याची समृद्धता किती अथांग आहे हे आज बघताना त्यांचं आपल्यातून असं अनपेक्षितपणे निघून जाणं चटका लावून गेलं.

त्यांची साहित्य संपदा आपल्यालाही समृद्ध करून गेली. नव्यानेच आलेल्या ‘ब्र’ आणि ‘भिन्न’ या कादंबऱया म्हणजे वेगळय़ा विषयाची सहज मांडणी, कादंबरीचा आशय, विषयाच्या रचनेचं कौशल्य आणि लेखिकेच्या अनुभवात जाणवणारा जिवंतपणा, अनुभव प्रवासाची व्यापकता जाणवते मराठी साहित्य विश्वाला एक वेगळी अन् वैशिष्टय़पूर्ण वळण देणारी म्हणून ‘ब्र’चा प्रामुख्याने उल्लेख करता येईल.

समकालीन साहित्याचा धांडोळा घेतला तर दृष्टीस पडणारी त्यांची साहित्यसंपदा ही अनेक विषयांना मागून पुढून वळसे घेऊन, स्पर्शून येणाऱया दिसतात. सर्वसमावेशक आहे म्हणा ना! विषयांची बांधिलकी नव्हतीच, पण समरसून लिहिलेले अनेक तत्त्ववेधी लिखाण वाचकांना भुरळ पाडत होते हे नक्की! कधी बंडखोरी, कधी तरल, कधी संवेदनशील मनाची ग्वाही देणारे, तर कधी उद्रेकस्पर्शी, कधी भावव्यापूळ शब्दांची मांदियाळी असे अन् समाजिक विषयांचा जागर घडवून आणणारे अनेक प्रकार या अष्टपैलू लेखिकेने/ कवयित्रीने आपल्यासमोर आणले. अन् हीच दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानीतही केले. ‘उंच माझा झोका’ पुरस्कार 2015 ला, बहिणाबाई पुरस्कारही त्यांना मिळाले. त्यांच्या ‘कुहू’ या कादंबरीला पहिली हिंदुस्थानी मल्टीमीडिया कादंबरी म्हणून मान्यता मिळाली.

त्यांचे, ‘तत्पुरुष, धुळीचा आवाज, मृगजळीचा मासा, समुद्रच आहे एक विशाल जाळं, नव्या वाटा, नवी वळणे’ हे उल्लेखनीय काव्यसंग्रह आहेत. या व्यतिरिक्त वारली लोकगीते, ठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम या साहित्यपृतीही गाजल्या. त्या यात पूर्ण समरसून गेल्या होत्या. त्यांच्या साहित्याचा भावच असा होता की त्यांच्या प्रखर जाणिवांचे बिंब त्यात पडत होते. त्यांची भाव अभिव्यक्ती आणि शब्दांची पृती यात वैविध्य होतं. त्याचबरोबर संवेदनांचे मूल्य पण जपलेलं होतं. मनःबिंब त्यांच्या साहित्यात अचूक सापडतं अन् ही अनुभूती आपल्यालाच मिळते. हाच त्यांच्या काव्याचा, लेखनाचा प्रपृतीधर्म आहे.

कविता महाजन यांच्या साहित्यपृतींचा वेध घेताना जाणवतं की स्त्रीची सर्जनशीलता हा स्थायीभाव आहे. अन् हा तोल त्यांनी त्यांच्या काव्यातून सांभाळून घेतला आहे. कितीतरी व्यूहजाळे, भरकटलेपण, स्त्रीची वेदना, सनातन जखमा पोहोचत्या करताना सर्जनक्रियेतून स्वतःची पुनर्बांधणी करवून घेतात. मृगजळातील मासा या काव्यसंग्रहात हेच तर सांगितलं आहे. ‘मीच समुद्र… मीच जाळं मीच अंत… आभाळही मीच… हे सर्जन अन् स्वतःला शोधत शोधत जाणिवांच्या अभेद्य टोकाशी जाऊन भिडणारा ललाट लेख तिला सापडवायचा आहे. अन् तरी या जाणिवांचे कवडसे आपल्यासाठी सोडून अनंताच्या वाटेवर चालत्या झाल्या.

साहित्याची मूल्यं जपून समृद्ध वारसा वाचकांसाठी त्यांनी मागे ठेवला. हीच एक सत्य सौंदर्याची व्यापक अनुभूती…!

अल्याड
मृत्यूच्या अल्याड आपण दोघे
आपल्या त्वचेच्या आत लालस ओलं मांस
आपल्या रक्ताला वाहून नेतात नसा
आपली शुभ्र हाडं स्नायूंमध्ये मुलायम
निवांत

मृत्यूच्या अल्याड आपण दोघे
आपल्या तळव्यांवर नशिबाचे नकाशे
आपल्या पायांखाली हिरवं गवत आणि
जांभळी पिवळी गवतफुलं
झुलती

मृत्यूच्या अल्याड आपण दोघे
आपल्या डोळ्यांत नक्षत्र
आपल्या स्पर्शात वीज
आपल्यात आग
केशरनिळी

सगळं सत्य वाहून जावो पुरात
सगळं वास्तव जळून जावो ज्वाळांत
सगळं खरं खोटं बनो शब्दात
सगळं आकाश काळं बनो आणि माती
निळीशार
फिटो निराशा मिटोत संकोच
मृत्यूच्या अल्याड आपण दोघे

(कविता महाजन यांच्या ब्लॉगवरून साभार)

– [email protected]