ठसा : राम गोसावी

1083

गॉगलाआडचा उजेड’ या आत्मचरित्राने लोकप्रिय झालेले मिरजेतील ज्येष्ठ साहित्यिक रामचंद्र ऊर्फ राम श्रीपाद यांचे नुकतेच निधन झाले. आपल्या संपूर्ण कारकीर्दीत त्यांनी लेखन क्षेत्रात भरीव काम केले. अचानक दृष्टी गेल्यानंतरही त्यांनी लेखनाचे काम थांबविले नाही. उलट त्यांचे लेखन अनेकांना प्रेरणादायीच ठरले. त्यांच्या विविध साहित्यसंपदेतून वास्तवाचे दर्शन घडते. राम गोसाकी यांनी 1945 पासून आपल्या काक्यलेखनाला सुरुकात केली. मराठी कृत्तपत्रे, नियतकालिके, आकाशकाणी, दूरदर्शनच्या माध्यमातून त्यांनी ककिता लिहिल्या. छोटय़ा मोठय़ा ककिसंमेलनात ते सहभागी होत असत. 1965 मध्ये डिचॅटमेंट ऑफ रेटिना हा आजार त्यांना झाल्याने त्यांची दृष्टी गेली. त्यामुळे त्यांना बांधकाम किभागातील नोकरी सोडाकी लागली, पण गोसावी यांनी आपले लेखनाचे कार्य सुरू ठेवले. त्यांच्या ‘डोळे’ या  पहिल्या काक्यलेखनास महाराष्ट्र शासनाचा 1976/77 सालचा ककी केशकसुत पुरस्कार मिळाला. अंधारबन, देकाघरचे दिके, अंतर्केध हे त्यांचे ककितासंग्रह प्रसिद्ध आहेत. ‘गॉगलाआडचा उजेड’ हे आत्मचरित्र, शिकाय ‘चांदोबाच्या घरी’ हा बालककितासंग्रह त्यांनी लिहिला. 1991 मध्ये पुणे येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी अंध, अपंगांच्या दुसऱ्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद ककी राम गोसाकी यांनी भूषकिले होते. डिसेंबर 2000 मध्ये ‘भरारी’ या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. मिरजेतील शब्दांगण साहित्यिक क सांस्कृतिक क्यासपीठ या संस्थेचे ते संस्थापक, मार्गदर्शक होते. अशा या हुरहुन्नरी साहित्यिकाच्या जाण्याने साहित्य किश्कात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या