
>> मुग्धा सावंत
लग्नसराईत मंगळसूत्र, बांगडय़ा, तोडे, कंबरपट्टा, बाजुबंद अशा वेगवेगळय़ा दागिन्यांच्या कलेक्शनमध्ये नथीचा तोरा काही औरच असल्याचे दिसते. पाचकळशी, कुणबी, पेशवाई, कोळी… यांच्या पारंपरिक नथीला आधुनिकतेचा साज चढवत आता लग्नसराईत ओव्हरसाईज्ड नथीचा ट्रेण्ड बहावा कलेक्शनने नववधूंसाठी आणला आहे. लग्नसराईच्या निमित्ताने वैशाली नगरकर यांच्या बहावा क्रिएशनने नथीसह आणखी काही क्रिएटीव्ह दागिने ग्राहकांसाठी उपलब्ध केले आहेत.
नववधु पिया मी बावरते, असे म्हणताना नववधुचा साज नथीशिवाय कसा पुर्ण होईल. ही नथ अधिक उठावदार आणि ठसठशीत दिसण्यासाठी नववधूंना बहावा क्रिएशनने चांगलीच व्हरायटी उपलब्ध करून दिली आहे. ओव्हरसाईज्ड नथीचा ट्रेण्ड सध्या जोरदार भाव खात आहे. लग्नसराईत ठुशी, तण्मनी, तोडे या पारंपरिक दागिन्यांची एक वेगळीच क्रेझ आपण पाहतो. पण यंदाचा सिझन हा नथीने क्रॅक केला आहे.
ओव्हरसाईज्ड नथ या डिमांडप्रमाणे कस्टमाईज्ड करताना त्यातही नावाची, साडीप्रमाणे मॅचिंग, अत्याधुनिक टच असलेली, मोर आणि तत्सम पारंपरिक डिझाईनप्रमाणे या नथी उपलब्ध आहे. आपल्या अहोंचं नाव नथीत कोरून घ्यायला हल्लीच्या नववधु फारच उत्सुक असल्याने अशा नावाच्या नथींना मोठी मागणी आहे. जितकं स्किल वर्क तशी किंमत असा सिंपल फंडा या क्रिएशनचा असल्याने अगदी 1700 ते 2500 रुपयांच्या रेंजमध्ये या नथी उपलब्ध आहेत. बहावाने यंदा लग्नसराईसाठी चिंचपेटी, ठुशी, तण्मनी, लक्ष्मी हार, नावाचे मंगळसुत्र तर किएटीव्ह हेअरपिन्स बाजारात आणले आहे यामध्ये मुंडावळ्या या विशेष आकर्षण ठरत आहे.
कुठे मिळेल
बहावा क्रिएशनचे इन्स्टाग्राम पेज आहे. या पेजवरून आपण थेट संपर्क करून आपल्याला हवा तो दागिना मागवू शकता. तर युटय़ुब चॅनलच्या माध्यमातून घरच्या घरी डीव्हायएमने आपण दागिना घडवू शकता. यासाठी आवश्यक ते साहित्य किएशनच्या ठाणे येथील वर्कशॉपमधून घेता येईल.
युटय़ुब लर्नर ते युटय़ुबर
लूपींग फार्मसिस्टमध्ये अॅग्रीकल्चर मॅनेजरपदावर काम करताना सुरू झालेला बहावा क्रिएशनचा प्रवास पुढे व्यापक होत गेला. यामुळे नोकरी सोडून पूर्ण वेळ आपल्या आवडीचं काम सुरू केल्याचं वैशाली सांगतात. तुला हवं ते कर आणि त्यामुळेच युटय़ुब लर्नर ते युटय़ुबर हा प्रवास सोपा झाला.
अशी झाली सुरुवात
हॅण्डमेड ज्वेलरीचा ट्रेण्ड सुरू झाला आणि डिआयव्हाय गोष्टी नव्यानव्याने समोर येऊ लागले. आर्टिफिशियल ज्वेलरीच्या भाऊगर्दीत साधारणतŠ 11 वर्षांपूर्वी बहावा क्रिएशन हा ब्रॅण्ड नावारूपास आला. वैशाली नगरकर यांनी इच्छुकांना शिकवण्याच्या हेतूने क्लासेसच्या माध्यमातून या क्रिएशनची सुरूवात केली. हॅण्डमेडला काही स्कोप आहे का अशी विचारणा झाल्यावर या विषयात संशोधन करून हॅण्डमेड ज्वेलरीच बनवायची असं ठरवलं. सुरूवातीला ज्यांना काही उत्पन्न जनरेट करायचे आहे अशा दोन विद्यार्थ्यांपासून हा क्लास सुरू होऊन आज हजारहून अधिक कारागिर वैशाली यांनी तयार केले आहेत. ग्राहकांना हवे तसे प्रोडक्ट तयार करण्याकडे अधिक कल असल्याचे वैशाली सांगतात.



























































