ठसा – डॉ. मानवेंद्र काचोळे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रशांत गौतम

जवखेडसारख्या (कन्नड) ग्रामीण भागातून शहरात येऊन प्रतिपूल परिस्थितीवर मात करीत शिक्षण पूर्ण करून पीएच.डी. मिळवणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पुलसचिवपदाची जबाबदारी पार पाडणे आणि या शैक्षणिक प्रवासाच्या सोबतच शेतकरी संघटनेची नाळ कायम ठेवणे सोपे नव्हते. मात्र डॉ. मानवेंद्र काचोळे या ध्येयवादी लढवय्या व्यक्तिमत्त्वाने आणि संशोधक शेतकरी कार्यकर्त्याने ते सिद्ध केले. संभाजीनगरात त्यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाने आपण शैक्षणिक क्षेत्रातील एक प्रगल्भ व्यक्तिमत्त्व गमावले आहे. डॉ. मानवेंद्र हे संशोधक वृत्तीचे प्राध्यापक. जेवढय़ा तळमळीतून विद्यापीठात विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे काम करायचे, त्याच तळमळीतून शेतकरी संघटनेसाठी, कष्टकरी शेतकऱयांसाठी काम निष्ठापूर्वक करायचे. त्यांच्या निधनाने विद्यापीठ प्रशासनाचे आणि शेतकरी चळवळीचेही नुकसान झाले आहे. ‘शेतकरी संघटनेचा बिल्ला लावलेला प्राध्यापक’ अशी त्यांची ओळख निर्माण झाली होती. ती त्यांनी अखेरपर्यंत जपली. कन्नड तालुक्यात जवखेड येथील रहिवासी असलेले डॉ. काचोळे शिक्षणाच्या निमित्ताने संभाजीनगर शहरात आले आणि शहराचाच एक भाग होऊन गेले. 2006 ते 2010 या काळात काचोळे विभागप्रमुख व व्यवस्थापन परिषदेचे सदस्यही होते. 2009 ते 2010 या काळात विद्यापीठाचे पुलसचिव होते. मे 2014 मध्ये ते विद्यापीठ जीवरसायनशास्त्र्ा विभागप्रमुख प्राध्यापकपदावरून सेवानिवृत्त झाले. सध्या ते एम.जी.एम. विद्यापीठात बायोटेक्नॉलॉजीत संशोधक संचालक म्हणून कार्यरत होते. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येण्यापर्यंतच्या प्रवासात त्यांचा युक्रांद (युवक क्रांती दल) संघटनेशी काही काळ संबंध आला होता. मात्र अखेरपर्यंत त्यांची नाळ जुळली ती शेतकरी संघटनेशीच. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्यासोबत काम केले. आपल्या कार्यातून घेतलेल्या भूमिकेतून डॉ. काचोळे यांनी शरद जोशी यांचा विश्वास संपादन केला. हमी भावाची बंधने झुगारून शेतकऱयांना बंधनात अडकवणारे कायदे रद्द करा, ही त्यांची ठाम भूमिका. खुल्या शेतमाल बाजारपेठेचे ते कट्टर विरोधक होते. शेतकरी संघटनेचे नेते होते. राष्ट्रीय कार्यकारिणीत सदस्यही होते. स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. नुसते काम पाहिले असे नाही, तर 2004 साली परभणी लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवून पाहिली आणि पराभूतही झाले. निवडणूक प्रचाराचे त्यांचे म्हणून एक तंत्र होते. त्यात त्यांनी स्वतःचे नाव व निशाणी न सांगता केवळ शेतकरी हिताचीच भूमिका सातत्याने मांडली. काचोळे हे कन्नड तालुक्यातील. परभणीकर नसतानाही त्यांनी 8,496 एवढी मते प्राप्त केली. त्याचे कारण म्हणजे त्यांनी घेतलेली शेतकरी हिताची भूमिका. डॉ. काचोळे हे शास्त्र्ाज्ञ शेतकरी होते. राजकीय अभ्यासाप्रमाणेच त्यांचा अर्थशास्त्र्ा आणि समाजशास्त्र्ााचाही चांगला व्यासंग होता. त्यामुळेच ते परखड स्वतंत्रतावादी विचारांचे पुरस्कर्ते होते. विद्यापीठात स्टुडंट काwन्सिलची निवडणूक असताना तर त्यांनी स्वतःहून पराभव स्वीकारला. त्यामुळे त्यांचा प्रतिपक्ष असलेल्या दलित पँथरच्या गंगाधर गाडे यांना फायदा झाला. राजकारणात अशा प्रकारचे बेरजेचे राजकारण करणारे अपवादानेच आढळतात. लोकसभेची निवडणूक लढवत असताना स्वतःसाठी काही मागणारे अनेक पुढारी आपल्याला दिसतील, पण काचोळे त्यातले नव्हते. त्यांनी स्वतःसाठी कधी काही मागितले नाही. उलट शेतकरी हिताच्या भूमिकेचा सातत्याने पुरस्कार केला. यासंदर्भात काचोळे यांची आठवण अमर हबीब यांनी वृत्तपत्रीय प्रतिक्रियेत सांगितली. ‘‘काचोळे यांच्याशी 1994 च्या सुमारास आमचा संबंध आला. युक्रांद्रमधून शेतकरी संघटनेत येताना मी दुवा ठरलो. त्यामुळे सोबत काम करता आले. या काळात डंकेलचा विषय ऐरणीवर होता. हा प्रस्ताव नेमका काय आहे, असे आम्ही त्यांना विचारीत असू तेव्हा काचोळे व आम्ही मित्रमंडळी मित्राच्या दुकानात रात्री दोन वाजेपर्यंत चर्चा करायचो. त्यावेळी त्यांनी हा चार-पाचशे पानांचा डंकेल प्रस्ताव आम्हाला अनुवाद करून सांगितला’’. यावरून डॉ. काचोळे यांच्या व्यक्तिमत्त्वाची वेगळी ओळख होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे विद्यापीठाचा संशोधन दर्जा वाढविण्यातही त्यांचे मौलिक योगदान राहिले आहे. त्यांच्या निधनाने  शेतकरी संघटनेचा निष्ठावंत कार्यकर्ता, व्यासंगी, अभ्यासू प्राध्यापक आपण गमावला आहे.