
आपली आवडती दुधाची उत्पादने निवडताना तुम्ही स्वतःला काही विचारणे आवश्यक आहेः या उत्पादनांचा माझ्या आणि माझ्या कुटुंबीयांच्या आरोग्याला लाभ होईल? हे उत्पादन पोषक आणि सुरक्षित आहे का? ‘सुरक्षित अन्न’ समजल्या जाणाऱया अन्नपदार्थांबद्दल जागरुकतेचा अभाव हे हिंदुस्थानात अजूनही सर्वात मोठे आव्हान आहे. असुरक्षित अन्नपदार्थ काही वेळा अज्ञात स्रोतांतून येतात, तर काही वेळा त्यात भेसळ असते, त्यांच्यावरील प्रक्रिया किंवा त्यांचे पॅकेजिंग अयोग्य स्थितीत झालेले असते. अशा अन्नपदार्थांमध्ये तुमच्या आरोग्य व स्वास्थ्यावर नकारात्मक परिणाम करणारे हानीकारक घटक असू शकतात. तुमच्या आवडत्या दुग्धोत्पादनांपैकी सर्वोत्तम कसे निवडायचे हे शोधून काढू.
-
दुधाच्या दर्जाबद्दल वाढत्या चिंता
हिंदुस्थान हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक आहे. 2018-19 मध्ये हिंदुस्थानात तब्बल 188 दशलक्ष टन दुधाचे उत्पादन झाले. दुधांच्या उत्पादनाचा वापर वाढत असल्यामुळे ग्राहकांच्या घरपोच दिल्या जाणाऱया दुधाच्या दर्जाबद्दल चिंता निर्माण झाली आहे. दूध काढण्याची प्रक्रिया, त्यानंतर ते एकत्र करणे आणि साठवून ठेवणे या प्रक्रियांत माणसाकडून किंवा पर्यावरणातून किंवा अंगभूत पॅथोजेन्सच्या (रोगकारक घटक) वाढीमुळे दूध दूषित होण्याचा धोका असतो. अन्नसाखळीतील गैरव्यवस्थापन आणि स्वच्छतेच्या अभावामुळेही दूध व दुधाची उत्पादने दूषित होण्याची संभाव्यता वाढते.
-
सुयोग्यरीत्या प्रक्रिया केलेले आणि पॅकेजिंग केलेले दूध पिण्यास सुरक्षित असते
यूएचटीचा अर्थ काय होतो? यूएचटी म्हणजे अल्ट्रा-हाय टेम्परेचर आणि अतिउच्च तापमान म्हणजे पिण्यापूर्वी दूध उकळून घेतले की झाले असे नाही. यूएचटी दुग्धोत्पादनांमध्ये अल्प कालावधीसाठी खूप अधिक तापमानावर औद्योगिक प्रक्रिया केली जाते आणि दुधातील पोषक घटक टिकून राहतील याची काळजी घेऊन त्यातील जिवाणू नष्ट केले जातात. हे या अल्प काळात पूर्ण होणाऱया उपचारामुळे शक्य होते. तुम्ही जेव्हा यूएचटी दूध उत्पादन निवडता, तेव्हा या यातील दुधावर योग्य प्रक्रिया करण्यात आली आहे आणि ते सुरक्षित व निरोगी आहे अशी खात्री बाळगायला काहीच हरकत नाही.
-
सर्व पॅकेज्ड दूध हे यूएचटी ट्रीटेट व सुरक्षित असते का?
नाही. दुधाची असेप्टिक कार्टन्स सहसा यूएचटी ट्रीटेट असतात. दुधाच्या उत्पादनांवर केली जाणारी प्रक्रिया हा सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी एकमेव महत्त्वाचा घटक नाही. त्या उत्पादनांचे पॅकेजिंग कसे केले जाते आणि ते साठवले कसे जाते हेही तेवढेच महत्त्वाचे आहे. तुम्ही निवडत असलेल्या पॅकेजिंगबाबत सावधगिरी बाळगायची, तर कार्टन पॅकेजिंग हा सुरक्षित व सोयिस्कर पर्याय आहे. टेट्रापॅकसारख्या कंपन्या असेप्टिक कार्टन पॅकेजिंग करतात. यात संरक्षणाचे सहा स्तर असतात आणि त्यामुळे दुधाचे प्रकाश, ऑक्सिजन, आर्द्रता किंवा जिवाणूंपासून संरक्षण होते. कार्टन पॅकेजिंगमुळे तुम्ही दुधाची उत्पादने फ्रीजशिवाय कित्येक महिने ठेवू शकता. त्यामुळे हा खरोखरच सोयिस्कर पर्याय आहे. शिवाय यामध्ये कोणत्याही प्रकारचे प्रिझर्वेटिव्हही वापरले जात नाही.
-
दीर्घ शेल्फ लाईफ म्हणजे प्रिझर्वेटिव्ह वापरणे असे नाही
यूएचटी दुग्धोत्पादनांचे पॅकेजिंग उघडले नाही, तर ती सुपरमार्केटच्या शेल्फवर किंवा घरात दीर्घकाळ कशी टिकतात? असा प्रश्न तुम्हाला पडत असेल. यूएचटी दुग्धोत्पादने अनेक महिने टिकतात. कारण त्यांच्यावर यूएचटी ट्रीटमेंटद्वारे प्रक्रिया केलेली असते आणि त्यांचे पॅकेजिंग असेप्टिक (सुयोग्य) असते. त्यामुळे आतील दूध यूएचटी प्रक्रियेद्वारे सुरक्षित करण्यात आले आहे याची खात्री केली जाते आणि त्यानंतर असेप्टिक पॅकेजिंग वापरून ते सुरक्षित ठेवले जाते. हे पॅकेजिंग उघडले नाही तर सहा महिन्यांपर्यंत उत्पादने टिकतात. कारण पॅकेजिंगमुळे कोणत्याही बाह्य घटकाची उत्पादनाशी आंतरक्रिया होऊ शकत नाही आणि ते नासत नाही. एकदा का पॅकेजिंग उघडले की मात्र उत्पादन फ्रीजमध्ये ठेवायला विसरू नका.





























































