प्रासंगिक – शक्तीच्या उपासनेचा उत्सव

>> दिलीप देशपांडे

वर्षभरात गणेशोत्सव आणि दुर्गा उत्सव अर्थातच नवरात्रोत्सव असे दोन मोठे उत्सव आपण साजरे करत असतो. गणेशोत्सव आटोपला की नवरात्राचे वेध लागतात. नवरात्र म्हणजे शक्तीची उपासना. शक्ती म्हणजे देवी. नवरात्राच्या नऊ दिवसांत देवीने अनेक दैत्यांचा संहार केला. महिषासुराचाही वध केला. म्हणूनच महिषासुरमर्दिनी नाव रूढ झाले. या तिच्या शक्ती रुपाचीच पूजा नवरात्रीत केली जाते.

।। ‘या देवी सर्वभूतेषु शक्ति रुपेनसंस्थिता, नमस्तस्ये नमस्तस्ये नमस्तस्ये नमो नमः’।। हाच जप आपण म्हणतो. नऊ दिवस होईल तेवढी जास्तीत जास्त या शक्तीदेवीची उपासना करायची असते. देवीच्या पाठाचे वाचन करायचे असते. अनेक ठिकाणी देवीचे पाठ केले जातात.

शैलपुत्री, ब्रम्हचारिणी, चंद्रघंटा, पुष्मांडी, स्पंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिदात्री अशी देवीची नव रूपे आहेत. महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या रूपातही देवीची पूजा केली जाते.

नवरात्रीचे नऊ दिवस वेगवेगळ्या फुलांच्या माळा घालण्याची प्रथा अनेक ठिकाणी आहे. पहिली माळ-शेवंती, सोनचाफा अशा पिवळ्या फुलांची दुसरी माळ-मोगरा, तगर, अनंत, चमेली अशा पांढऱया फुलाची.

तिसरी माळ-गोकर्ण, निळी फुले, पृष्णकमळ. चौथी माळ-अबोली, तेरडा, केशरी फुले. पाचवी माळ-बेल. सहावी माळ-कर्दळीची फुले. सातवी माळ-झेंडूची फुले. आठवी माळ-कमळ, गुलाब, जास्वंदी आणी नवव्या मांडला कुंकुमार्चन करतात.

नवरात्राच्या आरतीत देवीच्या रोजच्या रूपाचे वर्णन आहे. प्रतिपदेला घटस्थपाना, द्वितीयेला चौसष्ट योगिनी पूजा, तृतीयेला शृंगार,चतुर्थीला विश्वव्यापक जननी, पंचमीला उपांगललिता, षष्ठाrचे दिवशी गोंधळ, सप्तमीच्या दिवशी सप्तश्रृंग गडावर, अष्ठमीला अष्टभुजा नारायणी, नवमीला नवदिवसांचे पारायण होते आणि दशमीच्या दिवशी अंबा सीमोल्लंघनाला निघते.

नवरात्रात जोगवा मागणे हाही एक देवी उपासनेचा प्रकार आहे. पाच घरी जाऊन मूठभर तांदूळ किंवा पिठाचा जोगवा मागतात. आपल्यातला अहंकार नष्ट व्हावा ही यामागची कल्पना आहे.

महाराष्ट्रात – कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरची रेणुका माता, तुळजापूरची तुळजाभवानी ही तीन पूर्ण पीठं, तर वणीची सप्तश्रृंगी देवीचे अर्ध शक्तिपीठ अशी साडेतीन शक्तिपिठे आहेत.

नवरात्रात इथे जाऊन दर्शन घेणे खूप भाग्याचे समजले जाते. दरवर्षी या ठिकाणी भाविकांची गर्दी होत असते. मात्र यंदा कोरोना संकटामुळे या सर्व उत्सवावर बंधने आली आहेत. ती आवश्यकही आहेत. तथापि, या देवीच्या उत्सवात गेल्या काही वर्षांत बरेच बदल झाले आहेत. त्याचे व्यापारीकरण होत आहे. मार्पेटिंग होते.

नवरात्रोत्सवाचा उपयोग मार्पेटिंगसाठी केला जातो. एक वेगळे वळण सार्वजनिक उत्सवाला येत आहे. पण नवरात्रात अनेक ठिकाणी विशेष कार्य करणाऱया, शौर्य गाजवणाऱया स्त्री शक्तीचा सन्मानही केला जातो. त्यांना नवदुर्गा म्हणून संबोधण्यात येते. नवरात्र हा शारीरिक व आत्मिक शुद्धतेचा काळ मानला जातो. पण त्याच काळात एकीकडे काही अपप्रकार घडत असतील, घडवून आणले जात असतील, अपप्रवृत्तीचा प्रवेश होत असेल तर हे थांबायला हवे. या पवित्र उत्सवाचे पावित्र्य टिकायलाच हवे. स्त्री शक्तीचा आदर करायला हवा. हे आपणच करायला हवे.

आपली प्रतिक्रिया द्या