
वर्षे येतात, वर्षे जातात. वेळ, काळ कोणासाठी थांबत नसतो. उरतात त्या फक्त गेलेल्या वर्षातल्या आठवणी. 2020 या वर्षाला कोरोना वर्ष म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. एक अतिसूक्ष्म विषाणू ज्याने गेले दहा महिने संपूर्ण जग थांबवले. त्यामुळे न भूतो न भविष्यति अशा या उद्भवलेल्या रोगावर कोणतेच रामबाण उपाय, उपचार, औषध नसल्याने सर्व व्यवहार अक्षरशः ठप्प झाले. त्यामुळे संपूर्ण जग आज आर्थिक मंदीच्या सावटाखाली आहे. आपल्या देशात व परदेशात या रोगावरील लसीचे संशोधन अंतिम टप्यात असून येणाऱ्या नवीन वर्षात आपण नक्कीच या संकटावर मात करणार आहोत. अशा सकारात्मक विचारांची येणाऱ्या नववर्षात खरी गरज आहे. आपण जेव्हा नवीन वर्षाकडे वाटचाल करतो तेव्हा मागे वळून झालेल्या चुका, राहून गेलेल्या गोष्टी त्याची पूर्तता करण्याच्या दृष्टीने पावले टाकत असतो. 2020मधील संकट ही एक नैसर्गिक आपत्तीच म्हणावी लागेल आणि या संकटामुळे सर्वांचेच आर्थिक, शारीरिक, मानसिक नुकसान झाले. इतकेच काय, पण काही दुर्दैवाने मृत्युमुखीसुद्धा पडले. अशा या संकटातून आपण नक्कीच काहीतरी शिकलो तर यामधून काही संधीसुद्धा निर्माण झाल्या. जिवावर बेतलेल्या या संकटावर कोणतेही औषध नसताना संसर्ग व प्रादुर्भाव वाढू नये म्हणून पेंद्र सरकार आरोग्य विभाग व राज्य शासनाची मार्गदर्शक तत्त्वे नियम पाळून आपण इतर देशांच्या तुलनेत काहीअंशी समाधानकारक नियंत्रण आणले. आपल्याकडील सेवा व सुविधा, लोकसंख्या याचा विचार करता ते कठीणच होते. संचारबंदी, लॉकडाऊनमुळे आर्थिक चिंताजनक झालेली आर्थिक परिस्थिती, वाढत गेलेली आर्थिक मंदी, रोजगारावर झालेला परिणाम यामुळे काwटुंबिक बजेट पूर्णपणे कोसळले. इतर क्षेत्राप्रमाणे शिक्षण क्षेत्रालासुद्धा मोठा फटका बसला. त्यामुळे विद्यार्थ्याचे होणारे नुकसान यामुळे एक प्रकारे मानसिक ताण वाढत गेला. परंतु या कालावधीतसुद्धा सकारात्मक घटना घडल्या व जीवनशैलीतसुद्धा बदल झाला. माणसांमधील देवपण समोर आले. आरोग्य, शिक्षणाप्रमाणे काwटुंबिक व्यवस्थासुद्धा सुदृढ झाली. लॉकडाऊन व Work from Homeमुळे सर्वजण घरात असल्यामुळे एकमेकांच्या सवयी, आवडीनिवडी या प्रकर्षाने जाणवू लागल्या. त्यामुळे घरातील कामामध्ये हातभार लावणे, मिळालेल्या फावल्या वेळेत छंद, आवड जोपासणे याकडे कल वाढला. नात्यांमधील वीण अधिक घट्ट होऊ लागली. सार्वजनिक स्वच्छता, नियमांचे पालन हेही आपण अनुभवले. संसर्ग व संपर्प टाळून खरेदी विक्रीचे आर्थिक व्यवहार डिजिटल झाले. यामुळे बहुतांशी ज्येष्ठ नागरिकांनीसुद्धा डिजिटल व्यवहारात आपली रुची दाखवली आणि तो आत्मसात करण्याचा प्रयत्नसुद्धा आपण पाहतोय. हे संकट अजून गेलेले नसतानासुद्धा झालेले हे सकारात्मक बदल नक्कीच समाधानकारक आहेत. येणाऱ्या आगामी वर्षात या बदलामध्ये संधी लपलेल्या आहेत, त्या आपण अचूक हेरायच्या आहेत आणि त्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून नव्या वर्षाचे स्वागत करावयाचे आहे. ती सकारात्मकता आणि ऊर्जा घेऊन आपण या संकटावर नक्की मात करू आणि पुढे जाऊ.
पुरुषोत्तम कृ. आठलेकर, [email protected]




























































