
कर्नल अभय बाळकृष्ण पटवर्धन (निवृत्त) n [email protected]
इराणचे ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ मोहसेन फख्रिझादे यांची मध्यंतरी हमरस्त्यावर हत्या करण्यात आली. ही हत्या इस्रायली गुप्तचर संस्था ‘मोसाद’ने अमेरिकेच्या मदतीने जीपवर बसविलेल्या मशीनगनला उपग्रहाद्वारे नियंत्रित करून घडवून आणली असे सांगण्यात येत आहे. तसे असेल तर चीन आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांचे ‘लक्ष्य’ असलेल्या हिंदुस्थानसाठी ही हत्या म्हणजे एक इशाराच ठरू शकतो. सध्या देशात जे अराजकी वातावरण निर्माण केले जात आहे त्याचा गैरफायदा घेत अशा हल्ल्याचा प्रयत्न हिंदुस्थानचे शत्रू करू शकतात. त्याला तोंड देण्यासाठी आपण कितपत तयार आहोत?
इराणचे साठ वर्षीय अणुशास्त्रज्ञ मोहसेन फख्रिझादे यांच्या 27 नोव्हेंबर 2020 रोजी झालेल्या हत्येचा कठोर बदला घेण्याचा विडा इराणचे राष्ट्रपती हसन रौहानींनी उचलला आहे. फख्रिझादेची हत्या इस्रायलच्या मोसाद या गुप्तचर संस्थेने अमेरिकेच्या मदत/सल्ल्याने केली याबद्दल इराणमध्ये एकमत आहे. फख्रिझादे फार पूर्वीपासून मोसादच्या हिट लिस्टवर होता. जागतिक मुत्सद्दी आणि संरक्षण तज्ञांनुसार पुरेपूर तयारीने केलेल्या या वर्षातील सामरिक महत्त्वाच्या दुसऱ्या हत्येविरुद्ध इराण त्वरित पाऊल उचलणार नाही. अमेरिका, इस्रायल व त्याच्या मध्यपूर्वेतील सहयोग्यांच्या प्रचंड सामरिक व आर्थिक दडपणातून बाहेर पडण्यासाठी धडपडणारा इराण सध्या त्याच्या पुठल्याही सामरिक किंवा हिंसात्मक कारवाईचे गंभीर परिणाम होतील या अलिखित धमकीखाली आहे हे प्रत्ययाला येते. मात्र या हत्येचा हिंसक इराणी प्रतिसाद तिसऱ्या आण्विक महायुद्धाचा प्रारंभ असेल यात आजमितीला तरी शंका नाही.
इराणी संरक्षणमंत्री आमीर हातेमी यांच्यानुसार मोहसेन फख्रिझादे, त्याचे रक्षक आणि पुटुंबीयांना भर दिवसा तेहरानजवळील अब्सर्द गावातल्या हमरस्त्यावर गोळ्या घालून ठार मारण्यात आले. आधी त्यांच्या तीन गाडय़ांवर बंदुकीच्या गोळ्यांचा जबरदस्त वर्षाव झाला आणि नंतर जवळच उभ्या असलेल्या एका ट्रकमध्ये मोठा स्पह्ट झाला. शेवटच्या गाडीतील त्याची पत्नी सोडता बाकी बारा लोक या हल्ल्यात मारले गेले. पाश्चात्त्य सूत्रांनुसार, जीपवर बसवलेल्या मशीनगनला उपग्रहाद्वारे ऑपरेट करून फक्रिझादेच्या ताफ्यावर गोळ्यांचा वर्षाव करण्यात आला आणि ट्रकला रिमोट पंट्रोलद्वारे उडवण्यात आले. ही कारवाई इतकी अचूक होती की, शेवटच्या गाडीतील चालक व सुरक्षाकर्मी मारले गेले, पण मिसेस फख्रिझादेच्या केसालाही धक्का लागला नाही. हे जर खरे असेल तर अशा प्रकारच्या प्रगत हत्यार प्रणालीच्या भयावह अचूकतेची कल्पना करता येते.
अनेक अमेरिकन सैनिक, मुत्सद्दी, नागरिक व पत्रकारांच्या हत्येला जबाबदार असणारा जनरल कासीम सुलैमानी बगदाद विमानतळाकडे जात असताना अमेरिकन ड्रोननी त्याला 7 जानेवारी, 2020ला रस्त्यातच टिपले होते. जी कामगिरी कासीम सुलैमानीने इराणचे सामरिक व राजकीय वर्चस्व स्थापन करण्यासाठी केली, त्याच तोडीची कामगिरी मोहसेन फख्रिझादेने इराणला अण्वस्त्र्ाधारी राष्ट्र बनविण्यासाठी केली आहे. इराणी अण्वस्त्र प्रकल्पाच्या ओनाम्यापासून ते त्याचा विकास, त्यासाठी संसाधन उभारणी आणि शास्त्र्ाज्ञांची फळी तयार करणारा फख्रिझादेच होता. इराणच्या अणु प्रकल्पांत त्याचे योगदान एवढे सर्वसमावेशक आहे की, त्याच्या मृत्यूचा इराणी अणुप्रकल्पावर काहीही परिणाम होणार नाही. तो तसाच प्रगतीशील राहील. मध्यपूर्वेत शिया मुस्लिम राजवट आणि इराणी दबदबा वृद्धिंगत करण्यासंबंधीचा मुख्य सामरिक धोरणकर्ता आणि लष्कर तज्ञ कासीम सुलैमानीच्या अमेरिकेद्वारे करण्यात आलेल्या हत्येला वर्षही झाले नसताना झालेल्या मोहसेन फख्रिझादेच्या हत्येमुळे चवताळलेल्या इराणी मूलतत्त्ववाद्यांच्या मनातील सूडाच्या स्वयंस्फूर्त भावनावस्थेला (इम्पल्स फॉर रिव्हेंज) इराण सरकार बळी पडू शकते.
मोहसेन फख्रिझादेच्या हत्येचे कॉस्ट बेनिफिट अॅनालिसिस केल असता या हत्येमागे कोणता सामरिक उद्देश होता, त्यामुळे इराणच्या अणु प्रकल्पावर होणारे परिणाम, त्याच्या टायमिंगची वैधता आणि हत्येमुळे फायदा होईल की तोटा हे प्रश्न समोर येतात. ट्रम्पचा कार्यकाळ संपायला अवघे दोन महिने उरले असताना इस्रायल, अमेरिका व सौदी अरबच्या नेत्यांच्या नोएममधील 18-21 नोव्हेंबरच्या कथित गुप्त बैठकीनंतर ही हत्या झाल्यामुळे यात या तिन्ही देशांचा हात होता असे मानले जाते. या हत्येमुळे बायडेन व रुहानीच्या भावी जवळकीला चाप बसून 2015च्या आण्विक कराराचे पुनर्जीवन करणे कठीण होईल आणि आपापल्या देशांमध्ये ट्रम्प व नेतान्याहू यांचा प्रभाव वृद्धिंगत होईल. अर्थात याच्या परिणामस्वरूप इराणमध्ये कट्टरपंथीयांना बळ मिळून जून 2021मधील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मूलतत्त्ववाद्यांचा निःसंशय विजय होईल. दुसऱ्या बाजूला इराणी अणुशास्त्रज्ञांच्या हत्येला अमेरिकन/इस्रायली वैधता मिळाली तर इराणद्वारे इस्रायली/अमेरिकन अणुशास्त्रज्ञांची हत्या आणि इतर हिंसक कारवायांनाही स्वाभाविक वैधता प्राप्त होईल.
जागतिक कारस्थान आणि हिंदुस्थान
इराणचे ज्येष्ठ अणुशास्त्र्ाज्ञ मोहसेन फख्रिझादेच्या हत्येमुळे एक गोष्ट प्रकर्षाने उघड होते. बलाढय़ शत्रुराष्ट्रांकडे आपली सर्व महत्त्वाची माहिती (इंटलिजन्स) असते. अशा हत्या करण्याची यंत्रणा (सिस्टीम), धडाडी (अॅडॉसिटी) आणि पुवतही (पॅपेबिलिटी) त्यांच्यात असते. अशी कारवाई अतिशय सफाईदार, अचूक आणि प्राणघातकरीत्या पार पाडली जाते. हिंदुस्थानने अशा कारवायांना याआधीही तोंड दिले आहे आणि आजही देतो आहे. हिंदुस्थानच्या आण्विक आणि अंतरिक्ष संशोधनाला खीळ लावण्यामागे सीआयए आणि आयएसआयचा हात आहे याची खात्री हिंदुस्थानी संरक्षण तज्ञांना आहे. अण्वस्त्रधारी हिंदुस्थान पाकिस्तानसाठी ‘खतरे की घंटी’ आहे आणि अण्वस्त्र निर्मितीकरिता हिंदुस्थानने नेहमी आपल्यावर अवलंबून राहावे ही अमेरिकेची ‘मन की ख्वाईश’ होती आणि आहे हे 1999चे कारगील युद्ध आणि 1974 तसेच 98च्या अणुस्पह्टांतून प्रत्ययाला येते.
पाकिस्तान व चीन आपल्या मुळावर उठले असताना आणि अमेरिकन हेतूची ठाम खात्री नसताना इराणी अणुशास्त्र्ाज्ञ मोहसेन फख्रिझादेच्या हत्येमधून योग्य तो बोध घेणे हिंदुस्थानी सरकारसाठी अपरिहार्य आहे. जागतिक पटलावर शाश्वत मित्र पिंवा शत्रू नसतात. तेथे फक्त देशाच्या हितासाठी कार्यपद्धती ठरवून धोरण आखणी करावी लागते. उत्तरी सीमेवरील सामरिक तणावाला नजरअंदाज करत राजकीय स्वार्थासाठी आज हिंदुस्थानात एक प्रकारची अराजकी परिस्थिती निर्माण करण्यात येते आहे/झाली आहे असे म्हटल्यास ते वावगे होणार नाही. या परिस्थितीचा फायदा घेऊन हिंदुस्थानच्या शत्रूंनी उपग्रहाद्वारे पंट्रोल केलेल्या शस्त्र्ाांचा वापर अतिविशिष्ट लोक, ठिकाणे आणि इतर अतिमहत्त्वाच्या लक्ष्यांवर करायचा ठरवले तर त्याविरुद्ध आपल्या सरकारकडे काय ठोस धोरण आहे? या हत्येपासून धडा घेऊन त्यासंदर्भात एक निश्चित धोरण आखावे लागेल.
सर्वसाधारणपणे प्रतिस्पर्ध्यांनी आण्विक क्षेत्रात आपल्यापेक्षा वरचढ होऊ नये या उद्देशाने इराणी अणुशास्त्र्ाज्ञ फख्रिझादे यांच्या हत्येसारख्या घडवून आणल्या जातात. हिंदुस्थानही या दिव्याचा सामना अनेक दशकांपासून करीत आहे. त्याची सुरुवात हिंदुस्थानी अणुयुगाचे जन्मदाता डॉक्टर होमी जहांगीर भाभा यांच्या विमान अपघातात झालेल्या मृत्यूने झाली. 1964 मध्ये चीनने केलेल्या अणुस्पह्टांनंतर तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्राRनी विचारलेल्या ‘‘पॅन वुई मॅनेज अंडर ग्राऊंड न्यूक्लियर टेस्ट?’’ या प्रश्नाला होमी भाभांनी होकार दिला आणि तद्नुसार काही दिवसांनी एका पत्रकार परिषदेत ‘‘आम्ही नजिकच्या भविष्यात अणुस्पह्ट करून बॉम्बही बनवू’’ अशी स्पष्ट ग्वाही दिली. भाभांच्या अपघाताच्या केवळ 13 दिवस आधी तत्कालीन सोव्हिएत युनियनमधील ताश्पंद शहरात पंतप्रधान लालबहादूर शास्त्रींना अतिशय रहस्यमय स्थितीतील अगम्य अकाली मृत्यूला सामोरे जावे लागले हा अनाकलनीय योगायोग तर नक्कीच नव्हता. हिंदुस्थानला अणुशक्ती/अण्वस्त्रधारी बनण्यापासून दूर राखणे ही सीआयए/अमेरिकेची तत्कालीन प्राथमिकता होती आणि केजीबी/रशियाला नेहरू घराण्यातील देशप्रमुखच पाहिजे होता. होमी भाभांच्या अपघातानंतर भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर (बार्प) आणि इतर आण्विक प्रकल्पांशी निगडित शास्त्रज्ञांचा मोठय़ा प्रमाणात रहस्यमय, अनैसर्गिक मृत्यू झाला.

























































