…सांगा कसं जगायचं!

5490

>> डॉ. विजया वाड, [email protected]

आपलंच दुःख मोठ्ठं… असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण रोजच्या जगण्यातच सापडतात कठीण प्रश्नांची सोप्पी उत्तरं… आणि मग दरवळते आनंदाची कुपी.

नाना शिरवळकर म्हणाले, ‘‘काय झालं राधाबाई?  त्या काही बोलल्या नाहीत. तरी चेहरा बरंच बोलून गेला.

‘‘फटाका फुटला?’’‘‘तिचे आईवडील येतायत का?’’

‘‘हं!’’ नानांना कसं सग्गळं न सांगता समजतं.‘‘मग तुम्हाला मुलुंडला जायला सांगितलंय पवईतून. राईट?’’

‘‘आणि मुलगा मूक नायक आहे, बरोबर?’’

‘‘बरोबर.’’‘‘ दरवेळी हे चालवून घेऊ नका.’’

नाना शिरवळकर असं म्हणाले तरी राधाबाईंना जावंच लागणार होतं. सुनेचे आईवडील येणार. वन बीएचकेत माणसं राहणार तरी किती? आणि मुलुंडला मोठी सून-मुलगा, यांची काहीच का जिम्मेदारी नाही? सद्दा धाकल्याच्या बोडक्यावर आईचं बोचकं!

 नाना… भीडस्त स्वभाव कधी कधी फार नडतो नि आनंद पाहता पाहता हातातून निसटतो. ‘‘आता अशी शक्कल करू की, सून आपल्या आईबाबांचा प्लॅन खू।़।़प लांबणीवर टाकेल.’’

नाना शिरवळकर राऊंड संपल्यावर खोलीवर न जाता आयआयटीत गेले नि राधाबाईच्या सुनेला म्हणाले,

‘‘मोठी पाताळयंत्री आहे बघ माझी सून. मला ती वेगळय़ा खोलीत ठेवते. ते मी चालवून घेतो. माझा डबा सकाळ-संध्याकाळ बाहेरून येतो. त्याबद्दल मी तक्रार करीत नाही, पण आता ती दोन स्टुडंट्स माझ्या खोलीत भाडय़ाने ठेवतेय म्हणे. जागा बघून गेली मुलं.’’ ‘‘बरं का नीलिमा, मी आज सांगणार आहे. ही जागा मी घेतली. मी मेल्यावर ती तुमच्या नावावर होणार आहे. सध्या तरी मीच तुम्हा दोघांना येथे ठेवून घेतले आहे. पण इथे माझा शब्द अंतिम असेल. विद्यार्थी ठेवायचे तर आपल्या खोलीत. मला केव्हाही झोप येते. मी कधीही रात्ररात्रसुद्धा  टीव्ही बघतो. अरे! आपुन अपना लाईफ फ्री स्टाईल जीता है! तेव्हा जे काय ‘पीजी’चं उत्पन्न वाढवायचं ते आपल्या हद्दीत. मेरे इर्दगिर्द नही! नाही म्हंजे नाही. बरोबर नीलिमा?’’ राधाबाईंना ते सूचक बोल समजले. त्या म्हणाल्या, ‘‘नाना, पुर्षांना असं बोलायचं धाडस होतं. बायका सोसत राहतात.’’

‘‘हे पहा, बाईच्या नरडय़ातला माईक सदैव ‘ऑन’ असावा. अहो, आपली किती वर्षे राहिली अशी? आपल्या जगण्याला टॉप प्रायॉरिटी हवी.’’  ‘‘तुझे आईवडील येतायत म्हणे. नीलिमा राधाबाईंच्या खोलीत त्यांना दाबू दडपू नको हो! तुझे वडील रेस लावल्यासारखे  नॉनस्टॉप घोरतात म्हणे.’’

‘‘नाना, मी आईंना मुलुंडला पाठवतीय दोन महिने.’’

‘‘तू कोण गं माझी पार्सल बांधणारी? माझ्या यजमानांची जागाच आहे ही. ते गेले वरती नि मी राह्यले खालती. पण मलाच फिरता डब्बा करता? वा गं वा!’’

सून समजली. ‘‘मी म्हणते राह्यलं. सगळे आनंदाने एकत्र राहू. माझे वडील आमच्या बेडरूममध्ये झोपतील. आपण सगळे हॉलमध्ये झोपू. कसं?’’

नाना राधाबाईंना म्हणाले, ‘‘जम्या क्या राधाबाई? नाहीतर सून, मुलगा पाठवा सुनेच्या आईकडे दोन महिने. माझा डबेवाला तुम्हाला लावतो. ऐश करो! मेरी कंपनी रहेगी?’’ नानांची खेळी यशस्वी ठरलीय. वय वाढलं म्हणजे आपण अगतिक झालो असं नका समजू ज्येष्ठांनो. आनंद शेवटच्या श्वासापर्यंत उपभोगा. कुछ तो लोग कहेंगे! लोगों का काम है कहना! मगर आप न डरना.

आपली प्रतिक्रिया द्या