
>> अशोक सुतार
मनुष्याला यश मिळविण्यासाठी वय, शिक्षण, रंग, रूप यांची कसलीही अट नाही. फक्त सकारात्मक विचारांनी ध्येयाचा मार्ग चालता यायला हवा, विचारांतून आचरणाकडे जायला हवे. आपण विचार खूप करतो आणि आणि आचारात कमी पडतो. एखादे अपयश आपल्याला निराश, दुबळे बनवते. आपण मनाचे गुलाम होतो आणि असे लोक अपयशी ठरतात. यशस्वी मनुष्य म्हणजे फक्त आर्थिकतेच्या बाबतीत नव्हे, तर त्यात सामाजिक, कला- क्रीडा, सांस्कृतिक, शास्त्र्, अध्यात्म इ. सर्व सकारात्मक बाबी आल्या. यशस्वी होण्यासाठी आपण हे सर्व कराल अशी आशा आहे.
फक्त सकारात्मक विचारांनी ध्येयाचा मार्ग चालता यायला हवा, विचारांतून आचरणाकडे जायला हवे. आपण विचार खूप करतो आणि आणि आचारात कमी पडतो. एखादे अपयश आपल्याला निराश, दुबळे बनवते. आपण मनाचे गुलाम होतो आणि असे लोक अपयशी ठरतात. यशस्वी मनुष्य म्हणजे फक्त आर्थिकतेच्या बाबतीत नव्हे, तर त्यात सामाजिक, कला- क्रीडा, सांस्कृतिक, शास्त्र्ा, अध्यात्म इ. सर्व सकारात्मक बाबी आल्या.
एकदा मी एका मित्राला विचारले, जग नेमकं केवढं आहे? आणि माणसाला यश मिळण्याचे नेमके कारण काय असावे? मित्र म्हणाला, जग हे आपापल्या मेंदूच्या विचारांच्या आकाराएवढे असून मनोशक्ती व कामावरील विश्वास हे यशाचे गमक आहे. मित्रासोबत केलेल्या चर्चेने माझे विचारचक्र सुरू झाले. काय खरोखरच विश्वासाची शक्ती एवढी प्रचंड आहे? आणि उत्तर सापडले, होय हे खरं आहे. एकदा एमएलएमच्या मीटिंगला काही लोक एकत्र आले होते. वक्ता सांगत होता, तुम्ही जेव्हा एखाद्या पार्टीकडे आपले प्रॉडक्ट विकण्यासाठी सॅम्पल घेऊन गेला तर आपले कपडे प्रथम इंप्रेसिव्ह असले पाहिजेत, बोलण्यात गोडवा पाहिजे. आपला माल त्याने का विकत घ्यावा यासाठी आपण आवश्यक ती माहिती दिली पाहिजे. ती मीटिंग संपल्यानंतर मी त्या वक्त्याविषयी माहिती मिळवली. तो फक्त सल्ला देणारा (कौन्सिलर) आहे की त्याने कोणता उद्योगसमूह अथवा उद्योग यशस्वी केला आहे याचा अंदाज काढायचा होता. त्या वक्त्याची चौकशी केल्यानंतर मला आढळले की, त्याचे शिक्षण 12वी पास होते. याच कंपनीत एमबीए झालेले, पोस्ट ग्रॅज्युएट झालेले अनेक होते. पण हा वक्ता पूर्वीपासून श्रीमंत नव्हता, तर त्याचे वडील गावी शेती पाहत होते. असं असतानाही या वक्त्याने कंपनीत अनेक सेल्समन आणून कंपनीला सर्वात मोठा नफा मिळवून दिला होता. हे असे का झाले? कारण यश मिळवणे प्रत्येकाला जमू शकते, पण मुळात त्या व्यक्तीचा आपण जे काही काम करतो त्यावर प्रचंड विश्वास पाहिजे.
साधारणतः मनुष्याला जे काम आवडते, त्या क्षेत्रात केले तर प्रगती लवकर होते. कारण आवडत्या कामात एकाग्रता साधली आणि स्वतःवर विश्वास ठेवला तर कामामधील सखोल माहिती मिळते, यश मिळते. कोणतेही सकारात्मक काम योग्य पद्धतीने करून जे उत्पादन केले जाते, त्याचे मार्केटिंग करण्यासाठी मोठय़ा विश्वासाने व्यक्ती बाजारपेठेत उभी राहते. बाजारात अनेक मालांमध्ये स्पर्धा आहे. बिस्किटे तयार करणे एवढा विषय घेतला तरी उदाहरणसाठी तो पुरेसा आहे. बिस्कीट क्षेत्रात पारले, गुड डे, बटर बाईट, चोको, मारी, ब्रिटानियाचे प्रॉडक्ट इत्यादि अनेक प्रकारची बिस्किटे आहेत. त्यापैकी ठरावीक बिस्किटांनाच ग्राहकांची मागणी असते. जी कंपनी आपल्या उच्च गुणवत्तेत कुठलीही तडजोड न करता ग्राहकांना परवडेल अशा किंमतीत आपले प्रॉडक्ट (माल) विकते. त्या कंपनीचे उत्पादन खपून आर्थिक फायदा होतो. अर्थात आपल्या उत्पादनांची गुणवत्ता, प्रमाणित परवडेल अशी किंमत, ग्राहकांची मागणी इत्यादि लक्षात घेऊन मालकाला उत्पादनाबद्दल प्रचंड विश्वास पाहिजे. विश्वास तीन प्रकारचे आहेत, अंधविश्वास, प्रमाणित स्वविश्वास आणि तिसरा प्रकार तो अतिआत्मविश्वास. अंधविश्वास जेव्हा आपण बाळगतो त्यावेळेस हे काम एखादी ईश्वरी शक्ती घडवून आणेल, नशीब चांगले असेल तर आपले प्रॉडक्ट बाजारात खपेल अशी श्रद्धा बाळगण्याचे काम व्यक्ती, समूह करते. म्हणजे मी वस्तू बनवू शकतो, पण मला ग्राहक कसा आहे त्याची आवड काय आहे, हे मला माहीत नाही. लोकांना गरज असेल किंवा नशिबाने साथ दिली तर मी यशस्वी होईन असा विचार विश्वास बाळगणारे करतात. या नादात ते ईश्वरी शक्तीची पूजा, तीर्थाटन याकडे जास्त लक्ष देतात, तर उद्योगाकडे 30 टक्के असे समीकरण आढळते. खरे तर कोणतेही सकारात्मक कार्य हे आपल्याला ईश्वराजवळ पोहोचवते. ईश्वर त्या कामात असतो. दुसऱया प्रकारचे लोक प्रमाणित स्वविश्वासाच्या बळावर मार्केटमध्ये आपले प्रॉडक्ट आणतात. ते यशस्वी होतात. तिसऱया प्रकारात अतिआत्मविश्वास हा विषय येतो. एक महाशय मैदानात उडय़ा मारीत खुशीने चालले होते. दुसऱया दिवशी हे महाशय इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आले आणि त्यांनी मैदानात उडी मारली. त्यावेळी या महाशयांचे अंग दुखत होते. तिसऱया दिवशी त्यांनी दुसऱया मजल्यावरून उडी मारली. त्यांच्या अंगाला तडा पडला. काही दिवसांनी तब्येत व्यवस्थित झाल्यानंतर महाशयांनी आनंदात तिसऱया मजल्यावरून उडी मारली. परिणाम काय, तर महाशय जमीनदोस्त झाले. असे का झाले, तर माणसाने स्वतःची क्षमता न पाहता दुसरा कुठलाही विवेक-विचार न करता, स्वतःच्या अंतर्मनाचा नीट न विचार करता कार्य केले तर ते फोल ठरते. अशी आत्मघातकी प्रवृत्ती अतिआत्मविश्वासामुळे निर्माण होते, तेव्हा प्रत्येकाने सदैव सावध रहावे हे इष्ट ठरेल. यश मिळण्यासाठी सदैव जागरूक असावे.
यशाच्या मार्गात अपयश दडी मारून बसलेले असते. आपण जर रस्ता चालताना योग्य पद्धतीने चाललो नाही, विचार भरकटले, ध्येय सोडून दिले तर अपयश आपल्याला नक्कीच गाठते. अपयश ही यश मिळवण्याच्या युद्धातील एक छोटीशी लढाई आहे, अपयश मिळाले म्हणून खचून जाण्यात अर्थ नाही. सातत्याने प्रयत्न करून यशोमंदिर गाठता येते. मेंदूची जागृती ठेवून योग्य व्यवस्थापन (यात वेळ, अभ्यास, व्यवहार, व्यायाम, नातेसंबंध इ.) केले तर यश मिळण्यास वेळ लागत नाही. शास्त्र्ाज्ञ, मोठे विचारवंत, जागतिक पातळीवरील प्रसिद्ध कलावंत यांनी ध्येयावर मन एकाग्र करूनच मोठे यश मिळवले आहे. ही सर्व माणसे पूर्वी सर्वसामान्य माणसेच होती ना ? परंतु आपले वेगळेपण त्यांनी सिद्ध केले, अशा लोकांचे अध्यात्म उच्च कोटीचे असते. म्हणजेच त्यांनी जे विचार बाळगलेले असतात, त्या विचारांशी ते प्रामाणिक होते, प्रचंड निष्ठा होती, विचारांची मोठी बैठक होती. म्हणूनच त्यांना यश मिळते. मनुष्याला यश मिळविण्यासाठी वय, शिक्षण, रंग, रूप यांची कसलीही अट नाही. फक्त सकारात्मक विचारांनी ध्येयाचा मार्ग चालता यायला हवा, विचारांतून आचरणाकडे जायला हवे. आपण विचार खूप करतो आणि आणि आचारात कमी पडतो. एखादे अपयश आपल्याला निराश, दुबळे बनवते. आपण मनाचे गुलाम होतो आणि असे लोक अपयशी ठरतात. यशस्वी मनुष्य म्हणजे फक्त आर्थिकतेच्या बाबतीत नव्हे, तर त्यात सामाजिक, कला- क्रीडा, सांस्कृतिक, शास्त्र, अध्यात्म इ. सर्व सकारात्मक बाबी आल्या. यशस्वी होण्यासाठी आपण हे सर्व कराल अशी आशा आहे.





























































