कोर्टरूम- रामदेव बाबाचे फसवासन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> आड. संजय भाटे

बाबा रामदेव व पतंजली आयुर्वेद आणि वादग्रस्तता याचे जुनेच नाते आहे. फसव्या जाहिराती करीत चुकीची उत्पादनं ग्राहकांच्या माथी मारणाऱया पतंजलीचे फसवासन.

बहुराष्ट्रीय ग्राहक कंपन्यांना आपल्या पतंजली आयुर्वेदच्या माध्यमातून आव्हान देणारे आणि ‘गॉडमॅन ते बिझनेस टायकून’ असा प्रवास विलक्षण वेगाने करणारे बाबा रामदेव आज योगशास्त्रात नसलेल्या ‘फसवासना’त अडकले आहेत.

राम किशन यादव हे हरयाणातील सैद अलिपूर नामक एका खेड्यातील अल्पभूधारक गरीब शेतकऱयाचे अपत्य. 1980च्या दशकात आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालावा म्हणून त्यांनी योग शिक्षकाचा व्यवसाय पत्करला.  आपल्या जुनाट सायकलीवरून ते च्यवनप्राश विकत. तोच राम किशन आज ‘पतंजली आयुर्वेद व पतंजली फुड्स या कंपन्यांचा सर्वेसर्वा बाबा रामदेव आहेत. 2010-2011 मध्ये 317 कोटी रूपयांची उााढा असणारी त्यांची ही कंपनी, 2015-16 मध्ये 5,000 कोटी रूपयांची उााढा करू लागली. पण एवढ्यावर थांबतील तर ते बाबा रामदेव कसले. कंपनी आता पुढच्या वर्षी दुप्पट उााढा करेल अशी घोषणा केली आणि रामदेव बाबांनी तसे करून दाखवले. त्यावेळी बाजारातील प्रस्थापित कंपन्या त्यांच्या मागील वर्षाच्या नफ्यामध्ये दोन अंकी वाढ करण्यात घामाघूम होत होते. असे हे बाबा रामदेव आज मात्र थेट सर्वोच्च न्यायालयाच्या कायदेशीर पेचात अडकले आहेत.

या कहाणीचा नायक आहे केरळ राज्यातील कन्नूर या गावातील डॉ. के.व्ही. बाबू नामक जागरूक व नेत्रतज्ञ डॉक्टर व ही कहाणी आहे त्यांनी दिलेल्या अविश्रांत व चिवट लढ्याची. फेब्रुवारी 2022 मध्ये बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेद लिमिटेड या कंपनीने डोळ्यात घालावयाच्या एका औषधाची जाहिरात प्रसिद्ध केली होती. या जाहिरातीनुसार या औषधाचे काही थेंब डोळ्यात टाकल्यास मोतिबिंदू, गुल्कोमा व रातआंधळेपणासारख्या गंभीर नेत्रव्याधीपासून पूर्णत: आराम मिळेल, असा दावा करण्यात आला होता. डोळ्याच्या या व्याधीच्या पूर्ण उपचाराचासोबतच ‘लिपीडोम’ या नावाचे शरीरातील कोलेस्ट्रोल नियंत्रित करणाऱया औषधाची जाहिरात त्यांनी की. दुसरीकडे आधुनिक व प्रदीर्घ संशोधनाअंती तयार केलेली अॅलोपॅथिक औषधे ही कशी अपायकारक व साईड इफेक्टस असणारी आहेत हेही सांगितले होते. अॅलोपॅथिक नेत्रतज्ञ असलेल्या डॉ. बाबू यांना या ड्राप्सच्या दाव्यातील फोलपणा लगेच ध्यानात आला व त्यांनी बलाढ्य पतंजलीविरुद्ध कायदेशीर लढ्याचे रणशिंग फुकले. त्यांनी 22 फेब्रुवारी 2022ला भारताच्या ड्रग कंट्रोलर ऑफ इंडियाकडे पार केली. त्यांनी पारीत ही जाहिरात वैद्यकीय  व औषध शास्त्राrयदृष्ट्या कशी फोल आहे हे नमूद करून प्रस्तुतच्या जाहिरातीत ड्रग्ज व

मॅजिक रेमिडीज (ऑबजेक्शनल अॅडव्हरटाईजमेंट) अॅक्ट 1954चे उल्लघंन झाले आहे तेही दाखवून दिले होते. वास्तविक ड्रग कंट्रोलरने पारीतील गांभीर्य ओळखून वरील औषधाची शास्त्राrय तपासणी करणे आवश्यक होते. पण दिल्लीतच मुख्य कार्यालय असलेल्या ड्रग कंट्रोलरने ही पार आयुष मंत्रालयाकडे पाठविण्याचे सरकारी इतिकर्तव्य पार पाडले. यातून आपल्याकडील नोकरशाहीतील वरिष्ठ अधिकारी हे कसे जनतेच्या हिताच्या विषयावर असंवेदनशील व कातडी बचावू वृतीचे असतात हेच दिसून येते. त्यानंतर केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या सूचनेनुसार उत्तराखंड राज्य औषध परवाना प्राधिकरणाने याची चौकशी सुरू केली. त्यांनी पतंजली आयुर्वेद लिमिटेडला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली. त्यावर 7 मे 2022ला पतंजलीने तत्काळ वरील औषधे व त्याची जाहिरात थांबवण्यात आल्याचे त्यांना कळवले. पण त्यानंतरही वरील औषधाच्या ना जाहिराती थांबल्या ना त्यांची बाजारातील उपलब्धता. त्यानंतर जुलै 2022मध्ये वरील औषधाच्या जाहिराती पुन्हा झळकू लागल्या. त्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशने हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेले. तेथे दिनांक 21 नोव्हेंबर 2023 रोजे सर्वोच्च न्यायालयासमोर पतंजली आयुर्वेदने यापुढे अशी जाहिरात येणार नाही, असे कोर्टात अभिवचन दिले. पण बाबा रामदेव व त्याचे निकटचे सहकारी स्वयंघोषित आचार्य बाळकृष्ण (जे पतंजली आयुर्वेदचे चेअरमन आहेत) यांनी सर्वोच्च न्यायालयाला गृहीत धरले व आक्षेप घेतलेल्या औषधाच्या जाहिराती चालूच ठेवल्या. 21 फेब्रुवारी 2023च्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने नेमका यावरच आपला रोष व्यक्त केला आणि थेट रामदेव व आचार्य बाळकृष्ण यांच्याविरुद्ध अवमान याचिका का सुरू करू नये अशी ‘कारणे दाखवा’ नोटीस काढली आहे. तसेच न्यायालयाने पतंजली आयुर्वेदच्या विरुद्ध उच्च रक्तदाब, रक्तातील कोलेस्ट्रोल इत्यादी व्याधींवर रामबाण उपायाचा दावा करणाऱया जाहिराती प्रसारीत न करण्याचे सक्त आदेश दिले. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी दिनांक 15 मार्च 2024 रोजी होणार आहे. त्या दिवशी पुढील कारवाई निश्चित करणार आहे. औषधी आणि जादुई उपचार (आक्षेपार्ह जाहिराती) या 1954च्या अधिनियमान्वये औषधांच्या अशास्त्राrय उपचाराचे फसवे दावे करण्यास प्रतिबंधित करण्यात आलेले आहे.

पतंजली आयुर्वेद आणि वादग्रस्तता याचे जुनेच नाते आहे. ज्या वेळी सारे जग कोविडच्या महामारी व त्यावर प्रभावी उपचार नसल्यामुळे भयग्रस्त झाले होते, त्या वेळी पतंजली आयुर्वेद निर्मित ‘कोरोनील’ हे कोविडच्या पांमणावर प्रभावी औषध आहे, असा दावा त्यांच्यातर्फे करण्यात आला होता. पण पुढे असे निष्पन्न झाले की हे औषध कोविडच्या पांमणाचे थेट औषध नसून केवळ एक प्रतिकार क्षमता वाढविणारे (इम्युनिटी बुस्टर) टॉनिक आहे.

बाबा रामदेवना आरोग्य क्षेत्रात पैसा कुठे आहे व कायद्यातील पळवाटा कोणत्या आहेत या दोन बाबी अगदी स्पष्ट दिसतात. बनावट तसेच अशास्त्राrय व फसवे दावे करणाऱया औषधांची समस्या तशी जुनीच आहे. पण अलीकडे त्याने आढाळपाळ स्वरूप धारण केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार जगात दरवर्षी साधारण 10 लाख रुग्णांचे मृत्यू हे अशा औषधांमुळे होतात. भारतासारख्या देशांमध्ये विकल्या जाणाऱया औषधांपैकी 10.5 टक्के औषधांच्या बाबतीत त्यांच्या परिणामकारकतेविषयी केलेले दावे हे फसवे व शास्त्राrयदृष्ट्या चुकीचे असतात. भारत हा जगातील औषध निर्मिती उद्योगातील ाढमांक-3चा देश आहे. त्या देशातील औषधांच्या खरेपणाविषयी असे संशयाचे मळभ असणे त्या उद्योगाच्या व देशाच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेच्या दृष्टीने अपायकारक आहे. म्हणूनच यासाठी शासन व ग्राहक या दोन्ही स्तरावर सजगता व कार्यवाही आवश्यक आहे. औषधी आणि जादुई उपचार (आक्षेपार्ह जाहिराती) अधिनियम 1954 हा कालबाह्य झालेला आहे. त्यात अमूलाग्र सुधारणा आवश्यक आहेत. सध्याच्या तरतुदीनुसार या कायद्याचे उल्लंघन करणाऱयास केवळ 6 महिन्यांची शिक्षा वा दंड अशी तरतूद आहे. यात आमूलाग्र बदलाची आवश्यकता आहे.

सरतेशेवटी या विषयाबाबत शासन व्यवस्था अधिक कठोर कायदा करेलही. परंतु जोपर्यंत या साऱया व्यवसायातला खरा स्टेक होल्डर म्हणजे ग्राहक जागा होत नाही तोपर्यंत अशा फसवे दावे करणाऱया कंपन्यांचा सुळसुळाट चालूच राहील. ग्राहकांनी अशी जागरूकता दाखविणे व अंमलबजावणी यंत्रणेने अशा औषधे, सौंदर्य प्रसाधने व त्या निर्मिती करणाऱया कंपन्यांविरुद्ध वेळोवेळी कारवाईचा बडगा उचलणे हाच या भयानक जिवघेण्या समस्येवरचा उपाय आहे.

 [email protected]

(लेखक ज्येष्ठ विधिज्ञ आहेत. त्यांचा औषधे व कायदा याचा अभ्यास आहे.)