मुद्दा – गृह बांधणी क्षेत्रात वाढीची अपेक्षा

1589

>> राहुल ग्रोव्हर, (सीईओ, एसईसीसीपीएल)

हिंदुस्थानी रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये अलीकडच्या काळात रेरा आणि जीएसटी कायद्यांसारख्या अनेक घटकांमुळे लक्षणीय मंदीचे वातावरण अनुभवायला येत आहे. अर्थात या कायद्यांचा परिणाम आता हळूहळू स्थिर होऊ लागला आहे. तरीही या उद्योगाला बाहेर येण्यासाठी आणि 2006 ते 2010 च्या तेजीपर्यंत पोहोचण्यासाठी अजून लांबचा पल्ला गाठायचा आहे. सध्याचा सणासुदीचा काळ आणि केंद्र शासनाने घेतलेले अलीकडचे निर्णय यामुळे उद्योगामध्ये लक्षणीय चालना येईल आणि क्षेत्रात नवचैतन्य आणण्यासाठी मदत होईल अशी अपेक्षा मात्र नक्की आहे.

सध्याच्या सणासुदीच्या काळात गृह बांधकाम क्षेत्रातील गुंतवणुकीत लक्षणीय वाढ झाली आहे. विकासक आणि त्यांच्या प्रतिनिधींनी देऊ केलेल्या बऱ्याच आकर्षक सवलती आणि व्यवहारांमुळे ग्राहक त्यांचा फायदा घेण्याच्या तयारीत आहेत. रिअल इस्टेट संघटनांसाठी खास किमतीच्या योजना तयार करून ग्राहकांना उत्तेजित करण्यासाठी हा सर्वात महत्त्वाचा धोरण कालावधी आहे. परंतु बाजारातील समकालीनांशी स्पर्धेच्या या काळात प्रयत्नांती सिद्ध झालेल्या किमती कमी करणे किंवा स्टॅम्प डय़ुटी आणि नोंदणी शुल्क माफ करणे या आता पुरेशा ठरत नाहीत. विकासकांनी आता ग्राहकांच्या मागणीचे बारकावे पूर्ण करू शकतील अशा बाजार विश्लेषणाचा आधार घेऊन नावीन्यपूर्ण धोरणे आखण्याची गरज आहे. यामध्ये सामूहिक सौदेबाजी, अधिक अनुकुलता, वैयक्तिकीकरण आणि घराच्या डिझाईनमधील अधिक नियंत्रण आणि इतरांचा समावेश असेल. 

याशिवाय संभाव्य घर खरेदी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विकासकांनी ईएमआय योजना, 20 : 80 देय योजना आणि ताबा मिळेपर्यंत अथवा ताब्यानंतर अगदी निश्चित भाडे योजना अशा योजना संबंधीही विचार करावा. काही वेळा अतिशय लवचिक, परंतु निश्चित अशी देय योजनादेखील अंतिम निर्णयापर्यंत पोचवून गुंतवणूक घडवून आणू शकते. 

शासनाच्या नवीन केंद्रित धोरणामुळे परवडणारी घरे विकासकांना आपल्या क्षमतेचा फायदा मिळवून देण्यासाठी महत्त्वाची आहेत. यामुळे लक्ष्य केले गेलेले ग्राहक मिळू शकतात. अलीकडच्या पाहणीवरून असेही दिसते की, या शतकात सुविधा आणि सुसज्ज आधुनिक आणि बंदिस्त अशा परवडणाऱ्या घरांमध्ये रुची वाढली आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात नव्या परवडतील अशा वाढलेल्या मागणीच्या घरांची सुरुवात करण्यास उत्तम काळ आहे.

हिंदुस्थानात कोणतेही गुंतवणुकीचे निर्णय आणि घर खरेदी शुभ तारीख, वास्तू आणि अंकशास्त्र बघून केले जातात. त्यामुळे सणासुदीच्या काळात गुंतवणुकीसाठी शुभ असल्यामुळे वास्तूप्रमाणे असलेली घरे प्रचारासाठी महत्त्वाची ठरतात. वास्तूप्रमाणेच असलेल्या घरांच्या शोधात असलेल्या ग्राहकांमुळेदेखील विकासक योग्य जाहिरातीद्वारे आपला व्यापार वाढवू शकतात.

अखेर, रिझर्व्ह बँकेच्या अलीकडच्या निर्णयानुसार गृह कर्ज दर आणि रेपो दर जोडणी वैधानिक रीतीने आवश्यक केली गेली आहे. यामधूनही विकासकांना लक्षणीय लाभासाठी मदत होऊ शकते. 45 लाख रुपयांपेक्षा कमी गृह कर्जासाठी व्याज दरावरची 31 मार्च 2020 पर्यंतची वाढीव सवलत संभाव्य गृह खरेदीदारांच्या वाढीव मागणीमुळे विकासकांना खूप फायद्याची आहे. याचा उपयोग करून विकासक विक्री वाढवू शकतात आणि ग्राहकांच्या नव्या वर्गाकडे लक्ष ठेवून आपला व्यवसाय बळकट करू शकतात.

आपली प्रतिक्रिया द्या