
>> शब्दांकनः राज चिंचणकर
अभिनेत्री, दिग्दर्शिका, निवेदिका अशा विविध भूमिकांतून भेटणारी संपदा जोगळेकर-कुळकर्णी चितारतेय तिच्या भावविश्वातला एक टप्पा…
आयुष्यात अनेक घटना घडत असतात, पण एक संवेदनशील कलाकार म्हणून माझ्या बाबतीत घडलेला एक प्रसंग मला अतिशय महत्त्वाचा वाटतो. ‘गंगा जमुना’ या अशोक हांडे यांनी निर्माण केलेल्या कार्यक्रमाचे निवेदन मी करायचे. हा कार्यक्रम पी. सावळाराम यांच्या गाण्यांवर आधारित होता. ‘गंगा जमुना डोळय़ांत उभ्या का, जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा’ हे लता मंगेशकर यांचे गाजलेले गाणे त्या कार्यक्रमाच्या मधल्या टप्प्यावर यायचे. या गाण्याच्या वेळेला ‘अभिनिवेदन’ असा एक वेगळाच प्रकार अशोक हांडे यांनी मला सुचवला होता. ‘मी तुला या कार्यक्रमाची निवेदिका म्हणून निवडले, कारण एक अभिनेत्री आणि निवेदिका याचा संयोग म्हणून तू त्यासाङ्गी योग्य आहेस,’ असे त्यांनी मला सांगितले होते. प्रत्येक गाण्याची तांत्रिक माहिती वगैरे देणे इतकाच या कार्यक्रमाचा हेतू नव्हता, तर त्या गाण्याच्या भावविश्वाला अनुसरून त्यात प्रसंग सांगितले जाणार होते. त्यामुळे त्यात अभिनयसुद्धा आवश्यक होता. त्यानुसार एका स्त्र्ााrच्या संपूर्ण आयुष्यात येणारे सगळे टप्पे त्यांनी सूत्रसंचालनात बांधले होते.
या कार्यक्रमात एका मुलीचे लग्न झाल्यावर तिला सासरी पाङ्गवण्याचा जो एक अतिशय सद्गदित करणारा असा प्रसंग येतो, त्या प्रसंगाचे वर्णन करणारे ते गाणे होते. गाण्यातल्या त्या भावनेपर्यंत रसिकजनांना घेऊन जाण्याचा प्रसंग मी वर्णन करायचा, असे अशोक हांडे यांचे म्हणणे होते. हा प्रसंग माझ्या निवेदनातून वर्णन केल्यावर आणि शेवटी ‘गंगा जमुना डोळय़ांत उभ्या का, जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा,’ असे मी म्हणाल्यावर त्या गाण्याला सुरुवात व्हायची, पण माझ्या या निवेदनानंतर मात्र मी घळघळा रडायचे. या कार्यक्रमाचे मी जितके प्रयोग केले त्या प्रत्येक प्रयोगाला मी रडायचे.
या सगळय़ाची पार्श्वभूमी वास्तविक वेगळी होती. माझ्या विवाहाची 13 डिसेंबर 1994 ही तारीख ङ्खरली होती. लग्नाची तयारी सुरू झाली होती. मात्र, 4 डिसेंबरला अचानक माझे वडील गेले. साहजिकच, त्यानंतर लग्न पुढे ढकलले गेले. डिसेंबर ते जानेवारी हा काळ मी दुःखाच्या वातावरणात होते. मग आईनेच एकदा विषय काढला की, ‘इतकी सगळी तयारी तू केली आहेस, लग्न ङ्खरले आहे, तर जसे वडिलांना ते लग्न घडवून आणायचे होते तसे आपण ते करू या. यात सगळय़ांचा आनंद आहे. त्यामुळे दुःखाचे सावट घेऊन हे लग्न करायचे नाही.’
माझ्या आईने ठरवले होते की, लग्न सोहळय़ात काहीही कमी करायचे नाही. जी आई इतक्या ताकदीने तयार झाली आहे, स्वतःच्या आयुष्याचा जोडीदार गेला असताना ती मला सांभाळतेय, मुलीचा आनंद महत्त्वाचा आहे असे ती म्हणतेय तर आपण रडगाणे गायला नको असे मी ङ्खरवले. हा तिचा जो पवित्रा होता, अवसान होते ते पाहून मी मनोमन ङ्खरवले होते की, लग्न लागल्यावर मी अजिबात रडणार नाही. कारण मी रडले तर ती ढासळेल. लग्न लागल्यावर मला काही वाटू नये म्हणून आईने डोळय़ांतून पाण्याचा एक थेंबही काढला नव्हता आणि आईला वाईट वाटेल म्हणून मीही तेच केले.
त्यामुळे जेव्हा माझ्या वास्तव आयुष्यात ‘गंगा जमुना डोळय़ांत उभ्या का, जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा’ अशी स्थिती आली, तेव्हा माझी आई ‘जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा’ इतकेच म्हणाली. त्या गंगा जमुना, ना माझ्या डोळय़ांत दिसल्या, ना तिच्या डोळय़ांत दिसल्या, पण हाच कणखरपणा माझ्या त्या गाण्याच्या निवेदनाच्या वेळी फुटून जायचा आणि मी खळखळा रडायचे. या कार्यक्रमाचे साधारण दहा-बारा प्रयोग झाल्यानंतर आमचे गायक, वादक यांना प्रश्न पडला की, ‘संपदा इतकी का घुसतेय तिच्या या रोलमध्ये?’ मग मी त्या सगळय़ांना एकत्र बसवून खरे कारण सांगितले. वास्तविक त्या वेळी त्या भावनेत वाहत जाणे वगैरे असा काही प्रकार नव्हता, पण मी आयुष्यात ङ्खरवून जे केले नाही, ते मला तिथे मोकळे करायला मिळत होते किंवा मी तिथे मोकळी होत होते. कार्यक्रमात या गाण्याच्या निवेदनाच्या निमित्ताने मी इतकी रंगायचे की, आयुष्यातल्या सर्व भावना म्हणजे अल्लड मुलीपासून ते तिचे सप्तपदीसाङ्गी तयार होणे, तिचे लग्न होणे, तिने आई-वडिलांना सोडून जाणे, नवऱयासोबत तिचे नवीन आयुष्य सुरू होणे, तिच्या आयुष्यात मूल येणे हे असे सगळे टप्पे ‘संपदा’ म्हणून मी तिथे अनुभवत गेले.






























































