
>> आशुतोष बापट
स्वराज्याच्या आरमारात विविध प्रकारच्या नौका, जहाजे होती. त्यातलाच एक नामांकित प्रकार म्हणजे संगमेश्वरी नौका. या नौका याच संगमेश्वर परिसरात बांधल्या जाऊ लागल्या. संगमेश्वरपासून जवळच असलेल्या ‘निढळेवाडी’ इथल्या सुतार समाजाची मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून इथे नौका बांधणीचे पारंपरिक काम अगदी आजपर्यंत करत आहेत.
आरमार म्हणजे एक स्वतंत्र राज्यांगच आहे. जैसे ज्यास अश्वबळ त्याची पृथ्वी प्रजा. तद्वत ज्याचे आरमार त्याचा समुद्र. ‘छत्रपती शिवरायांनी सांगितलेली आणि रामचंद्रपंत अमात्यांनी लिहून ठेवलेल्या आज्ञापत्रातली ही वाक्यं. अफजलखान वधानंतर पुढे महाराज कोकणात उतरले. त्यांना अफाट आणि अमर्याद अशा सिंधुसागराचे दर्शन झाले. या समुद्रावर तेव्हा राज्य होते सिद्दींचे, पोर्तुगीजांचे, डचांचे, फ्रेंचांचे आणि इंग्रजांचे. आपले स्वराज्य बळकट करायचे असेल तर या सागराला पालाण घालणारे तितकेच तोलामोलाचे आरमार आपल्याकडे असायला हवे याची जाणीव त्या थोर राजाला तेव्हा झाली आणि सुरुवात केली एक बलाढय़ आरमार बांधायची. कदंबांचा राजा दुसरा जयकेशी याचे आरमार होते. त्यानंतर सिंधुसागरात मोठय़ा डौलाने दाखल झाले ते छत्रपतींचे मराठी आरमार.
स्वराज्याच्या आरमारात विविध प्रकारच्या नौका, जहाजे होती. त्यातलाच एक नामांकित प्रकार म्हणजे संगमेश्वरी नौका. या नौका याच संगमेश्वर परिसरात बांधल्या जाऊ लागल्या. संगमेश्वरपासून जवळच असलेल्या ‘निढळेवाडी’ इथल्या सुतार समाजाची मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून इथे नौका बांधणीचे पारंपरिक काम अगदी आजपर्यंत करत आहेत. संगमेश्वरकडून रत्नागिरीच्या दिशेला जाऊ लागले की जेमतेम 5 कि.मी. अंतरावर आहे निढळेवाडी. या गावाचे मूळचे नाव ‘वाडा निढळ’. छत्रपती शिवरायांनी हे गाव इथल्या सुतार समाजाला आंदण दिला. गुहागरजवळ असलेल्या जामसूद इथून या मंडळींना महाराजांनी इथे बोलावून घेतले.
निढळेवाडीला रस्त्याच्या उजव्या बाजूला रस्त्याला लागूनच मोठय़ा आकाराच्या लाकडी नौका उभ्या केलेल्या दिसतात. त्यातल्या काहींचे काम सुरू असते. हाच तो संगमेश्वरी नौका बनवण्याचा पारंपरिक उद्योग आणि त्याचा कारखाना. सुतार समाजातील संजय वाडकर हे हा पारंपरिक व्यवसाय आजही तशाच पारंपरिक पद्धतीने करताना दिसतात. संगमेश्वरी नौका या संपूर्णपणे लाकडात बांधल्या जात असत आणि त्यांना खिळा वगैरे तत्सम पुठलीही लोखंडी वस्तू वापरली जात नसे. आपले पिढीजात ज्ञान वापरून आणि प्रत्येक खाचेत इंग्रजी ‘एन’ आकाराची खुंटी ठोपून ही नौका बांधली जाते.
नौका बांधणीसाठी जे लापूड लागतं ते नागपूर, गोंदिया, मध्य प्रदेश इथून आणले जाते. गरज पडली तर कोकणातल्या शेतकऱयाकडून लापूड खरेदी केलं जातं, मात्र त्यासाठी त्याचा 7/12 चा उतारा घेऊन त्याची वन विभागाकडे रीतसर नोंदणी करून त्यांची परवानगी घेऊन मगच ते विशिष्ट लापूड तोडून आणलं जातं. संपूर्ण नौका बांधकामात पुठेही यंत्राचा वापर केला जात नाही. सगळं काम हे पुशल कारागीरांच्या हातानेच केलं जातं.
संगमेश्वरी नौका ही पाण्यात चालणार, तुफानाला तोंड देणार म्हणून या नौकेला आतून विशिष्ट तेलाचा कोट दिला जातो. कडू तेल आणि चंद्रुस हे एकत्र करून ते उकळून त्याचं द्रावण तयार केलं जातं आणि ते सगळ्या नौकेला आतून लावलं जातं. फळीची मापे किती घ्यायची, पुठल्या प्रकारची फळी पुठे बसवायची, नौकेशी तिचा कोन कसा साधायचा हे किचकट वाटलं तरी अत्यंत गरजेचं असलेलं काम इथे विशेष लक्ष घालून केलं जातं. बोट पाण्याच्या वर किती राहील हे लक्षात घेऊन फळीला पीळ दिला जातो. म्हणजे लाकडाची सलग फळी गरम करून विशिष्ट कोनात वाकवली जाते आणि ती पीळ दिलेली फळी या नौकेमध्ये बसवली जाते.
सन 1665 साली समुद्रात दाखल झालेल्या स्वराज्याच्या आरमाराची पहिल्यांदा इंग्रजांकडून चेष्टा केली गेली. मात्र नंतर याच आरमाराच्या जोरावर महाराजांनी समुद्रातल्या शत्रूंना सळो की पळो करून सोडले. पुढे तर कान्होजी आंग्रे यांच्या काळात मराठी नौदलाने संपूर्ण किनारपट्टीवर दहशतच निर्माण केली होती. निढळेवाडीचे पारंपरिक नौका निर्माण करणारे संजय वाडकर सांगतात की, महाराजांनी आमच्या सुतार समाजावर विश्वास टाकला होता आणि आमच्याकडून संगमेश्वरी जहाजांची निर्मिती करवून घेतली. आजही ही मंडळी हा व्यवसाय पारंपरिक पद्धतीने करताना दिसतात. संगमेश्वरच्या अगदी उंबरठय़ावर शास्त्र्ााr नदीच्या काठी असलेला हा संगमेश्वरी नौका बांधणीचा प्रकल्प मुद्दाम बघायला हवा. छत्रपतींनी दाखवून दिलेल्या मार्गावर आजही वाटचाल करणारी ही मंडळी आणि त्यांनी निर्माण केलेल्या नौका हे कोकणाचे भूषण आहे.





























































