आभाळमाया – तारकांचे चालणे

723

>> दिलीप जोशी 

‘तारकांचे चालणे’ हे जरा काव्यमय झालं. एरवी आकाशदर्शन करताना उगवतीकडून मावळतीकडे जाणारे तारकास मूह असं आपण म्हणतो. तार्‍यांचे हे पूर्वेकडून पश्चिमेकडे ‘सरकणं’ पृथ्वीच्या स्वत:भोवती फिरण्याच्या गतीमुळे होतं. आपण ट्रेनमधून जात असताना झाडं ‘पळताना’ दिसतात तसाच प्रकार. ती झाडं, डोंगर स्थिरच असतात. आपली ट्रेन पळत असते पण झाडांची ‘भासमान’ गती जाणवते. सूर्य उगवतो आणि मावळतो हा असाच प्रकार. हा विशाल तारा त्याच्याजागीच असतो. पृथ्वी आपल्या अक्षाभोवती 24 तासात फिरते ती पश्चिमेकडून पूर्वेकडे. त्यामुळे पूर्वेला ‘उगवलेले’ सूर्य आणि इतर तारकासमूह पश्चिमेकडे ‘मावळताना’ म्हणजे क्षितिजापार होताना दिसतात. बाराव्या शतकात महाराष्ट्रात भास्कराचार्य हे खगोलविद होऊन गेले. साधारण तोच काळ ज्ञानेश्वरांचा. त्यावेळी भास्कराचार्यांनी पृथ्वी अंतराळात अधांतरी असते आणि स्वत:भोवती फिरते हे सांगितलं, तर ज्ञानेश्वरांनी ‘जैसे सूर्याचे न चालताही चालणे’ अशी वैज्ञानिक सत्य सांगणारी उपमा दिली. सूर्याप्रमाणेच सर्व तार्‍यांचे ‘चालणे’ही ‘न चालता’च होते. परंतु आपल्या दृश्य अनुभवाच्या आकलनातून आपण तारे ‘उगवले’, ‘मावळले’ म्हणतो आणि तेही खरंच असतं.

बुध, शुक्र हे आंतरग्रह आणि आपला चंद्र मात्र वेगळ्या प्रकारे उगवतात. बुध, शुक्र कधीच मध्य आकाशात येत नाहीत. ते पूर्वे किंवावा पश्चिमेला ‘उगवून’ तिथेच मावळतात. पौर्णिमेनंतरच्या पंधरवड्यात पूर्वेकडे उगवणारा चंद्र पश्चिमेला जाऊन मावळतो पण अमावास्येनंतरचा द्वितीयेचा किंवावा चतुर्थीचा चंद्र पाहिला तर तो संध्याकाळी पश्चिमेला उगवलेलाच दिसतो आणि काही वेळाने त्याच दिशेला ‘मावळतो’ त्याचं गणित नंतर कधीतरी जाणून घेऊ.

गेल्या आठवड्यात आपण ‘ध्रुवतारा’ अढळ नसतो असं म्हटलं. वैश्विक परिमाणांनुसार ते योग्यच आहे पण तो बदलायला सुमारे 12 ते 14 हजार वर्षांचा काळ जात असल्याने यापुढच्या अनेक पिढ्यांना सध्याचाच ध्रुवतारा दिसणार आहे. तो सध्या तरी साधारण हजार वर्षे ‘अढळ’ दिसेल.

आपण उत्तर ध्रुव प्रदेशात गेलो तर ध्रुवतारा डोक्यावर दिसेल. मग रात्रीचं आकाश आणि दिवसाचा सूर्य कधी उगवणार आणि मावळणार? सूर्य आता जसा पृथ्वीच्या उत्तर गोलार्धावर प्रकाशात आहे तसा तो 21 जूनपर्यंत अधिकाधिक उत्तरेकडे जाईल. पण साडेतेवीस अक्षाशांची त्याला मर्यादा आहे. आपल्या देशातील कर्कवृत्तावर म्हणजे साधारण उज्जैन शहरावर तो आला की त्याचं ‘दक्षिणायन’ ध्रुव होईल. उत्तर ध्रुव प्रदेशातून तो काही काळ क्षितिजापासून 23 अंशांवर 24 तास दिसेल. मग 23 सप्टेंबरला तो 24 तास क्षितिजावरच गोल गोल फिरेल. हा ध्रुव प्रदेशातला सहा महिन्यांचा दिवस त्यानंतर सूर्य दक्षिण गोलार्धात गेला की 22 मार्चपर्यंत उत्तर ध्रुवावर रात्र! हीच स्थिती उलट क्रमाने दक्षिण ध्रुवावरही होते. पण आपण पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात राहत असल्याने उत्तर ध्रुवाची माहिती घेतोय.

दक्षिण ध्रुवापासून अवकाशात सरळ रेषा काढली तर तिथे आपल्या ध्रुवासारखा ठळक तारा नाही. ‘सदर्न क्रॉस’ नावाचा तारकासमूह आहे. आपल्याकडून खगोलीय छायाचित्रण करताना आपला ‘ध्रुवतारा’ अढळ असल्याचं सिद्ध करता येतं. दुर्बिणीला जोडलेल्या कोपर्‍यातून बर्‍याच वेळाचं ‘एक्स्पोजर’ देऊन तो बरोबर ध्रुव तार्‍याकडे रोखला तर ध्रुव स्थिर आणि त्याच्या भोवती शुभ्र तुटक रेषांची वर्तुळं चित्रित होतात ही वर्तुळं किंवावा या रेषा म्हणजे रात्रभर ध्रुवतार्‍याभोवती फिरणार्‍या हजारो तार्‍यांचे ‘ट्रेल’ असतात. त्यावरून ध्रुवतार्‍याच्या स्थिर ‘अढळपदा’बरोबरच आपली पृथ्वी फिरत असल्याचंही आपोआप सिद्ध होतं. अभिषेक बावकर यांनी घेतलेल्या सोबतच्या छायाचित्रात ध्रुव-तार्‍याभोवती अनेक तारकांच्या ट्रेल (रेषा) दिसत आहेत. त्यांनी हे छायाचित्र रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास येथून घेतले आहे. सुमारे अध्र्या तासाचे ‘एक्स्पोजर’ देऊन त्यांनी हा फोटो घेतलाय.

अशा मनोवेधक खगोलीय छायाचित्रणातून आपण नकळत विज्ञान जाणून घेत असतो. त्याचा कलात्मक आनंद घेता घेताना तेही शिकायचं. ध्रुवतार्‍याची स्थिती आपण पृथ्वीवर कुठे आहोत (केवळ उत्तर गोलार्धात) त्यावर अवलंबून असते. महाराष्ट्र सांगली ते नागपूर असे अक्षांश 16 ते 21 या दरम्यान येतात. मुंबई 19 अक्षांशावर आहे. आपल्याकडून ध्रुवतार्‍याभोवती रात्रभर फिरणारे म्हणजेच न मावळणारे काही ‘नित्योदित’ तारकासमूह दिसतात. त्यापैकी अर्सा मायनर किंवावा ‘ध्रुवमत्स्य’ या छोट्या ‘सप्तर्षी’सारख्या दिसणार्‍या तारकासमूहालाच ध्रुव तारा येतो. याशिवाय ‘वृषपर्वा’ शालेय तारकासमूहसुद्धा रात्रभर आकाशात दिसतात. जर्मनीत गेलो तर सप्तर्षी नक्षत्रही रात्रभर दिसत राहील आणि उत्तर ध्रुवावर गेलो तर आकाशातील तारे मावळणारच नाहीत! त्यांचे ‘न चालता चालणे’ तिथून धबकलेल जाणवेल.

आपली प्रतिक्रिया द्या