
>>रितेश पोपळघट
जगभरात कृषी क्षेत्रासाठी पोषक वातावरण निर्माण करून स्टार्टअप इकोसिस्टम विकसित करण्यावर मोठय़ा प्रमाणावर काम सुरू आहे. या प्रयत्नांमुळे कृषी स्टार्टअप अधिक सक्षम होत असून रोजगारनिर्मिती, तंत्रज्ञानाचा प्रसार आणि शेतकऱयांचे उत्पन्न वाढवण्यास महत्त्वाचे योगदान दिले जात आहे. दुग्ध व्यवसाय, मत्स्यपालन, कुक्कुटपालन यांसारख्या कृषीपूरक क्षेत्रात नावीन्यपूर्ण स्टार्टअप्ससाठी मोठय़ा संधी आहेत.
गरज ही शोधाची जननी आहे, ही म्हण अनुभवतच आपण सर्व मोठे झालो आहोत. आजच्या वेगाने बदलणाऱया जागतिक अर्थव्यवस्थेत व्यवसाय, उत्पादन आणि प्रत्येक क्षेत्रातील नावीन्याला अत्यंत महत्त्व दिले जाते. कोणत्याही देशाची व्यावसायिक प्रगती आणि शाश्वत विकास यांचे मोजमाप त्या देशातील स्टार्टअप इकोसिस्टमच्या ताकदीवरून केले जाते.
आज विशेषत कृषी क्षेत्रात नावीन्यपूर्ण कल्पना, तंत्रज्ञानाधारित उपाय आणि उद्योजकतेला चालना मिळाल्यास केवळ आर्थिक प्रगतीच होत नाही, तर सामाजिक परिवर्तनालाही गती मिळते. याच उद्देशाने जगभरात कृषी क्षेत्रासाठी पोषक वातावरण निर्माण करून स्टार्टअप इकोसिस्टम विकसित करण्यावर मोठय़ा प्रमाणावर काम सुरू आहे. अशा इकोसिस्टममुळे आर्थिक स्थैर्य, रोजगारनिर्मिती, ग्रामीण विकास आणि समाजाच्या सर्वांगीण उन्नतीला मोठा हातभार लागतो. स्टार्टअप इकोसिस्टमचा विकास व्हावा यासाठी शासकीय तसेच खासगी पातळीवर मोठय़ा प्रमाणात निधी उपलब्ध करून विविध कार्पाम आणि फंडिंग योजना राबविल्या जात आहेत. यामुळे विद्यार्थ्यांपासून ते नवउद्योजकांपर्यंत सर्वांसाठी ही एक मोठी आणि जीवन बदलणारी सुवर्णसंधी ठरत आहे. याच प्रािढयेतून आपल्या राज्यातही एक सक्षम स्टार्टअप इकोसिस्टम उभी राहत आहे. कृषी क्षेत्रातील नवकल्पना, समस्या ओळख व निराकरण तसेच उद्योजकीय दृष्टिकोन विकसित करण्यासाठी प्रामुख्याने तीन टप्प्यांमध्ये मदत केली जाते. यामध्ये स्टुडंट ओरिएंटेशन प्रोग्राम, अॅग्रीप्रेन्युअरशिप ओरिएंटेशन आणि स्टार्टअप अॅग्री-बिझनेस इन्क्युबेशन यांचा समावेश होतो.
स्टुडंट ओरिएंटेशन प्रोग्रामांतर्गत विद्यार्थ्यांना चार लाख रुपयांपर्यंतचे फंडिंग दिले जाते. याचा उद्देश म्हणजे लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये नावीन्याची बीजे रुजवणे आणि महाविद्यालयीन स्तरावर त्यांची उद्योजकीय मानसिकता विकसित करणे. त्यानंतर अॅग्रीप्रेन्युअरशिप ओरिएंटेशन कार्पामामधून कृषी क्षेत्रात उद्योजक होऊ इच्छिणाऱया तरुणांना मार्गदर्शनासह पाच लाख रुपयांपर्यंतचे आर्थिक सहाय्य दिले जाते. प्रत्यक्ष स्टार्टअप सुरू करण्यासाठी स्टार्टअप अॅग्री-बिझनेस इन्क्युबेशनअंतर्गत पाच ते पंचवीस लाख रुपयांपर्यंतचे फंडिंग उपलब्ध करून दिले जाते. विशेष म्हणजे हे संपूर्ण सहाय्य अनुदान स्वरूपात दिले जाते.
अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की असे फंडिंग का दिले जाते? यामागील मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांनी आणि नवउद्योजकांनी मांडलेल्या नावीन्यपूर्ण कल्पना व स्टार्टअप्सना प्रोत्साहन देणे. आजच्या तरुणांमध्ये सर्जनशीलता आणि समस्या सोडवण्याची मोठी क्षमता आहे. योग्य मार्गदर्शन, संसाधने आणि आर्थिक पाठबळ मिळाल्यास ही क्षमता यशस्वी उद्यमात रूपांतरित होऊ शकते. या कार्पामांमुळे केवळ कल्पना मांडण्यापुरते मर्यादित न राहता, समस्या सोडवण्याची क्षमता आणि उद्योजकीय विचारसरणी विकसित करण्यास मदत होते. स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील उद्योग समूह, गुंतवणूकदार, संशोधन संस्था व शासकीय यंत्रणांशी थेट जोडणी होऊन स्टार्टअप्सची व्यावसायिक वाढ होते.
या संपूर्ण प्रािढयेचे अनेक फायदे आहेत. सर्वप्रथम स्टार्टअप्सना तंत्रज्ञानाची तांत्रिक पडताळणी आणि तज्ञांचे मार्गदर्शन मिळते. विकसित केलेले तंत्रज्ञान प्रत्यक्ष उपयोगी आहे का, याची चाचणी केली जाते. दुसरे म्हणजे प्रत्यक्ष शेतात किंवा बाजारात प्रयोग करून उत्पादनाची परिणामकारकता तपासता येते. यशस्वी उद्योजकांकडून मिळणारे मार्गदर्शन स्टार्टअप्सना योग्य दिशा निवडण्यास मदत करते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बाजाराशी जोडणी आणि गुंतवणूकदारांशी थेट संपर्क साधण्याची संधी मिळते. कृषी यांत्रिकीकरणामुळे उत्पादन खर्च कमी होतो आणि कार्यक्षमता वाढते. प्रिसिजन शेतीत एआय, डेटा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अचूक शेती शक्य होते. कृषी मूल्यसाखळी आणि वाहतूक व्यवस्थेत नावीन्य आल्यास शेतमालाची नासाडी कमी होते व शेतकऱयांना योग्य दर मिळतो. कचऱयापासून संपत्ती आणि नवीकरणीय ऊर्जा, जसे शेणावर आधारित वीज व खत निर्मिती हे पर्यावरणपूरक उपाय ग्रामीण भागात नवे उत्पन्न स्रोत निर्माण करतात.
देशपातळीवर भारतीय कृषी संशोधन संस्था (घ्ARघ्), पुसा, नवी दिल्ली; राष्ट्रीय कृषी विपणन संस्था (ऱघ्Aश्), जयपूर; राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था (श्Aऱउं), हैदराबाद; कृषी विज्ञान विद्यापीठ, धारवाड; तसेच आसाम कृषी विद्यापीठ, जोरहाट यांसारख्या संस्थांचा मोठा सहभाग आहे. महाराष्ट्रात सेंट्रल इन्स्टिटय़ूट फॉर रिसर्च ऑन कॉटन टेक्नॉलॉजी यांच्या माध्यमातूनही हे कार्य सुरू आहे. दिल्लीमधील इंडीग्रामसारख्या संस्था आणि मराठा चेंबर्सच्या माध्यमातून ािढकेटर अजिंक्य रहाणे हेदेखील स्टार्टअपला काही अटींवर चांगले सहकार्य करत आहेत. या सर्व संस्थांच्या सहकार्याने संशोधन, प्रशिक्षण, विस्तार आणि विपणन क्षेत्रातील तज्ञ कृषी स्टार्टअप्स, उद्योजक आणि शेतकऱयांना मार्गदर्शन व धोरणात्मक पाठबळ देत आहेत.
स्टार्टअप उपामांच्या माध्यमातून कृषी क्षेत्रातील नवउद्योजकतेला चालना मिळाली आहे. आतापर्यंत शासनाने 2,154 स्टार्टअप्सचे इन्क्युबेशन करण्यात आले असून 6,181 स्टार्टअप्सना प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रयत्नांमुळे कृषी स्टार्टअप अधिक सक्षम होत असून रोजगारनिर्मिती, तंत्रज्ञानाचा प्रसार आणि शेतकऱयांचे उत्पन्न वाढवण्यास महत्त्वाचे योगदान दिले जात आहे. हे विविध कार्पाम व फंडिंग योजना स्टार्टअप्सपुरत्या मर्यादित नसून त्या संपूर्ण कृषी व्यवस्थेला बळकटी देतात. तरुणांची सर्जनशीलता, उद्योजकता आणि तंत्रज्ञानाची ताकद एकत्र आल्यास शेतीत आमूलाग्र परिवर्तन शक्य आहे.
फंडिंग देणाऱया संस्था
(लेखक शेती क्षेत्रात कार्यरत असून
`द फार्म’ या स्टार्टअपचे सहसंस्थापक आहेत.)
.



























































