तारील कवण तुजविण वासुदेवा

>> निळकंठ कुलकर्णी

।। श्री गुरुदेव दत्त ।।

“तारील कवण तुजविण वासुदेवा”

।। श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज ।।

श्री महाराजांनी इतक्या कठोर फिरत्या जीवनात कुठल्याही सोयी नसताना जे अफाट वाङमय निर्माण केलं आहे, त्याची तुलना केवळ श्री शंकराचार्य स्वामी महाराज यांच्या वाङमयाशीच करता येईल. त्यावरून असे स्पष्ट होते की, श्रीस्वामीमहाराज हे श्रीदत्तसंप्रदायाचे आधुनिक दार्शनिक होते. श्रीदत्तपुरण, द्विसाहस्त्री गुरुचरित्र, वृद्धशिक्षा इत्यादी ग्रंथातूंन, श्रीदत्तदेवतेचे स्वरूप, संप्रदायाच्या अद्वैत तत्वज्ञानाची बैठक त्याची भागवत संप्रदायाशी नजीकचे, दत्त मालमंत्र, दत्तोपासना या सर्व विषयांवर अधिकारीक, प्रमाणसिद्धी, अनुभव संपन्न लिखाण श्री महाराजांनीच प्रथम केले.

त्याच प्रमाणे श्रीदत्तमहात्म्य, सप्तशतीगुरुचरित्रसार, दत्तलीलामृताबधीसार यासारखे प्रासादिक ग्रंथ त्यांनी निर्माण केले. ज्याच्या अनुष्ठानानी हजारो दत्तभक्तानी श्रीदत्तकृपा प्राप्त करून घेतली व आजही घेत आहेत. समाजातील सर्व स्तरांतील भक्तांसाठी त्यांनी सरल, भावपूर्ण व गेय अशी पद्यरचना केली. हिंदुस्थानातील सर्व नद्या व तीर्थे यांच्यावर त्यांनी भक्तीपूर्वक प्रेम केले व त्यांच्यावर स्त्रोत्ररचना केली.

([email protected])

आपली प्रतिक्रिया द्या