इकोभान- शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात

भारतातील ग्रामीण भागापेक्षा शहरी भाग अतिशय अशक्त असल्याचा निष्कर्ष एका सर्वेक्षणात दिसून आला आहे. शहरात आजारी पडण्याचे प्रमाण अधिक आहे, तर ग्रामीण भागात है प्रमाण कमी आहे. वास्तविक पाहता सुपरत्पेशालिटी हॉस्पिटल्स, क्लिनिक्स, तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता है सारे असतानाही शहरी नागरिकांचे आजारी पडणे हे तसे चिंताजनकच म्हणावे लागेल. पण या सर्वेक्षणाचा विस्तृत अभ्यास करणे, आवश्यक त्या उपाययोजना, जनजागृतीसाठीचे नियोजन आणि त्याची अंमलबजावणी हे सारे करणे अगत्याचे आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरात राहणाऱ्या व्यक्तीचे आरोग्य कम‌कुवत असते. शहरी भागात विविध प्रकारचे प्रदूषण नोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. वाहनांद्वारे होणारे प्रदूषण, औद्योगिक, सांडपाणी थेट नद्यांमध्ये मिसळणे, प्रदूषित वातावरणात आणि रसायनांचा मोठ्या प्रमाणात वापर झालेल्या फळपिकांचे आहारात असणे अशा विविध बाबींचा त्यात समावेश आहे. प्रदूषित हवा शरीरात गेल्याने रक्तदाबापासून विविध प्रकारचे आजार उद्भवतात. सातत्याने होणारे ध्वनीप्रदूषणाही हानिकारकच आहे. शहरात सातत्याने वाहनांची संख्या वाढते आहे. प्रत्येक घरी किमान एक वाहन आहे. गा वाहनांमधून निघणारा धूर आणि त्याद्वारे होणारे प्रदूषण हीसुद्धा चिंतेचीच बाब आहे. दररोज प्रदूषित वातावरणात राहत असल्याने त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम, घटणारी प्रतिकार क्षमता, विनिध प्रकारच्या आजारांचा होणारा फैलाव या सान्यांचाच हा परिपाक आहे. शहरातील स्वच्छता राखली न गेल्याने डासांचा फैलाव होतो. यातूनच आजारांचेही प्रमाण वाढते. फास्ट फूड खाण्याकडे असलेला कल, यातून आवश्यक ते घटक शरीराला न मिळणे हीसुद्धा शहरी भागातील जीवनशैली आरोग्याच्या तक्रारी वाढण्यास कारणीभूत आहे.

व्यायामाचा अभाव, बैठे काम, मर्यादित शारीरिक हालचाली याचाही परिणाम शहरातील जनतेच्या आरोग्यावर होत आहे. या तुलनेत ग्रामीण भागात सकस आहार, मोठ्या प्रमाणात शारीरिक काम यामुळे तेथील जनता आजारी पडण्याचे प्रमाण कमी आहे. आकर्षणामुळेही ग्रामीण भागातून शहराकडे स्थलांतर होते. मात्र, शहरात येऊन जर आरोग्य सुदृढ राहणार नसेल आणि आपल्या उत्पन्नातील मोठा वाटा हा जर आरोग्यावर सार्च होणार असेल तर शहरात येणे हे फायद्याचे की तोट्याचे, याचाही विचार होणे आवश्यक आहे.